Farming:- इंदापूरमध्ये पिकवले आहे पांढऱ्या जांभूळाचे पीक

               आपण आजपर्यंत फक्त जांभळ्या  रंगाचे जांभळाचे पीक पाहिलेले असेल. परंतु इंदापूर तालुक्यामधील भारत लाळगे या शेतकऱ्याने पांढऱ्या रंगाचे जांभूळ शेतात पिकवले आहे. पांढऱ्या रंगाच्या जांभूळ पिकाची लागवड करणारे भारत लाळगे हे राज्यातील पहिले शेतकरी असल्याचा देखील त्यांचा दावा आहे. लाळगे यांच्या पांढऱ्या जांभूळ पिकाला सध्या 400 रुपये प्रतिकिलो पर्यंत दर मिळत आहे.

इंदापूरमध्ये पिकवले पांढऱ्या जांभूळाचे पीक



          एकूण 23 एकरापैकी 1 एकर जमिनीवर पांढऱ्या रंगाच्या जांभळाची लागवड भारत लाळगे यांनी केलेलि आहे. एकरी 302 रोपांची लागवड भारत लाळगे यांनी केली आहे. याआधी भारत लाळगे हे डाळिंब आणि पेरु या पिकाची लागवड करत होते. परंतु लाळगे यांना डाळिंब या पिकात सतत चार वर्ष तोटा सहन करावा लागला. म्हणून 2019 साली पेरुच्या पिकात त्यांनी पांढऱ्या रंगाच्या जांभुळाची आंतरपीक म्हणून लागवड केली होती.


        कमी पाण्यात आणि कमी खर्चातच हे जांभळाचे पीक घेतलं जातं. सध्या जांभळाची हार्वेस्टिंग देखील सुरु आहे. ज्याची मार्केटला किंमत 300 रुपयांपासून 400 रुपये प्रतिकिलो आहे. या जांभूळ पिकामध्ये अ आणि क जीवनसत्त्व (Vitamins A and C) असल्याचं तज्ज्ञ सांगतात. तसंच पांढऱ्या रंगाच्या जांभळात विविध औषधी गुण असल्याचे देखील तज्ज्ञांचं म्हणणं आहे.



           पूर्वी माळरानावर रानामेव्याची झाडं असायची. परंतु आता कालांतराने शहरीकरण वाढत गेलं आणि त्यामुळे रानमेवा कमी होऊ लागला. त्यामुळे आता हाच औषधी रानमेवा मिळवण्यासाठी त्याचीच शेती करावी लागत आहे. भारत लाळगे यांनी 1 एकरावर जांभूळ या पिकाची लागवड केलेली आहे. त्यातून त्यांना सध्या चांगलं उत्पन्न देखील मिळत आहे.


       

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!