Everest base camp:- मुंबईच्या रिदमचा वयाच्या दहाव्या वर्षी ‘एव्हरेस्ट विक्रम (Everest record)’; ठरली पहिलीच भारतीय…

 मुंबई: मुंबईतील वरळी येथील राहणाऱ्या दहा वर्षीय रिदम मामनिया (rhythm mamania) या मुलीने ‘एव्हरेस्ट’ शिखराचा बेस कॅम्प (Everest base camp ) सर करण्याचा विक्रम केला आहे. रिदम हीने ५३६४ मीटर उंचीला गवसणी घातली असून, इतक्या लहान वयात इतकी उंची सर करणारी ती पहिलीच भारतीय आहे. 


मुंबईच्या रिदमचा वयाच्या दहाव्या वर्षी ‘एव्हरेस्ट विक्रम (Everest record)’; ठरली पहिलीच भारतीय…


        रिदम मामनिया ही वांद्रे येथील एमईटी ऋषीकुल विद्यालयातील पाचव्या इयत्तेत शिकत आहे. तिच्या या साहसाच्या वेळी तिचे आईवडील हर्षल आणि उर्मी, हे देखील तिच्यासोबत होते. हे गिर्यारोहण (Mountaineering) महिनाभराचे होते. त्यापैकी बेस कॅम्पचा ट्रेक (Base camp trek) हा ११ दिवसांचा होता. रिदमचे गिर्यारोहण सोपे नव्हते. बेस कॅम्पच्या ट्रेक दरम्यान रिदम वेगवेगळ्या हवामानाच्या परिस्थितीत दररोज आठ ते नऊ तास चालत असे. त्यामध्ये अनेकदा गारपीट (Hailstorm), हिमवादळे (Blizzards) व हिमवृष्टी (Snowfall) देखील होत असत. उणे १० अंश सेल्सिअस तापमान असे. मग त्यात देखील हिमतीने वाटचाल करीत तिने विक्रमाला गवसणी घातली. 


        रिदम मामनिया ही प्रत्यक्षात एक स्केटिंग (Skating) खेळाडू आहे. ‘स्केटिंग (Skating) सोबतच गिर्यारोहण (Mountaineering) ही माझी आवड आहे. अशाप्रकारच्या या ट्रेकने मला एक जबाबदार गिर्यारोहक बनणे आणि डोंगरावरील कचरा व्यवस्थापनाची समस्या सोडवणे हे किती महत्त्वाचे आहे हे देखील शिकवले’, असे ती म्हणाली. रिदमला वयाच्या पाचव्या वर्षापासून पर्वतारोहणा (Mountaineering) ची आवड होती आणि तिचा पहिला लांबचा २१ किमीचा ट्रेक हा गोवा-कर्नाटक सीमेवरील दूधसागर हा होता. तेव्हापासून तिने माहुर्ली, सोंडई, कर्नाळा आणि लोहगड यासारख्या सह्याद्री पर्वतरांगांमधील काही शिखरे देखील सर केली आहेत. 


        बेस कॅम्प (Base camp) वर पोहोचल्यानंतर, ग्रुपच्या इतर सदस्यांनी परतीच्या वाटेवर हेलिकॉप्टर (Helicopter) घेण्याचे ठरवले. परंतु रिदमने त्याच मार्गाने तिला खाली उतरण्याचा आग्रह धरला. म्हणून आम्ही चौघांनी आलो त्या मार्गाने शिखरावरुन खाली उतरण्याचा निर्णय घेतला. असे सहसा कधीच होत नाही. खूप कमी गिर्यारोहक विक्रम केल्यावर हेलिकॉप्टरने परतत असतात. पण रिदमच्या इच्छाशक्तीच्या जोरावर आम्ही डोंगर उतरत खाली आलो’, असे उर्मी यांनी सांगितले. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!