Gauri Avahan 2022: गणपती पाठोपाठ गौरी माहेरी कधी येणार आहे? मुहूर्त, पूजा आणि पूजा साहित्याबद्दल जाणून घ्या सर्व माहिती…

Gauri Avahan 2022: 

                गणपती पाठोपाठ गौरीचं पण आगमन होत असते. महाराष्ट्रात अनेक घरी गौरी माहेरी येतात असं म्हटले जाते. गौरी पूजनाची पद्धत महाराष्ट्रात प्रत्येक गावानुसार वेगवेगळी असते. कोकणात गौरीचं आगमन होतं तिथे सुद्धा गौरीची पूजा वेगवेगळी आहे. विदर्भात महालक्ष्मीचे आगमन असं म्हटले जाते. कुठे उभ्या असतात तर कुठे खड्यांचा गौरी असतात. तर कुठे तेरड्याची रोपे एकत्र करुन त्याला गौराईचा फोटो किंवा मुखवटा लावून पुजा केली जाते. 


               गौरी ही साक्षात माता पार्वतीचं रुप मानली जाते. त्यामुळे पार्वती माता घरी येणं म्हणजे ती माहेरीपणाला आली आहे असे म्हणतात. त्यामुळे माहेरवाशिणीच्या आवडीचे गोडाधोडाचे पदार्थ नैवेद्य म्हणून बनवले जातात. गणपती 31 ऑगस्ट म्हणजे येत्या बुधवारी येणार आहेत तर त्यांच्या पाठोपाठ गौराई कधी येणार आहेत त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. यंदा 3 सप्टेंबर रोजी म्हणजे येत्या शनिवारी गौराईचं आवाहन, तर 4 सप्टेंबर रोजी गौरी पूजन केले जाणार आहे. तर 5 सप्टेंबर रोजी गौरी विसर्जन होणार आहे. 


आगमन, पूजन आणि विसर्जन मुहूर्त               त्यामुळे ज्यांचा घरी 5 दिवसांचं बाप्पा आहे त्यांचं विसर्जन 5 सप्टेंबरला गौरीसोबतच होणार आहे. याचा अर्थ यंदा 5 दिवसांचे बाप्पा एक दिवस जास्त आपल्यासोबत राहणार आहेत. 


आगमन, पूजन आणि विसर्जन मुहूर्त

            ज्येष्ठ गौरी आवाहनचा शुभ मुहूर्त – पहाटे 6.03 पासून ते संध्याकाळी 6.36 पर्यंत आहे.


            ज्येष्ठ गौरी पूजनाचा मुहूर्त – 3 सप्टेंबरला रात्री 11 वाजेपासून 4 सप्टेंबर रात्री 9.40 वाजेपर्यंत आहे.

एकूण अवधी – 12.28


            ज्येष्ठ गौरी विसर्जनाचा मुहूर्त – 5 सप्टेंबरला दुपारी 12.23 ते संध्याकाळी 7.23 वाजेपर्यंत आहे.ज्येष्ठा गौरी आवाहन विधी 

                परंपरेनुसार ज्या महिला गौरी घरात घेऊन येत असतात त्यांचे पाय दुध आणि पाण्याने धुवावे आणि त्यांचा पायावर कुंकाने स्वस्तिक देखील काढला जातो. घरच्या उंबऱ्यावर आत येताना पाच धान्याचे ग्लास भरून ठेवावे आणि पाच पावले ग्लास ओलांडून लक्ष्मीच्या पावलांचे ठसे उमठवावे. यानंतर शंख वाजवून गौरीचं घरात आगमन करावे. गौरीची स्थापना करण्यापूर्वी त्यांना घरातील देवघरासमोर ठेवून घरात ऐश्वर्य नांदो आणि वैभव निर्माण होऊन सुख-समृध्दी येवो अशी प्रार्थना करावी.  

       या नंतर गौरीची स्थापना करावी. म्हणजे गौरीला साडी, दागिने घालून सजवा आणि पहिल्या दिवशी गौराईला भाजी-भाकरीचा नैवेद्य दाखवावा. 


ज्येष्ठा गौरी पूजन 

           गौराईच्या आगमनाच्या दुसऱ्या दिवशी गौरी पूजन करण्याची परंपरा आहे. यादिवशी सकाळी गौरींची पूजा आरती करून बनवलेले सर्व फराळ जसे की रव्याचे लाडू, शंकरपाळ्या, शेव, करंजी, चकली इ. सर्वांचा नैवेद्य दाखवावा. दुपारी पूरण पोळी, सोळा भाज्या एकत्र कराव्यात, देव फळ, आंबड्याची भाजी, कडी, शेंगदाण्याची चटणी, डाळीची चटणी, पापड, भजी, इ. बनवून नैवेद्य दाखवावा.

                सायंकाळी हळदी-कुंकाचा कार्यक्रम ठेवावा. महाराष्ट्रातील अनेक भागात गौरी पूजनाच्या दिवशी नातेवाईक आणि ओळखीच्या लोकांना जेवण्यासाठी बोलवण्याची परंपरा देखील आहे.  


ज्येष्ठा गौरी विसर्जन 

                तिसऱ्या दिवशी गौरीच विसर्जन केलं जातं. या दिवशी सकाळी सुतात हळदी, कुंकू, बेल फळ, झेंडूची पाने, झेंडूची फुले, काशी भोपळा, फूल, रेशमी धागा यांचे प्रत्येकी एक एक गाठ बांधून गाठी तयार कराव्यात. गौरी महालक्ष्मीच्या ओठीत किंवा डोक्यावर ठेवा नंतर गौरी महालक्ष्मीची आरती करून गूळ आणि गोड शेवयांचा नैवेद्य दाखवावे आणि गौरीचं विसर्जन करावे.Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!