Cotton Price update : शेतकऱ्यांची चिंता वाढली, कापसाच्या दरात दीड हजार रुपयांची घसरण

Cotton Price update : गेल्या 10 दिवसांमध्ये जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात कापसाच्या दरात दीड हजार रुपयांची घसरण झाल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

👉रोज कापसाचे दर बगण्यसाठी इथे क्लिक करा👈

Cotton Price update : सध्या राज्यातील कापूस उत्पादक शेतकरी (Cotton Farmers) चिंतेत आहेत. कारण सातत्यानं कापसाच्या दरात (Cotton Price) घसरण होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. गेल्या 10 दिवसांमध्ये जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात कापसाच्या दरात दीड हजार रुपयांची घसरण झाल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. कापसाचे दर हे नऊ हजार रुपयांवरुन 7 हजार 500 ते 7 हजार 800 रुपयांवर आले आहेत. विशेष म्हणजे शेतकऱ्यांनी विक्रीसाठी कापूस बाजारात आणलेला नसतानाही गेल्या दहा दिवसात कापसाच्या दरात एवढी घसरण झाली आहे.

मागील हंगामत कापसाचा विक्रमी 12 हजार रुपयांचा दर मिळाला होता

मागील वर्षी कापूस हंगाम संपण्याच्या मार्गावर असताना कापसाला कधी नव्हे तर ते 12 हजार रुपये इतका विक्रमी भाव मिळाला होता. त्यामुळं यंदा देखील शेतकऱ्यांना ही वाढ मिळेल अशी अपेक्षा होती. दर वाढेल या आशेनं शेतकऱ्यांनी कापसाची विक्री न करता कापूस घरातच राखून ठेवणे पसंत केले आहे. मात्र, शेतकऱ्यांचा कापूस बाजारात आलेला नसतानाही सातत्यानं कापसाच्या दरात घसरण होत आहे. दरात घसरण झाल्यानं शेतकरी चिंतेत आहेत. त्यामुळं कापसाच्या दरात कधी वाढ होणार याची शेतकरी वाट बघत आहेत.

👉महिन्याला तुमच्या बँक अकाऊंट येऊ शकतात ₹ 3000👈

Cotton Price update जागतिक बाजारपेठेत कापसाच्या दरात घसरण

दरम्यान, जागतिक पातळीवर कापसाचे दर घसरले आहेत. त्याचा परिणाम म्हणून कापसाच्या दरात घसरण होत असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. जळगाव जिल्ह्यात जवळपास वीस लाख गाठी कापसाची निर्यात थांबली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांचा सातशे कोटी रुपयांचा कापूस हा घरात अडकून पडला असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे. जागतिक बाजारपेठेत कापूस दरात झालेली घसरण ही शेतकऱ्यांच्या चिंता वाढवणारी ठरली आहे.

✨तुम्हाला मिळू शकतात 500000 चा मोफत उपचार✨

Cotton Price update अतिवृष्टीचा मोठा फटका

यावर्षी राज्यात अनेक जिल्ह्यात अतिवृष्टी झाली होती. याचा मोठा फटका शेती पिकांना बसला होता. शेतकऱ्यांच्या हाती आलेली उभी पीक या अतिवृष्टीनं वाया गेली होती. वाया गेलेल्या पिकांमध्ये कापूस, सोयाबीन, फळबागा, भाजीपाला या पिकांचा समावेश होता. यामध्ये सर्वात मोठा फटका विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या पिकांना बसला होता. काही ठिकाणी तर पिकांबरोबर जमिनी देखील खरवडून गेल्या होत्या. त्यामुळं शेतकऱ्यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला होता. अशा अतिवृष्टीच्या तडाख्यातूनही काही शेतकऱ्यांची पीक वाचली होती. ती पीक आता बाजारात विक्रीसाठी येत आहेत. मात्र, सध्या शेतीमालाला योग्य प्रकारचा दर मिळत नसल्यानं शेतकरी सकटात सापडला आहे. आधीच शेतकऱ्यांवर कर्जाचा बोजा आहे. त्यातच शेतमालाला दर मिळत नसल्यानं शेतकरी चिंतेत आहेत. यातूनच शेतकरी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलत असल्याचं चित्र दिसत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!