Benefits of Coriander : दररोज सकाळी रिकाम्या पोटी धण्याचे पाणी पिण्याचे फायदे…

 धण्यामध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-के, व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन-ई देखील चांगल्या प्रमाणात असतात.

मुंबई : भारतीय स्वयंपाकघरात अनेक प्रकारचे मसाले वापरले जात असतात, जे केवळ जेवणाची चवच वाढवत नाहीत, तर त्याचे आपल्या शरीराला देखील अनेक फायदे होत असतात. यामध्ये ओवा, लवंग, दालचिनी, धणे यां सगळ्याच खड्या मसाल्यांचा समावेश होतो. परंतु आज आपण धण्यांबद्दल माहिती घेणार आहोत. धण्याचे सेवन हे आरोग्यासाठी खूपच फायदेशीर मानले जाते. पण तुम्ही जर सकाळी रिकाम्या पोटी धण्याचं पाणी सेवन केले, तर ते अनेक समस्यांवर चांगला रामबाण उपाय म्हणून काम करते. याच्या सेवनाने अनेक आजार दूर होतात.

             धण्यामध्ये Vitamin-A, Vitamin-K, Vitamin-C, Vitamin-E देखील चांगल्या प्रमाणात असतात. याशिवाय लोह (Iron), कॅल्शियम (Calcium) आणि मॅग्नेशियम(Magnesium) घटकही मुबलक प्रमाणात असतात. जे आरोग्याच्या दृष्टीने खूपच फायदेशीर ठरतात.


Benefits of Coriander            रिकाम्या पोटी धन्याच्या सेवनामुळे अनेक फायदे होत असतात. आता हे फायदे कोणते ते जाणून घेऊया…1. त्वचेसाठी फायदेशीर

          धण्याचे पाणी त्वचेसाठी देखील खूप फायदेशीर मानले जाते. कारण यामध्ये अँटी-फंगल (Anti-fungal) आणि अँटी-बॅक्टेरियल (Anti-bacterial) गुणधर्म आढळतात. त्यामुळे याचे सेवन केल्यामुळे त्वचेशी संबंधित अनेक समस्या दूर होतात. तसेच त्वचा निरोगी आणि चमकदार देखील बनते.

दररोज सकाळी रिकाम्या पोटी धण्याचे पाणी पिण्याचे फायदे…
2. प्रतिकारशक्ती वाढवते

            धण्याच्या पाण्यात अँटिऑक्सिडंट (Antioxidant) गुणधर्म मुबलक प्रमाणात आढळत असतात. म्हणूनच याचे सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती (Immunity) मजबूत होते. ज्याद्वारे तुम्ही कोणत्याही प्रकारचे  जंतुसंसर्ग (Viral infection) बर्‍याच प्रमाणात टाळू शकतात.3. वजन कमी होणे 

         धण्याचे पाणी वजन कमी करण्यासाठी देखील खूप उपयुक्त ठरते. कारण या पाण्यात असे अनेक प्रकारचे घटक असतात, जे चयापचय प्रक्रिया (Metabolic process) गतिमान करतात. त्यामुळे शरीरातील चरबी कमी होन्यास मदत होते.


4. पोटासाठी फायदेशीर

         धण्याचे पाणी पोटासाठी अतिशय फायदेशीर मानले जाते. कारण त्यात फायबरचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे रोज सकाळी रिकाम्या पोटी जर त्याचे पाणी सेवन केले तर पचनक्रिया मजबूत होते. आणि यासोबतच बद्धकोष्ठतेची तक्रार (Complaints of constipation) ही दूर होते.5. कोलेस्ट्रॉल कमी करणे

         धण्याचे पाणी कोलेस्ट्रॉलची पातळी (Cholesterol levels) कमी करण्यास देखील मदत करते. कारण धणे हे औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असे आहेत. त्यामुळे ज्या लोकांचे कोलेस्ट्रॉल वाढलेले आहे, त्यांनी रोज सकाळी रिकाम्या पोटी धण्याच्या पाण्याचे सेवन करायला हवे.


6. शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते

               धण्याचे पाणी हे आरोग्यासाठी खूपच फायदेशीर ठरते. कारण धण्याचे पाणी शरीरातील विषारी पदार्थ (Toxic substances) बाहेर टाकण्यास मदत करत असते.7. साखर नियंत्रणात राहते

         धण्याचे पाणी मधुमेहाच्या रुग्णांसाठी (Patients with diabetes) देखील खूप फायदेशीर ठरते. कारण याच्या सेवनाने साखरेची पातळी (Sugar level) ही नियंत्रणात राहते.


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!