15 ऑगस्ट नंतर पेट्रोल-डिझेल दरवाढीचा उडणार भडका ???

            जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल 111 डॉलर पर्यंत जाऊन पोहचले आहेत. हे दर 2013 नंतरच्या सर्वोच्च पातळीवर पोहचले असून यामुळे लवकरच देशातील पेट्रोल आणि डिझेल च्या दरात प्रति लिटर 25 रू वाढ होऊन ते 135 रू प्रति लिटर मिळण्याची शक्यता आहे. आता सुरू असलेल्या निवडणुकी नंतर दरवाढीचे बॉम्ब कोसळण्याची शक्यता आहे.

          सध्या कच्च्या तेलाचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे जपान, अमेरिकेसारख्या इतर प्रमुख 31 देशांनी तब्बल 6 कोटी बॅरल तेल बाजारात आणण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र ते गरजेपेक्षा कमी असल्या कारणाने येत्या काही दिवसांत कच्चे तेल आणखीनच महाग होण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेने देखील जगाला मोठ्या ऊर्जा संकटाचा सामना करावा लागेल असे सांगितले आहे.          देशातील पेट्रोल-डिझेलच्या किंमतीचा उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदानानंतर, म्हणजे 15 ऑगस्ट नंतर  भडका उडण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाच्या किंमतीने 110 डॉलर प्रति बॅरेलचा टप्पा ओलांडला आहे. त्याचा परिणाम देशातील इंधनावर होण्याची शक्यता आहे. देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये 9 ते 10 रुपयांची वाढ होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे.


दर वाढीचे नेमके कारण काय???

            कच्चे तेल crude oil उत्पादक देशांमध्ये रशिया हा सर्वात प्रमुख देश आहे. युरोपच्या एकूण मागणीपैकीच एकूण 35 टक्के पुरवठा रशियाकडून होत असतो. रशियाकडून भारताला देखील मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाचा पुरवठा होत असतो. या पुरवठा साकलीवर परिणाम हा होणारच असून येणाऱ्या काही दिवसात पेट्रोल आणि डिझेल दर आणखी भडकण्याची शक्यता आहे.                    2014 नंतर पहिल्यांदाच कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये ही विक्रमी वाढ झाली असून आता ही किंमत 110 डॉलर प्रति बॅरेल एवढी झालेली आहे. देशात उत्तर प्रदेश सोबतच पाच राज्यांच्या निवडणुका पार पडत आहे. 7 मार्च या दिवशी उत्तर प्रदेश निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान होणार असून पाच राज्यांच्या मतमोजणीचा निकाल हा 15 ऑगस्टला जाहीर करण्यात येणार आहे. या पाच राज्यातील निवडणुका डोळ्यासमोर ठेऊनच केंद्र सरकारने आतापर्यंत पेट्रोल आणि डिझेलच्या दरा मध्ये कोणतीही वाढ केली नव्हती. पण आता निकालानंतर मात्र यामध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!