Home Loan🏘️🏠 : आता घराचं स्वप्न होणार पूर्ण !!! ‘या’ 5 बँका देत आहे सर्वात स्वस्त गृहकर्ज……

         

            स्वतः चे घर घेण्याचे प्रत्येकाचं स्वप्न असत. त्यासाठी लोक कष्ट करून पैसे गोळा करत असतात. जर तुम्ही देखील घर घेण्याचा विचार करत असाल आणि होम लोनवर (Home Loan) घर घेण्याचा विचार असेल, तर या बातमीत तुम्हाला त्याबद्दल सर्व माहिती मिळणार आहे. SBI व्यतिरिक्त या 5 बँका देखील सर्वात स्वस्त गृहकर्ज देत आहेत.1.Kotak Mahindra Bank –

          Kotak Mahindra Bank सर्वात कमी दरात गृहकर्ज ऑफर करण्यासाठी सर्वात लोकप्रिय आहे. हि बँक सध्या 6.50 टक्के RLLR सह गृहकर्ज देते. ही खाजगी क्षेत्रातील सर्वात आघाडीची बँक आहे. ज्येष्ठ उद्योगपती उदय कोटक हे या बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहे.


2.Union Bank of India (UBI) –

            Union Bank of India ही बँक 6.8 टक्के RLLR ने गृहकर्ज देते. ही बँक कमीत कमी ६.४ टक्के आणि जास्तीत जास्त ७.२५ टक्के दराने गृहकर्ज देत आहे. जर तुमचा क्रेडिट इतिहास चांगला असेल, तर तुम्ही तुमच्या स्वप्नातील घर सर्वात कमी व्याजदरात खरेदी करू शकता.


3.Bank of Maharashtra- 

             ही बँक 6.8 टक्के या RLLR सह गृहकर्ज देत आहे. बँक गृहकर्जावर कमीत कमी ६.४ टक्के आणि जास्तीत जास्त ७.८ टक्के व्याज देत आहे. हे सार्वजनिक क्षेत्रातील अग्रगण्य कर्जदारांपैकी एक आहे. तुमचा CIBIL स्कोअर जर चांगला असेल, तर तुम्हाला शक्य तितक्या कमी दरात गृहकर्ज मिळेल.


4.Bank of India –

               ही बँक 8.5% च्या RLLR वर गृहकर्ज देत आहे. बँक कमीत कमी ६.५ टक्के आणि जास्तीत जास्त ८.२ टक्के व्याजदराने कर्ज देत आहे. जर तुम्ही घर घेण्याचे ठरवले असेल, तर सर्वप्रथम तुम्ही  Online Platform वर जाऊन वेगवेगळ्या सावकारांच्या गृहकर्जाच्या दरांची तुलना करा. त्यामुळे तोटा होण्याची शक्यता असते!


5.Bank of Baroda –

                  ही बँक  6.5% च्या RLLR दराने गृहकर्ज देत आहे. ही बँक घर खरेदीसाठी कमीत कमी ६.५ टक्के आणि जास्तीत जास्त ७.८५ टक्के व्याजदराने कर्ज देऊ करते आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!