‘या’ छोट्या AC समोर मोठमोठे कूलर देखील फेल, किंमत आहे फक्त ३९९ रुपये;

 नवी दिल्ली : उन्हाचा पारा वाढल्यामुळे AC, cooler खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल दिसत आहे. मात्र, जास्त किंमत असल्यामुळे प्रत्येकालाच एसी आणि कूलर खरेदी करणे शक्य होत नाही. अशा स्थितीमध्ये बाजारात काही पोर्टेबल प्रोडक्ट्स देखील उपलब्ध आहेत, जे तुम्हाला सहज थंड हवा देतील. विशेष म्हणजे यांची किंमत देखील खूप कमी आहे. तुम्ही एक पोर्टेबल एअर कंडिशनर शोधत असाल, ज्याची किंमत खूपच कमी असेल; तर आम्ही तुम्हाला अशाच एका प्रोडक्टची माहिती देणार आहोत. हा AC खूपच लहान आणि मजबूत आहे. तुम्ही जर घरूनच ऑफिसचे काम करत असाल तर अशा स्थितीमध्ये हा AC तुमच्यासाठी खूपच फायद्याचा ठरेल. या छोट्या AC मुळे तुमच्या घरातील जास्त जागा देखील अडणार नाही. या पोर्टेबल एसीविषयी सविस्तर जाणून घेऊयात.

Multi-function Mini Portable Air Conditioner             तुम्ही जर छोटा AC शोधत असाल तर Multi-function Mini Portable Air Conditioner हा एक उत्तम पर्याय ठरेल. तुम्ही या Portable ac ला खूपच कमी किंमतीत Lacasha नावाच्या वेबसाइटवरून खरेदी करू शकतात. कंपनीने या प्रोडक्टला तयार करताना आकार आणि डिझाइनकडे विशेष लक्ष दिलेले आहे. त्यामुळे पोर्टेबल असण्यासोबतच स्टाइलिश देखील आहे. याची खास गोष्ट म्हणजे या Portable air conditioner ला तुम्ही USB cable द्वारे वापरू शकता. या Air conditioner मुळे तुम्हाला वीज बिल देखील जास्त येणार नाही. 


Lacasha या  वेबसाइटवर Multi-function Mini Portable Air Conditioner हा ४०० रुपयांपेक्षा देखील कमी किंमतीत उपलब्ध आहे. या पोर्टेबल एसीला तुम्ही फक्त ३९९ रुपया मध्ये खरेदी करू शकता. याच वेबसाइटवर तुम्हाला फक्त ३९९ रुपयात Mini Portable Fan Arctic Air Personal Space Cooler आणि ४४९ रुपयात Arctic Mini Desert Best Air Cooler हे देखील मिळतील. तुम्ही जर कमी किंमतीत AC अथवा Cooler खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हे पर्याय तुमच्यासाठी चांगले ठरतील. मात्र, खरेदी करण्यापूर्वी प्रोडक्ट आणि साइटची विश्वासार्ह्यता नक्की तपासा. इतर गोष्टी तपासूनच प्रोडक्ट खरेदी करा.

2 thoughts on “‘या’ छोट्या AC समोर मोठमोठे कूलर देखील फेल, किंमत आहे फक्त ३९९ रुपये;”

  1. Pingback: Mini Portable AC :‘या’ छोट्या AC समोर मोठमोठे कूलर देखील फेल, किंमत फक्त ३९९ रुपये; - Krushivasant

  2. Pingback: Mini Portable AC :‘या’ छोट्या AC समोर मोठमोठे कूलर देखील फेल, किंमत फक्त ३९९ रुपये; - Krushisahayak

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!