Diabetes Diet | रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी जांभूळ अमृतासमान….

           जांभळामध्ये  जंबोलीन (Java Plum) नावाचे एक रासायनिक घटक असते ते रक्तातील साखरेची पातळी (Sugar level ) कमी करण्यास आणि इन्सुलिनची संवेदनशीलता (Insulin sensitivity) वाढविण्यात मदत करत असते.

        उन्हाळ्याच्या दिवसात काळ्या रसाळ जांभूळाची आंबट-गोड चव मन प्रसन्न करत असते. ते खाण्यात मजा तर येतेच पण शिवाय अनेक आजारांवर त्यांचा उपचार देखील केला जातो. त्याचे सेवन केल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण (Sugar Level) नियंत्रित होते तसेच रक्तदाब (Blood pressure) देखील सामान्य होतो. जांभळामध्ये कर्बोदक (Carbohydrate), प्रथिने(Protein), चरबी(Fat), कॅल्शियम(Calcium), मॅग्नेशियम(Magnesium), फॉस्फरस(Phosphorus), पोटॅशियम(Potassium), सोडियम(Sodium), लोह(Iron), व्हिटॅमिन सी(Vitamin C), थायमिन(Thiamine), राइबोफ्लेविन(Riboflavin), नियासिन(Niacin), अँटी-ऑक्सिडेंट्स(Anti-oxidants) आणि व्हिटॅमिन बी ६(Vitamin B6) भरपूर प्रमाणात असतात. यांचा आरोग्यासाठी खुप उपयोग होतो.



            फायबरयुक्त जांभळाचे सेवन केल्यामुळे पचनक्रिया चांगली राहते आणि बद्धकोष्ठता दूर होते. जांभळाचे सेवन केल्याने साखर कशी नियंत्रणात राहते आणि त्याचे फायदे काय आहेत हे जाणून घेऊया…

साखर नियंत्रित करते –

           औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेल्या जांभळांनी अनेक आजारांवर उपचार करता येतात. यात असलेल्या जंबोलीन नावाच्या घटकामुळे रक्तातील साखर (Blood Sugar) कमी करण्यास आणि इन्सुलिनची संवेदनशीलता (Insulin sensitivity) वाढविण्यात मदत होते. प्रथिने, फायबर, अँटिऑक्सिडेंट्स, कॅल्शियम, लोह, फॉस्फरस, पोटॅशियम, मँगनीज, व्हिटॅमिन सी आणि बी ६ आदी घटकांचे जांभूळ आगार आहे. उन्हाळी आहारात या फळाचा समावेश करून आरोग्य उत्तम प्रकारे सुधारता येते.


मधुमेहावर प्रभावी –

            मधुमेहामुळे वारंवार लघवी होऊन तहान लागत असते. मधुमेहाच्या रुग्णांनी जर जांभळ खाल्ली तर मधुमेहाची ही लक्षणं कमी होण्यास देखील मदत होते. हे टाइप २ मधुमेहाची सुरुवात देखील रोखू शकते.


हिमोग्लोबिन वाढवते –

                   व्हिटॅमिन सी आणि लोह यांनी समृद्ध असलेल्या जांभळामुळे हिमोग्लोबिन देखील वाढते. या फळात असलेले लोह हे रक्त शुद्ध करत असते आणि हिमोग्लोबिन हे सर्व भागांना ऑक्सिजन पोहोचवत असते.


हृदयाचे आरोग्य सुधारते –

             पोटॅशियमयुक्त(Potassium rich) जांभळ रक्तवाहिन्यांची काळजी घेऊन उच्च रक्तदाब (Hypertension), हृदयरोग (Heart disease) आणि स्ट्रोक(Stroke) या सारख्या आजारांना दूर ठेवण्यास मदत करत असते.


वेदनांवर उपचार करते –

पोटदुखी आणि सांधेदुखीसाठी जांभूळ हे अत्यंत उपयुक्त घरगुती औषध आहे.

हे फळ जुलाब आणि पोट फुगणे यासारख्या पाचन समस्या कमी करण्यास देखील उपयुक्त ठरत आहे.

वापर कसा करावा –

जांभूळ हे एक असे फळ आहे जे थेट धुवून खाणे देखील फायदेशीर ठरते. त्याचा रस बनवून देखील तुम्ही पिऊ शकता.

बिया सुकवून पावडर बनवा आणि त्याचा वापर करा, साखर नियंत्रित होते.

जांभूळ सालाचा काढा प्यायल्याने पोटदुखी आणि अपचनासारख्या समस्या दूर करण्यासाठी देखील या जांभूळाचा रस बनवून देखील वापर करू शकतात.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!