सागवान झाड : हे झाड लावा आणि विसरा, नंतर 12 वर्षांनी भरपूर पैशांचा पाऊस पडेल, करोडोंचा फायदा होईल!

सागवान झाड 

          अशी अनेक पिके आणि झाडे आहेत, ज्याची लागवड करून शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि मजबूत होऊ शकतात. असेच एक झाड आहे सागवान(Teak tree). सागवान या लाकडाला बाजारात मोठी मागणी आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांना अतिशय चांगला भाव मिळतो. तज्ज्ञांच्या मते, जर शेतकऱ्यांनी आपल्या शेतात हे झाड लावले तर काही वर्षांत त्यांचा नफा करोडों रुपयापर्यंत पोहोचू शकतो. 

Sagwan Farmingसागवान झाड फायदा: 

           भारतातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती फार चांगली नाही. शेतीत होणाऱ्या सततच्या तोट्यामुळे बहुतांश शेतकरी हे कर्जबाजारी झाले आहेत. वार्षिक उत्पन्न कमी असल्या करणाने या शेतकऱ्यांना आपला उदरनिर्वाह करत येत नाही. मात्र, शासनाकडून देखील विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याचे प्रयत्न नेहमीच सुरू आहेत. 

            अशी अनेक पिके आणि झाडे आहेत, ज्याची लागवड करून शेतकरी आर्थिकदृष्ट्या चांगले मजबूत होऊ शकतात. यातील एक झाड म्हणजे सागवान हे आहे. सागवान लाकडाला बाजारात फार मोठी मागणी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खूप चांगला भाव मिळतो. तज्ज्ञांच्या मते, जर शेतकऱ्यांनी आपल्या शेतात हे झाड लावले तर काही वर्षांत त्यांचा नफा करोडोंपर्यंत पोहोचू शकतो. 

           सागाच्या झाडाचे लाकूड हे खूप मजबूत असते. त्यापासून बनवलेले फर्निचर वर्षानुवर्षे टिकत असते. आणि तसेच दीमकांना देखील  हे लाकूड खायला आवडत नाही. त्यामुळे घरांच्या खिडक्या, जहाजे, बोटी, सागाचे दरवाजे  इत्यादींमध्ये सागवानाचे लाकूड मोठ्या प्रमाणात वापरले जाते.


वर्षाच्या कोणत्याही वेळी लावा सागवान झाड

             सागवानाची लागवड तुम्ही भारतात कोणत्याही ठिकाणी करू शकता. त्याची लागवड करण्यासाठी सर्वोत्तम महिने म्हणजे सप्टेंबर आणि ऑक्टोबर हे आहेत. तसेच, ते वर्षभर कधीही घेतले जाऊ शकते. तज्ञांच्या मते, सागवानाची रोपे लावण्यासाठी, मातीचे pH मूल्य 6.50 ते 7.50 या दरम्यान चांगले मानले जाते. या मातीत तुम्ही सागवानाची लागवड केली तर तुमची झाडे लवकर आणि चांगली देखील वाढतील.

               सागवानाची शेती करून लगेचच करोडपती होण्याची आशा जर असेल तर हे अजिबात करू नका. सागवानापासून नफा मिळविण्याची प्रक्रिया खूपच लांब आहे. सागवान झाडाची सुरुवातीची 3 ते 4 वर्षे चांगली काळजी घेणे अत्यंत आवश्यक असते. सुरुवातीच्या काळात त्याची काळजी घेतल्यास येणाऱ्या काळात तुम्हाला मिळणारा नफा हा खूप जास्त असेल. 


सागवानाचे झाड किती वर्षात तयार होते?

         सागवानाचे झाड हे एकदा लावल्यानंतर किमान 10-12 वर्षे वाट पहावी लागते. अशा परिस्थितीत सागवानाच्या झाडाच्या आसपास कमी वेळेत फायदेशीर पिकांची लागवड करता येते. यामुळे सागवान लागवडीचा खर्च तर निघेलच शिवाय तुमचा नफा देखील वाढेल.


करोडो रुपयांचा नफा होतो

             तज्ज्ञांच्या मते, जर एखाद्या शेतकऱ्याने एका एकर शेतीमध्ये 500 सागवान झाडे लावली तर 10-12 वर्षांनी तो सुमारे एक कोटी रुपयांना विकू शकतो. जर एखाद्या झाडाच्या किमतीबद्दल बोलायचे झालेच तर ते बाजारात 30-40 हजार रुपयांना सहज विकले जाते, पण जसजसा वेळ जातो, त्यामुळे झाडाचे मूल्य देखील वाढते. अनेक एकरात झाडे लावून करोडो रुपये कमवू शकतात.
 Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!