Government Schemes : ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या नंतर आता सरकारची शेतकऱ्यांसाठी नवीन योजना ‘ट्रॅक्टर आमचा डिझेल तुमचे’, जाणून घ्या या योजनेचे फायदे…

 अकोला,: केंद्र सरकार (Central Government) कडून मागच्या दोन महिन्यात डिझेल (Diesel) च्या दरात तब्बल १० रुपयांची वाढ करण्यात आली. यामुळे राज्यात सरासरी डिझेलचे दर (Diesel rates) 105 रुपयांच्या आसपास पोहोचले आहेत. डिझेलच्या दर वाढीचा शेतकऱ्यांना फार मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. शेतीच्या मशागती (Cultivation of Agriculture) च्या कामांचे दर अव्वाच्या सव्वा झालेले आहेत. यावर उपाय म्हणून राज्य सरकार (State Government) ने नवीन योजना राबवली आहे. ‘ट्रॅक्टर आमचा डिझेल तुमचे’ (Our tractor diesel is yours) या योजनेचा फायदा नक्कीच शेतकऱ्यांना होणार आहे.

ट्रॅक्टर आमचा डिझेल तुमचे (Tractor our diesel yours)


          निराधार विधवा, शेतकरी आणि आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिला शेतकऱ्यांना पेरणी ते कापणी या दरम्यान सहाय्य व्हायला हवे, आणि त्यांचा उत्पादन खर्च (Production cost) कमी व्हावा यासाठी ‘ट्रॅक्टर आमचा, डिजेल तुमचे’(Our tractor diesel is yours), हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यामुळे या महिला शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य लाभते. ही योजना देशात प्रथमच अकोला या जिल्ह्यात राबविण्यात येत असून ही योजना राज्याला व देशाला खूप चांगले मार्गदर्शक ठरणार आहे. याबाबत कामगार राज्यमंत्री नेते (Leader of State for Labor) बच्चू कडू यांनी माहिती दिली आहे. 


         जिल्ह्यातील निराधार, विधवा आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांतील महिलांना ‘पेरणी ते कापणी (Sowing to harvest)’ या दरम्यान सहाय्य मिळून उत्पादन खर्च कमी करता यावा यासाठी ‘ट्रॅक्टर आमचा, डिझेल तुमचे’ (Our tractor diesel is yours)  हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचा सोमवारी(दि.16) वरुळ-जऊळका ता.अकोट येथील सिमा काठोळे यांच्या शेतात शुभारंभ केला होता. त्यावेळी मंत्री कडू त्यांनी ही माहिती दिली. 


          बच्चू कडू म्हणाले की, शेतकरी कुटुंबात पतीच्या मृत्युनंतर कुटुंबाचा उदरनिर्वाह (Subsistence) वेळ महिलांवर येते. पण नांगरणी, वखरणी, पंजी आणि पावसाळा हे सर्व सुरू झाल्या नंतर पेरणीसाठी पैसा आणायचा तरी कुठून? असे अनेक प्रश्न त्यांच्या सामोर उभे राहत असतात. त्यात त्यांना सहाय्य व्हावे यासाठी, हा उपक्रम प्रायोगिक तत्वावर सुरु करण्यात आला आहे. 


        अकोला जिल्ह्यातील सर्व निराधार, विधवा आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांतील महिलांचे आर्थिक स्वालंबन (Financial independence) होण्यास मदत होईल. हा उपक्रम यशस्वी झाला तर राज्यभर राबविण्यासाठी आपण प्रयत्न करु असे, कडू यांनी सांगितले. त्या अनुषंगानेच विधवा शेतकरी महिलाकरीता ‘पेरणी ते कापणी (Sowing to harvest)’ यांच्या दरम्यान शेतकऱ्यांना कराव्या लागणाऱ्या खर्चाकरिता शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून मदत करण्याचे आवाहन कडू यांनी संबंधित यंत्रणेला दिले. तत्पूर्वी कार्यक्रमाच्या शुभारंभाप्रसंगी मंत्री बच्चू कडू यांनी स्वतः शेतात ट्रॅक्टर चालवत नांगरणी केली.

1 thought on “Government Schemes : ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या नंतर आता सरकारची शेतकऱ्यांसाठी नवीन योजना ‘ट्रॅक्टर आमचा डिझेल तुमचे’, जाणून घ्या या योजनेचे फायदे…”

  1. Pingback: Tractor our diesel yours : 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' नंतर आता सरकारची नवीन योजना ‘ट्रॅक्टर आमचा डिझेल तुमचे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!