स्वस्त सोन्याच्या आमिषाने बीड येथील एका व्यापाऱ्यास गंडा, पाकिस्तानच्या सीमेजवळून दोघांना अटक

           स्वस्त सोन्याच्या आमिषाने बीड येथील एका सराफ व्यापाऱ्यास ४० लाख रुपयांना गंडा घातल्याची घटना वर्षभरापूर्वी घडलेली होती. या दरम्यान, शहर पोलिसांनी मोठ्या शिताफीने तपास करून दोन भामट्यांना पाकिस्तानच्या सीमेजवळील गुजरातच्या कच्छ या परिसरातून अटक केली. मतिमंद असल्याचा बहाणा करून आणि तसेच वेश बदलून पोलीस आरोपीपर्यंत पोहोचले.

स्वस्त सोन्याच्या आमिषाने बीड येथील एका व्यापाऱ्यास गंडा           शंकर शहाणे असे बीड येथील फसवणूक झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. त्यांना जीसूप मोहम्मद अली कक्कळ आणि सिकंदर या दोन व्यक्तींनी स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखविले. सुरुवातीला पाच लाख रुपये देऊन त्यांनी स्वस्तात सोने खरेदी केले. शहाणे यांचा विश्वास संपादन करुन त्या दोघांनी त्यांच्याकडून ४० लाख रुपये घेतले आणि सोने देण्यास टाळाटाळ केली त्यानंतर कोरोनाचे कारण देत पैसे आणि सोने देण्यास नकार दिला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर शहाणे यांनी शहर ठाण्यात गुन्ह्याची नोंद केली.


           या दरम्यान, जीसूप कक्कळ याने आपले नाव बदलून अब्बास अली अशा नावाचा वापर केल्याचे समोर आले. आरोपींच्या शोधात शहर ठाण्याचे पथक हे मुंबई, नागपूर, अमरावती, बुलडाणा, भोकरदन, सोलापूर या सर्व भागात शोध घेतला. शहर ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक भार्गव सपकाळ, गुप्त शाखेचे अंमलदार भास्कर केंद्रे, गोविंद भताने, श्रीकांत राठोड यांनी आरोपींच्या शोधार्थ मुंबई गाठली. एका खबऱ्याकडून हा आरोपी त्याचे मूळ नाव जीसूप कक्कळ असून तो पाकिस्तान सीमेवरील भूज कच्छ भागातील जंगलात राहत असल्याची, अशी माहिती मिळाली. रतिया येथील फार्महाऊसवर तपास पथक स्थानिक पोलिसांच्या मदतीने पोहोचले.


                 रतिया या ठिकाणाहून पाकिस्तानची सीमा केवळ ७० किलोमीटर अंतरावर आहे. गुप्त शाखेचे अंमलदार भास्कर केंद्रे यांनी मतिमंद व्यक्तीचा वेश धारण केला. दरवाजा वाजविल्यानंतर आरोपींनी मागील बाजूने जंगलात पलायन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी सपोनि भार्गव सपकाळ आणि भास्कर केंद्रे यांनी पिस्तूल दाखवून दोघांच्याही मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून ४० लाख रुपये हस्तगत केले. पोलीस कोठडी संपल्यावर १३ एप्रिलला त्यांची रवानगी जिल्हा कारागृहात झाली. आठशेवर सीडीआर तपासल्यावर आरोपी गळाला

             आरोपी जिसूप कक्कळ व सिकंदर यांचा छडा लावण्यासाठी परळी शहर पोलिसांनी आठशेेपेक्षा अधिक जणांचे मोबाइलचे कॉल डिटेल्स तपासले होते. यात सहायक पोलीस निरीक्षक भार्गव सपकाळ यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली. त्यांनी पूर्वी मुंबई क्राईम ब्रँचमध्ये काम केलेले होते, तोच अनुभव या ठिकाणी कामी आला.


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!