Disel-Petrol Rate | केंद्र सरकार (Central Government) चा मोठा दिलासा, पेट्रोल आणि डिझेल होणार स्वस्त…

 नवी दिल्ली : इंधनाच्या दरात दररोज होणाऱ्या वाढीमुळे सर्वसामान्य लोकांच्या खिशाला जाळ लागला होता. मात्र आता केंद्र सरकार (Central Government) ने इंधन दरवाढीने पिचलेल्या सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा दिला आहे. पेट्रोल-डीझेल (Petrol-diesel) स्वस्त झालं आहे. मोदी सरकारने हा मोठा निर्णय घेतलेला आहे. (central government reduce excise duty on petrol and disel per litre also give 200 rupees subsidy in ujjwala Yojana)          डीझेल 7 रुपये तर पेट्रोल 9 रुपये 50 पैशा ने स्वस्त झालं आहे. केंद्रीय अबकारी कर (Central Excise Tax) कमी केल्यामुळे पेट्रोल -डीझेलचे दर स्वस्त झालेले आहे. तसेच उज्जवला गॅस योजनेद्वारे मिळणाऱ्या सिलेंडरचे दर देखील 200 रुपयांनी स्वस्त झाले आहे. केंद्रीय अर्थमंत्री (Union Finance Minister);निर्मला सीतारमन यांनी याबाबतची माहिती दिली.


राज्याच्या भूमिकेकडे लक्ष (Attention to the role of the state)

          केंद्र सरकार (Central Government) ने इंधनाचे दर स्वस्त केलेले आहेत. यानंतर आता सर्वसामांन्याचं राज्य सरकारच्या भूमिकेकडे लक्ष लागलेलं आहे. केंद्र सरकार (Central Government) पाठोपाठ राज्य सरकार (State Government) उत्पादन शुल्क आणि व्हॅटच्या दरात कपात करुन सर्वासामांन्याना दिलासा देणार का, याकडे लक्ष असणार आहे. 


सीमाशुल्क देखील कमी 

           “आमची आयात अवलंबित्व जास्त असलेल्या प्लास्टिक उत्पादनांसाठी आम्ही कच्चा माल आणि मध्यस्थांवरील सीमाशुल्क देखील कमी करत आहोत. स्टीलच्या काही कच्च्या मालावरील आयात शुल्क कमी केले जातील. तसेच काही स्टील उत्पादनांवर देखील निर्यात शुल्क आकारलं जाईल”, अशी माहिती केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली आहे. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!