निरोगी जीवनशैलीसाठी आयुर्वेदात खजूर खाण्याला खूपच महत्व आहे. रोज 2 खजूर खाल्ल्ये तर तब्येतीच्या अनेक तक्रारी दूर होतात, गंभीर आजारांचा धोका देखील कमी होतो.
रोज खजूर खाल्ल्ये तर.
1. खजूर खाल्ल्याने शरीराला तात्काळ ऊर्जा मिळत असते. 100 ग्रॅम खजूर खाऊन 277 कॅलरीज मिळतात. खजूरातून शरीराला पोटॅशियम(Potassium), मॅग्नेशियम(Magnesium), काॅपर(Copper), मॅगनीज(Manganese), लोह(Iron) ही खनिजं आणि ब हे जीवनसत्व मिळतं.
2. खजुरात असलेल्या फायबरचा उपयोग हा पचनक्रिया सुधारण्यासाठी होतो. खजूर खाल्ल्यामुळे बध्दकोष्ठतेचा त्रास देखील होत नाही. पोट भरपूर वेळ भरलेलं राहात असत. वजन आटोक्यात ठेवण्यासाठीही खजुराचा उपयोग केला जातो.
3. खजुरातील अँटिऑक्सिडंट्स (Antioxidants) मुळे गंभीर आजारांपासून संरक्षण होत असते. सुकामेव्यामध्ये खजुरात सर्वात जास्त ॲण्टिऑक्सिडण्टस (Antioxidants) असतात. खजुरात असलेल्या फ्लेवोनाॅइडस (Flavonoids) या ॲण्टिऑक्सिडण्टस(Antioxidants) मुळे मधुमेह(Diabetes), अल्झायमर(Alzheimer’s) आणि कर्करोगाचा(Cancer) धोका कमी होतो. खजुरात असलेल्या कॅरेटोनाॅइड(Carotenoids) या ॲण्टिऑक्सिडण्टसमुळे ह्दयाचे आणि डोळ्याचे आरोग्य चांगलं राहातं. खजुराचा फायदा मेंदूविकासासाठी देखील होतो.
4. गरोदरपणात नैसर्गिक प्रसूती होण्यासाठी देखील खजुर खाण्याचा खूप फायदा होतो. तसेच प्रसूती काळातील वेदनांमुळे आलेला अशक्तपणा देखील खजुराचा आहारात समावेश केल्यामुळे दूर होतो.
5. खजुरात फ्रक्टोज(Fructose) ही साखर असते. साखर न वापरता पदार्थांमध्ये गोडवा येण्यासाठी देखील खजुराचा वापर खूप आरोग्यदायी ठरतो. आहारातील साखरेचं प्रमाण कमी करण्यासाठी खजुराचा उपयोग केल्यामुळे वजनही आटोक्यात राहात असत. खजुराचा ग्लायसेमिक इंडेक्स (Glycemic index) कमी असतो. म्हणजेच खजूर खाल्ल्यामुळे रक्तातील साखर लगेच वाढत नाही. साखर नियंत्रित ठेवण्यासाठी खजुराचा फायदा होतो.
6. खजुरामध्ये असलेल्या कॅल्शियम(Calcium) आणि फाॅस्फरस (Phosphorus) चा फायदा हाडांचं आरोग्य सुधारण्यासाठी होत असतो. हाडं मजबूत ठेवण्यासाठी देखील खजुराचा उपयोग होतो. खजूर नियमित खाल्यामुळे हाडांच्या विकाराचा धोका टाळता येतो.
7. खजुरात असलेल्या क जीवनसत्वामुळे त्वचा चांगली राहाण्यासही मदत होते आणि ब जीवनसत्वामुळे केस गळती रोखण्यासाठीही खजुराचा उपयोग होतो.
8. खजुरात लोहाचं प्रमाण खूपच जास्त असतं. त्यामुळे नियमित खजूर खाल्ल्यामुळे हिमोग्लोबीन (Hemoglobin) चं प्रमाण वाढतं. रोजच्या आहारात खजूर असेल तर ॲनेमिया (Anemia) चा धोका टळतो.