सह्याद्री अतिथी गृह: काय म्हणतात ‘या’ हॉटेलमध्ये आई-वडिलांसोबत आलेल्या मुलांना फुकट जेवण मिळते…

Business Idea: आपल्या विशेष जेवणामुळे अनेक हॉटेल ओळखल्या जात असतात. तर काही हॉटेल भन्नाट असे आगळेवेगळे उपक्रम राबवून ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असतात. औरंगाबादमध्ये अशीच एक हॉटेल असून, या हॉटेल मालकाने ग्राहकांसाठी जबरदस्त ऑफर (Offer) ठेवली आहे. हॉटेलमध्ये जेवणासाठी आलेल्या आई-वडिलांसोबत असलेल्या मुलांना पोटभर फुकट जेवण दिले जाते.  


आई-वडिलांसोबत असलेल्या मुलांना पोटभर फुकट जेवण सह्याद्री अतिथी गृह





            औरंगाबाद-कन्नड रस्त्यावरील टोलनाक्या पुढील शिवराई या फाट्याजवळ सह्याद्री अतिथी गृह लागते. अनिल बाबुराव वायडे असे या हॉटेलच्या मालकाचे नाव आहे. सुरवातीला छोटीशी नाश्त्याची हॉटेल सुरु करणाऱ्या वायडे यांनी दहा वर्षांपूर्वी डाळबट्टी बनवायला सुरवात केली होती. पाहता-पाहता त्यांचा व्यवसाय एवढा वाढला की, आज दिवसभरात 1 क्विंटल बट्टी आणि 50 किलो डाळीचे 200 लिटर वरण दिवसभरात लागत असते. पण यापेक्षा त्यांच्या जबरदस्त ऑफरमुळे येथे ग्राहकांची नेहमीच गर्दी पाहायला मिळत असते. कारण जेवणासाठी आलेल्या कुटुंबातील आई-वडिलांसोबत आलेल्या मुलांच्या जेवणाचे ते पैसे घेत नाहीत. त्यामुळे लोकं कुटुंबासोबत जेवण्यासाठी येथे नेहेमीच पसंती देताना पाहायला मिळतात. 


यामुळे देतात मुलांना मोफत जेवण… 

            आपल्या हॉटेलमध्ये आलेल्या मुलांना जेवण मोफत देण्यामागचं कारण सांगताना अनिल वायडे म्हणतात की, बऱ्याचदा जेवणासाठी आलेल्या महिला थाळीचे जास्त पैसे लागतील म्हणून मुलांसमोर थाळी लावू देत नाहीत. त्यामुळे त्यांचही जेवण व्यवस्थित होत नाही. तर बऱ्याचवेळा सगळ्याच्या थाळीचे पैसे लागतील म्हणून निघूनही जातात. त्यामुळे आई-वडिलांसोबत असलेल्या लहान मुलांचे आपण पैसे न घेण्याचा निर्णय घेतल्याचे वायडे हे सांगतात. तसेच यामुळे आई-वडील सुद्धा निवांत जेवण करतात असेदेखील  वायडे म्हणाले. 


असा असतो मेनू… 

          वायडे यांच्या सह्याद्री अतिथी गृह या हॉटेलमध्ये शाकाहारी जेवण मिळते. ज्यात गरमा-गरम डाळबट्टीचा देखील समावेश आहे. चार प्रकारच्या डाळी, जिरा, मोहरी, अद्रक-लसूण अस सर्व मिळून वरण बनवले जाते. सोबतच शिरा, तरी, हिरवी मिरची आणि लिंबू कांदा सोबतीला असतो. 80 रुपयात पोटभर डाळबट्टी तुम्ही इथं खाऊ शकतात. त्यामुळे या हॉटेलमध्ये नेहेमीच गर्दी पाहायला मिळते.  

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!