जेवण झाल्यावर फेरफटका मारताय? मग तुम्हाला ‘या’ गोष्टी माहित असायला हव्यात…

 मुंबई : अनेक लोकांना दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणानंतर चालायला आवडते. असे मानले जाते की, असे केल्याने जेवणाचे पचन चांगले होत असते. तसेच यामुळे वजन देखील कमी करण्यास मदत होते. परंतु जेवल्‍यानंतर चालण्‍याचे इतर देखील अनेक आरोग्यदायी फायदे आहेत, ज्याबद्दल बहुतेक जणांना माहिती नसते. चला तर मग आपण जेवल्यानंतर चालण्याच्या फायद्यांबद्दल जाणून घेऊयात.

फेरफटका मारण्याचे 6 फायदे


 फेरफटका मारण्याचे 6 फायदे:-


1. ग्लुकोजची पातळी नियंत्रित होते(Glucose levels are controlled):-

              जर एखादी व्यक्ती अन्न खाल्ल्यानंतर चालत असेल, तर त्याच्या रक्तातील ग्लुकोजची पातळी (Glucose level) नियंत्रित केली जाऊ शकते.


2. लठ्ठपणा कमी होईल(Obesity will be reduced):-

           जे लोक शरीरातील अतिरिक्त चरबी किंवा लठ्ठपणामुळे त्रस्त झालेले आहेत, त्यांनी अन्न खाल्ल्यानंतर अर्धा किंवा एक तास चालावे,  असे केल्याने शरीरातील पोटावरील चरबी कमी होऊ शकते.


3. निद्रानाश पासून आराम(Relief from Insomnia):-

                    ज्यांना निद्रानाशाची समस्या आहे, त्यांनी जेवल्यानंतर फेरफटका मारला तर त्यांची झोपेची गुणवत्ता सुधारते आणि निद्रानाशाच्या समस्येपासून देखील सुटका मिळू शकते.


4. मानसिक आरोग्य चांगले राहते(Mental health remains good):-

              जेवल्यानंतर फेरफटका मारल्यामुळे मानसिक आरोग्य राखता येते. हे चयापचय क्रिया वाढवण्यासाठी देखील मदत करत असते.


5. पचन व्यवस्थित होईल(Digestion will be fine):-

                 अन्न खाल्ल्यानंतर फेरफटका मारल्यामुळे पचनसंस्था निरोगी राहत असते. 


6. ऊर्जा मिळेल(Get energy):-

           अन्न खाल्ल्यानंतर फेरफटका मारल्यामुळे शरीराला भरपूर ऊर्जा मिळू शकते. तसेच शरीराची रोगप्रतिकारक शक्ती(Immunity) चांगली होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!