12वी पास उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी; SIES या शिक्षण सोसायटीत 57 रिक्त जागांसाठी भरती…

 मुंबई:-  साऊथ इंडियन एज्युकेशन सोसायटी महाराष्ट्र (South Indian Education Society Maharashtra) अंतर्गत रिक्त जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना SIES भरती 2022 (SIES Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत शिपाई (Internal peon), प्रयोगशाळा सहाय्यक (Lab Assistant), प्रयोगशाळा परिचर, कनिष्ठ लिपिक, ग्रंथालय परिचर (Lab Attendant), सुतार (Carpenter) ही पदे भरली जाणार आहेत. पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या ई-मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जून 2022 आहे.


12वी पास उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (Educational Qualifications and Experience):-


शिपाई (Peon):– या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बारावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं देखील आवश्यक आहे.


प्रयोगशाळा सहाय्यक (Lab Assistant):– या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इंजिनिअरिंग डिप्लोमा पर्यंत शिक्षण घेतलं असणं अत्यंत गरजेचे आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं देखील आवश्यक आहे. 


प्रयोगशाळा परिचर (Lab Attendant):– या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बारावी पर्यंत शिक्षण घेतलेलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं ही आवश्यक आहे. 


कनिष्ठ लिपिक (Jr. Clerk):– या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही क्षेत्रात पदवी पर्यंत शिक्षण आणि कम्प्युटरचं ज्ञान असणं अत्यंत आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं ही आवश्यक आहे. 


ग्रंथालय परिचर (Library Attendant):– या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बारावी पर्यंत शिक्षण घेतलेलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. 


सुतार (Carpenter):– या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं देखील गरजेचे आहे.

1 thought on “12वी पास उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी; SIES या शिक्षण सोसायटीत 57 रिक्त जागांसाठी भरती…”

  1. Pingback: TATE Exam : फेब्रुवारीत ऑनलाईन परीक्षा! एप्रिल-मे महिन्यात 35 हजार शिक्षकांची पदभरती - Krushi Vasant

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!