कत्तलीसाठी गायी घेऊन जात असल्याच्या संशयातून जमावाने ट्रक पेटवला , बुलढाण्यातील घटना…

           बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा गावात एक खूपच धक्कादायक घटना समोर आली आहे. कत्तलीसाठी गायी घेऊन जात असल्याच्या संशयातून तेथील जमावाने एक ट्रक पेटवून दिला आहे. बुधवारी रात्री एकच्या सुमारास ही घटना घडली आहे. मध्यरात्री गायी घेऊन जात असताना संबंधित ट्रक हा नांदुरा येथील बस स्थानकासमोर नादुरुस्त झाला होता. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर वाहतूकीची कोंडी झाली होती. त्यानंतरच हा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणी नांदुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील तपास केला जात आहे.


 जमावाने ट्रक पेटवला , बुलढाण्यातील घटना…


                 मिळालेल्या माहितीनुसार, नांदुरा बस स्थानकासमोर ट्रक बंद पडल्यानंतर ट्रकमधून जनावरांचा आवाज येत होता. त्यामुळे आसपासच्या जवळपास ५०० लोकांचा जमाव या घटनास्थळी दाखल झाला. लोकांना गोळा होताना पाहून ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला. यानंतर घटनास्थळी जमलेल्या जमावानं कत्तलीसाठी गायी घेऊन जात असल्याच्या संशयातून संबंधित ट्रक पेटवला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे. 


            ट्रक पेटवून देण्यापूर्वी जवामानं सर्व गायींना बाहेर काढलं होत. सर्व गायी जीवंत आहेत. मध्यरात्री महामार्गावर अशाप्रकारे ट्रक पेटवून दिल्यामुळे काहीकाळ वाहतूक कोंडी झाली होती. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल होईपर्यंत, जमावाने ट्रक पेटवला होता. याप्रकरणी नांदुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप कुणालाही अटक केली नसल्याची माहिती समजत आहे. संबंधित ट्रकमधून खतांच्या आडून गायींची तस्करी केली जात होती, अशी माहिती देखील समोर आली आहे. घटनेचा सविस्तर तपास पोलीस करत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!