पेट्रोल डिझेल अपडेट:- पेट्रोलने मोडला मागील सहा महिन्यांपूर्वीचा विक्रम…

            दररोज पेट्रोल डिझेलचे भाव वाढत आहेत. मागील 15 दिवसांत पेट्रोलची किंमत 7.17 रुपये वाढून 121.32 रुपये तर डिझेलची किंमत  8.03 रुपये वाढून 105.56 रुपये प्रति लिटर या भावाने विकत आहे. पेट्रोलच्या किंमती ने मागील 6 महिन्यापूर्विच विक्रम मोडला आहे. तर डिझेल नवीन विक्रम करण्याच्या उंबरठ्यावर येऊन पोहचले आहे.



        केंद्र सरकारने 3 नोव्हेबर 2021 ला पेट्रोल हे 117.52 रुपये प्रति लिटर तर डिझेल 112.18 रुपये प्रति लिटर विकले जात होते. मात्र तेव्हा केंद्र सरकारने आचकरी करात कपात केली आणि एका रात्रीतून पेट्रोल 5.82 रुपयांनी कमी होऊन 5 नोव्हेंबरला 111.64 रुपये प्रति लिटर तर डिझेल 12.39 रुपयांनी कमी होऊन 95.71 रुपये प्रति लिटर झाले होते.  

            मध्यंतरी 5 राज्यातील निवडणुकांमुळे गेली 5 महिने भाव स्थिर होते. 22 मार्च रोजी पुन्हा एकदा भाव वाढीला सुरुवात झाली. दररोज दर वाढत आहेत. नोव्हेंबरमध्ये 117.52 रुपये सर्वाधिक दरात पेट्रोलची विक्री झाली होती. हा विक्रम मोडीत निघून मंगळवारी पेट्रोल 121.32 रूपये प्रति लिटर पर्यंत गेले. तर डिझेलला नोव्हेंबर महिन्यातील 112.18 रुपयांचा उच्चांक गाठण्यासाठी अजून 6.62 रुपये कमी आहेत. अजून किती दिवस पेट्रोल-डिझेलचे भाव वाढणार, हे सांगणे अवघड आहे. या भाववाढीचा परिणाम जीवनावश्यक वस्तूंवर प्रखरतेने दिसतो आहे.


वाहन धारकांनी मीटर कडे पाहणे सोडले. 

•वाहन धारक जेव्हा पेट्रोल पंपावर जातो, तेव्हा पेट्रोलचे भाव दाखविणाऱ्या मीटर कडे पाहतो.

 •मात्र आता दररोज किमती वाढत असल्याने वाहन धारकांनी मीटर कडे पाहणेच सोडले आहे.

 •100 व 200 रुपयांचे पेट्रोल घेणाऱ्यांची संख्या 60 टक्क्यांपेक्षा अधिक आहे.


चक्का जाम चा इशारा 

        डिझेलची दरवाढ रोखण्यासाठी येत्या काळात देशव्यापी चक्का जाम आंदोलन करण्याचा इशारा मालवाहतूकदार संघटनेने केंद्र सरकारला दिला आहे. त्या दृष्टीने तयारी सुरू झाली असल्याची माहिती औरंगाबाद मालवाहतूकदार संघटनेचे अध्यक्ष फैजान खान यांनी दिली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!