Dragon fruit: हे फळ आरोग्यासाठी खूपच महत्वाचे आहे, जाणून घ्या याचे 5 आरोग्यदायी फायदे

Dragon Fruit Health Benefits: अनेकवेळा आपण फळे खाण्याला अधिक प्राधान्य देत असतो. मात्र, आरोग्याच्या दृष्टीने कोणती फळे खायला हवीत, हे तुम्हाला माहिती आहे का?

Dragon Fruit Health Benefits:  

               फळांचे फायदे सर्वांना माहीतच आहेत. सर्व फळांचे स्वतःचे वेगवेगळे गुणधर्म असतात, जे आपल्या शरीराला पोषक घटक देत असतात. आज आम्ही अशाच एका फळाबद्दल सांगणार आहोत, ज्याबद्दल फारच कमी लोकांना माहिती आहे. ‘ड्रॅगन फ्रूट’ असे या फळाचे नाव आहे. हे फळ आपल्याला निरोगी ठेवण्याबरोबरच शरीरातील अनेक समस्या दूर करण्यास मदत करू शकते. मार्केटमध्ये याची किंमत 400 ते 500 रुपये प्रति किलो एवढी आहे. जरा वेगळे दिसणारे हे फळ आरोग्याच्या दृष्टीने देखील खूपच फायदेशीर आहे.




‘ड्रॅगन फ्रूट’ खाण्याचे 5 फायदे 


1. डायबिटीजसाठी खूप फायदेशीर

                      मधुमेह हा सर्वात धोकादायक आजारांपैकीच एक आहे. ड्रॅगन या फ्रूटमध्ये नैसर्गिक Antioxidants तसेच Flavonoids , Phenolic acid, ascorbic acid आणि Fiber देखील असतात. ते शरीरातील साखरेचे प्रमाण कमी करण्यास मदत करत असतात. ज्यांना मधुमेह नाही त्यांच्यासाठी ड्रॅगन फ्रूट खाणे हा मधुमेह टाळण्यासाठी एक उत्तम असा पर्याय आहे.


2. हृदयविकार टाळण्यासाठी  

               मधुमेहामुळे हृदयविकार होणे ही एक सर्वसामान्य समस्या आहे. कारण शरीरात Oxidative stress चा प्रभाव वाढतो. आणि अशा परिस्थितीत Antioxidant गुणधर्मांनी युक्त असलेले फळे आणि भाज्या खाण्याचा सल्ला डॉक्टर देत असतात. यासाठी तुमच्याकडे फळांमध्ये एक उत्तम पर्याय असतो तो म्हणजेच ‘ड्रॅगन फ्रूट’.


3. कर्करोग प्रतिबंधासाठी ड्रॅगन फ्रूट

         संशोधनानुसार, ‘ड्रॅगन फ्रूट’ कर्करोगासारख्या घातक आजारातही आराम देते. त्यात Tumor, Antioxidant आणि दाहक-विरोधी असे विशेष गुणधर्म आहेत. ड्रॅगन फ्रूटमध्ये आढळणारे हे विशेष गुणधर्म महिलांना स्तनाच्या कर्करोगापासून वाचवतात. याबाबत अनेक संशोधनांमध्ये सिद्ध झालेले आहे.



4. कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहील 

              कोलेस्टेरॉलवर नियंत्रण ठेवणे देखील आजकाल आव्हान बनले आहे. तुमच्या वाढलेल्या कोलेस्ट्रॉलमुळे शरीरात अनेक गंभीर आजार होन्याची शक्यता असते. यामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक येण्याचा धोका जास्त असतो. यासाठी ‘ड्रॅगन फ्रूट’ चे सेवन खूपच फायदेशीर ठरू शकते.


5. पोटाच्या समस्या दूर होतात

                 पोटाच्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी ‘ड्रॅगन फ्रूट’ चे सेवन केले जाऊ शकते. त्यात असणाऱ्या Prebiotics of oligosaccharides  गुणधर्म आतड्यांतील निरोगी जीवाणूंना प्रोत्साहन देत असतात. यामुळे पचनसंस्था निरोगी राहण्यास मदत होत असते.




Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!