सुपारीचे पान चघळण्याची सवय आहे? जाणून घ्या या पानाचे आश्चर्यकारक फायदे

          आपल्या आजुबजुला अशी अनेक औषधी वनस्पती आहेत, ज्याचा वापर करून आरोग्य निरोगी ठेवता येत असते. आज आपण अशाच आरोग्यासाठी फायदेशीर असणाऱ्या सुपारीच्या पानांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत . सुपारीची पाने प्रामुख्याने पूजेच्या ठिकाणी वापरली जात असतात. तसंच अनेकजण सुपारीची पाने खातात. आपण अनेकदा पाहिलं असेलच की, आपल्या आजी आजोबांना सुपारीची पाने खाण्याची सवय असते. मात्र, या सुपारीच्या पानांचे आरोग्यासाठी असणारे फायदे काहीजणांनाच माहीत असतील. 


   

सुपारीची पाने चघळण्याचे फायदे


    

         सुपारीची पाने चावून खाल्ल्याने आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांवर मात करता येते. सुपारीच्या पानांमध्ये अनेक पौष्टिक गुणधर्म देखील असतात. त्यामुळे त्याची पाने चावून खाणे हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. तर जाणून घेऊया सुपारचे पान खाण्याचे आरोग्याला होणारे फायदे.


सुपारीची पाने चघळण्याचे फायदे


१) सुपारीच्या पानांचे सेवन केल्यास पचनक्रिया (Digestion) चांगली राहते. अशा परिस्थितीत तुम्ही नियमितपणे सुपारीचे सेवन करू शकतात, असे केल्याने पोटाशी संबंधित अनेक समस्या दूर होऊ शकतात.


२) सुपारीच्या पानांचे सेवन केल्याने हिरड्यांची जळजळ देखील दूर होते. सुपारीच्या पानांमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म आढळतात. ज्यामुळे हिरड्यांची सूज कमी होते.


३) सुपारीच्या पानांचे सेवन केल्याने खोकल्याच्या समस्येवर देखील मात करता येते. सुपारीच्या पानात अँटिऑक्सिडेंट (Antioxidant), अँटीमाइक्रोबियल (Antimicrobial) गुणधर्म असतात. ज्यामुळे खोकला कमी होतो.


४) सुपारीची पाने चघळल्याने भूक देखील वाढते. 


५) सुपारीची पाने खाल्ल्याने तोंडात होणाऱ्या बॅक्टेरिया (Bacteria) पासून ही आराम मिळू शकतो.


६) त्याचप्रमाणे सुपारीची पाने खाऊन तोंडातील दुर्गंधी देखील दूर करता येत असते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!