Farming Ideas:- युरिया (Urea) ऐवजी गोमुत्राचा या पद्धतीने वापर करा आणि मिळवा भरघोस उत्पन्न…

             गोमूत्र हे नायट्रोजन (Nitrogen) ची कमतरता पूर्ण करते. त्यामुळे इतर खतांपेक्षा जैविक खतांचा वापर करणे शेतकऱ्यांसाठी कधीही फायद्याचेच आहे.

   


            रासायनिक खते हे जमिनीच्या  आरोग्यासाठी हानिकारक असतात. त्यामुळे शक्यतो नैसर्गिक खतांचा वापर करायला हवा. जेणेकरून जमिनीचे आरोग्य सुधारेल आणि तसेच पिकांची चांगली वाढ होऊन अधिक नफा मिळवता येईल. जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब भरपूर प्रमाणात पाहिजे. त्यामुळे जमिनीत हवा आणि ओलाव्याचे योग्य प्रमाण टिकून राहत असते. उपयुक्त जिवाणू, बुरशी आणि इतर जिवांची चांगली वाढ होते.



        युरिया (Urea) जमिनीत मिसळल्यानंतर त्याचा पाण्याबरोबर संपर्क होताच तो त्वरित विरघळत असतो. त्यातील नत्र पिकांना उपलब्ध होण्याची क्रिया तत्काळ सुरू होत असते. मात्र, पाण्याचे प्रमाण अधिक असल्यास होणाऱ्या निचऱ्यासोबतच जमिनीत खोलवर जातो किंवा प्रवाहासोबत वाहून जात असतो. परिणामी भूजल किंवा परिसरातील स्रोत प्रदूषित होत असतात. जमिनीवर विरघळण्याच्या प्रक्रियेमध्ये ऑक्सिजनशी संपर्क झाल्यानंतर त्यातून नायट्रस ऑक्साइड (Nitrous oxide) तयार होऊन हवेत निघून जातो. यामुळेच वातावरणामध्ये प्रदूषणाचे प्रमाण वाढलेले आहे. अश्यात युरियाच्या ऐवजी आपण जर गोमुत्राचा वापर केला तर त्यामुळे पिकाला आणि तसेच जमिनीला कोणत्याही प्रकारचे नुकसान होत नाही. 





युरियाच्या ऐवजी गोमूत्र वापरणे कितपत योग्य आहे ?


        गोमूत्रामुळे पिकाला कोणत्याही प्रकारची हानी होत नाही. याचा वापर कीटकनाशक (Pesticides) म्हणून देखील केला जातो. गोमूत्रामध्ये नायट्रोजन (Nitrogen) सोबत काही प्रमाणात फॉस्फरस (Phosphorus) देखील उपलब्ध असून नायट्रोजन हे पिकांसाठी अत्यंत महत्वाचे असते.


          युरियामध्ये मोठ्या प्रमाणात नायट्रोजन (Nitrogen) उपलब्ध असल्यामुळे शेतकरी हे युरियाचा वापर करत असतात. परंतु आता युरियाची टंचाई निर्माण होऊ लागली आहे. शेतकरी हे पिकांची वाढ उत्तम व्हावी म्हणून युरियाचा वापर करत असतात. युरियामध्ये जवळपास ४६% पर्यंत नायट्रोजन (Nitrogen) उपलब्ध असते, असे कृषी वैज्ञानिकांनी (Agricultural Scientist) सांगितले आहे. मात्र आता युरियाच्या ऐवजी गोमूत्र देखील वापरता येते हे वैज्ञानिकांनी तपासून सांगितले आहे.


         गोमूत्र नायट्रोजन (Nitrogen) ची कमतरता पूर्ण करतो. त्यामुळे इतर खतांपेक्षा जैविक खता (Organic Fertilizers) चा वापर करणे शेतकऱ्यांसाठी फायद्याचे आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!