मोदी सरकार शासनात आल्यापासून शेतकऱ्यांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवित आहे, तर काही शेतकरी हिताच्या योजना शासनाकडे विचाराधीन आहे. मोदी सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी अनेक योजना संपूर्ण देशात राबविल्या आहे. मोदी सरकारने संपूर्ण देशात पीएम किसान सम्मान निधि योजना pm kisan sanman nidhi yojana सारखी शेतकऱ्यांचे हित जोपासणारी योजना अमलात आणली आहे. या योजना व्यतिरिक्त सरकारने पी एम किसान ट्रॅक्टर योजना pm kisan tractor yojana देखील आमलात आणली आहे. या योजनेद्वारे देशातील गरजू शेतकऱ्यांना ट्रॅक्टर घेण्यासाठी 50 टक्के अनुदान दिले जाते.
पीएम किसान ट्रॅक्टर योजना pm kisan tractor yojana शेतकऱ्यांना शेतीकाम करण्यासाठी अनेक यंत्रांचा उपयोग करावा लागतो, यापैकीच एक यंत्र म्हणजे ट्रॅक्टर. परंतु सर्वसामान्य शेतकऱ्यांना ट्रॅक्टर विकत घेणे परडणारे नाही. आणि त्यामुळे अशा शेतकऱ्यांना शेती या क्षेत्रात प्रगती करण्यासाठी अडथळे निर्माण होत असतात. हीच गोष्ट लक्षात घेऊन आता देशातील मोदी सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे आणि त्यांना ही आधुनिक शेती करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे या हेतूने पी एम किसान ट्रॅक्टर योजना pm kisan tractor yojana अंमलात आणल्याचे सांगितले जात आहे.
शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी, शेतीमध्ये कुठल्याही पिकाच्या लागवडीची पूर्वमशागत करण्यापासून ते काढणी करण्यापर्यंत ट्रॅक्टर खूप उपयोगात येते, यामुळे शेतीचे कामे वेळेत होतात आणि तसेच यामुळे उत्पादनात देखील वाढ होते.
परंतु ज्या शेतकऱ्यांकडे ट्रॅक्टर विकत घेण्यासाठी पुरेसा पैसा नाही त्यांना भाडेतत्वावर ट्रॅक्टर आनंद शेतीची पूर्वमशागत तसेच विविध शेत कार्य पार पाडावी लागतात आणि तर काही शेतकरी बैलांच्या साह्याने शेतीची पूर्वमशागत आणि इतर सर्व शेतिची कार्य करतात, मात्र या पारंपारिक शेती पद्धती मुळे शेतकऱ्यांना अपेक्षित असे उत्पादन पदरी पडत नाही. या सर्व गोष्टींचा विचार करून देशातील मोदी सरकार गरजू शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी या योजनेद्वारे मदत करत आहे.
सबसिडी पीएम किसान ट्रॅक्टर योजने pm kisan tractor yojana अंतर्गत गरजू शेतकऱ्यांना अर्ध्या किमतीत ट्रॅक्टर उपलब्ध होऊ शकते. गरजू शेतकऱ्यांना केंद्र सरकार ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी 50 टक्के सबसिडी देत असते. या योजनेद्वारे शेतकरी बांधव कुठल्याही कंपनीचे ट्रॅक्टर अर्ध्या किमतीत खरेदी करू शकतात आणि ट्रॅक्टरची अर्धी किंमत केंद्र सरकारद्वारे अनुदान म्हणुन दिली जाते. केंद्र सरकारच्या या योजने व्यतिरिक्त देशातील अनेक राज्य सरकारे संबंधित राज्यातील शेतकऱ्यांना 20 ते 50 टक्के अनुदान देत असते. योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे या योजनेद्वारे शेतकर्यला एकच ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठीच अनुदान दिले जाते.
शेतकरी मित्रांनो जर आपणास या योजनेद्वारे ट्रॅक्टर खरेदी करायचे असेल तर आपणास काही कागदपत्रांची पूर्तता करणे गरजेचे आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपणास आधार कार्ड adhar card , जमिनीचा सातबारा 7/12 उतारा, बँकेचे पासबुक bank passbook तसेच बँकेचे स्टेटमेंट देखील लागणार आहे, याव्यतिरिक्त आपले पासपोर्ट साईज फोटो देखील गरजेचे आहे.
शेतकरी मित्रांनो जर आपणास या योजनेद्वारे ट्रॅक्टर खरेदी करायचे असेल तर त्यासाठी आपणास अर्ज , application सादर करावे लागेल आणि त्यासाठी आपण आपल्या जवळच्या आपले सरकार केंद्रात जाऊन अर्ज application करू शकता.
Post Views: 582
9763814020