Home Remedies: अ‍ॅसिडिटीमुळे हैराण आहात? ‘या’ घरगुती उपचारांनी मिळेल आराम

                  जर तुम्ही देखील अ‍ॅसिडिटीच्या समस्येने त्रस्त असाल, तर ही समस्या कमी करण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपायांची मदत घेऊ शकतात.


          बदलत्या आहार आणि जीवनशैलीमुळे अ‍ॅसिडिटीचा त्रास होणे ही खूप सामान्य गोष्ट आहे. 


ऍसिडिटी घरगुती उपाय (Acidity Home Remedies):ऍसिडिटी घरगुती उपाय (Acidity Home Remedies): 

            जर तुम्हाला नेहमी अ‍ॅसिडिटीचा त्रास होत असेल तर रोज सकाळी एक आवळा खा. यामुळे अ‍ॅसिडिटीची समस्या दूर राहण्यास मदत होते. 

              ओवा खाल्ल्याने देखील अ‍ॅसिडिटीमुळे होणारा त्रास कमी होतो. यामुळे गॅस, अपचन आणि मळमळ होण्याची समस्या कमी होण्यास मदत होते. 

          अ‍ॅसिडिटीपासून आराम मिळवण्यासाठी गुळाचा देखील वापर करा. विशेषत: जेवणानंतर गुळाचे सेवन केल्यास अ‍ॅॅसिडिटीपासून चांगला आराम मिळतो. 

                 आम्लपित्त टाळण्यासाठी जिरे आणि जिरेपासून बनवलेल्या पावडरचा आहारात समावेश करावा. याच्या मदतीने तुम्हाला अ‍ॅसिडिटीपासून आराम मिळू शकतो. 

           कलिंगडाचा रस प्यायल्यामुळे अ‍ॅसिडिटी कमी होते आणि तसेच यामुळे पोटाला थंडावा देखील मिळतो. 

           आम्लपित्त झाल्यास बडीशेपचे पाणी प्यावे. त्यामुळे छातीत होणारी जळजळ, अपचन कमी होऊ शकते. 

           अ‍ॅसिडिटी मुळे पोटात जळजळ होत असेल आणि दुखत असल्यास थंड दूध प्या. यामुळे पोटातील जळजळ कमी होऊ शकते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!