टोमॅटो (Tomato) महागला… किरकोळ बाजारात आहेत ६० रुपये किलो

      नवी मुंबई: वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती (Agricultural Produce Market Committee) मध्ये टोमॅटोची आवक खूपच कमी होत असल्या कारणाने दर गगनला भिडलेले आहेत. घाऊक बाजारा (Wholesale market) त टोमॅटो ३० ते ४० रुपये किलो मिळत असल्यामुळे किरकोळ बाजारात हेच दर आता ६० ते ७० रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत. महिनाभर अगोदर घाऊक बाजारा (Wholesale market) त १० ते १५ रुपये किलोने मिळणाऱ्या टोमॅटोच्या दरात खूपच वाढ झाली आहे, आणखीनच आवक कमी झाल्यामुळे दर वाढण्याची देखील शक्यता असल्याचे व्यापाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. 


टोमॅटो (Tomato) महागला… 


        ३४ ते ३५ अंश तापमानापर्यंत तग धरणाऱ्या टोमॅटोना वाढत्या उन्हाचा फटका बसलेला असून, पिकाचा शिवार (plot) जळून गेल्याने आवक देखील मंदावली आहे. त्यातच वाहतुकीच्या खर्चात देखील वाढ झाल्यामुळे त्याचा फटका बसला आहे. टोमॅटो साधारण ३४ ते ३५ अंश तापमानापर्यंत तग धरून राहणारे पीक आहे. मात्र, उन्हामुळे टोमॅटोची रोपे जळून जाण्याचे प्रकार घडत आहेत. सूर्य डोक्याकडे कलत असतानाच्या काळात साधारणपणे शेतकरी पिकांना पाणी देत नाहीत. 


        बऱ्याच वेळा त्याला पुन्हा पाणी देता येण्यासारखी परिस्थिती देखिल ग्रामीण भागात अनुकूल नसते. अशा काही कारणांमुळे टोमॅटोचे शिवार करपून गेले असून, त्यामुळे बाजारातील आवकेवरही परिणाम झालेला आहे, असे व्यापाऱ्यांनी सांगितले. टोमॅटोची आवक कमी होत असल्यामुळे दरामध्ये वाढ झाल्याचे व्यापारी शंकर पिंगळे यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!