ऐन उन्हाळ्यात वाढत्या Electricity बिलाने झोप उडविलीय? मग करा हे ३ काम, बिलात नक्कीच होणार ५० % पर्यंत बचत…Solar energy:

 नवी दिल्ली: उन्हाळ्यात कूलर, AC यासारख्या अनेक Cooling Devices चा वापर हा वाढत असतो, आणि सोबतच इलेक्ट्रिसिटी बिलाची रक्कम देखील वाढत जाते. बिल जास्त आले की सर्वसामान्य लोकांचे टेन्शन देखील वाढत जाते. अशात Electricity Bill कमी कसे करायचे हाच विचार सगळ्यांच्या डोक्यात येत असतो. एकीकडे हिवाळ्यात वीज बिल खूपच कमी येत असते. तर दुसरीकडे उन्हाळ्यात वीज बिल अनेक पटींनी वाढत असते. तुम्ही देखील वाढत्या लाईट बिलामुळे त्रस्त झाले असाल तर आज आम्ही तुम्हाला काही सोप्प्या टिप्स सांगणार आहोत. ज्याच्या मदतीने तुम्ही वीज बिल ५० % पर्यंत कमी करू शकतात.  



एअर कंडिशनर (Air conditioner):

          उन्हाळ्यात अनेक घरात AC चा वापर मोठ्या प्रमाणात होत असतो. परंतु, जर तुम्ही वीज बिल कमी करण्याचा प्रयत्नात असाल तर, AC चे तापमान २४ अंशांवरच सेट करावे. याशिवाय, तुमचा AC कितीही चांगला आणि महाग असला तरी देखील त्याची Cooling कमी होऊ शकते. म्हणूनच AC चा योग्य पद्धतीने वापर करणे हे देखील खूप महत्वाचे आहे. जर तुम्हाला AC जास्त वेळ चालवण्याची समस्या टाळायची असेल तर, दर आठवड्याला AC filter स्वच्छ करा. अस्वच्छ AC filter हे Air Flow रोखत असतात. ज्यामुळे Cooling कमी होते आणि नंतर तुम्हाला AC बराच काळ चालू ठेवावा लागतो. जर तुम्ही नवीन AC घेण्याचा विचार करत असाल तर विजेची बचत करण्यासाठी तुम्ही फक्त High Ratings असलेले AC model विकत घ्या.


सौर उर्जा (Solar energy): 

         भारत हा असा एक देश आहे जिथे वर्षातील सुमारे ३०० दिवस सूर्यप्रकाश असतो. आणि चांगली उष्णता देखील असते. जी एक प्रकारे चांगलीच गोष्ट म्हणता येईल. कारण, जर सूर्यप्रकाश असेल तर तुम्ही घराच्या छतावर सोलर पॅनेल लावू शकतात. ही एक वेळची गुंतवणूकच आहे. ज्यामुळे तुमचे वीज बिल दीर्घकाळात कमी होण्यास मदत होईल. सोलर पॅनल (Solar panel) घेण्यापूर्वी तुम्ही रिसर्च (Research) करून ते ऑनलाइन (Online) किंवा ऑफलाइन (Offline) खरेदी करू शकतात.



प्रकाश (Lighting)

           वीज बिल जास्त असले, तुम्ही विजेचा वापर कमी करण्यासाठी एलईडी दिवे (LED lights)किंवा उच्च रेटिंग (High rating) सह येणारी असे एक Electricity Home Applainces खरेदी करू शकतात. असे केल्याने तुम्हाला तुमच्या वीज बिलात चांगलाच मोठा फरक दिसेल.

1 thought on “ऐन उन्हाळ्यात वाढत्या Electricity बिलाने झोप उडविलीय? मग करा हे ३ काम, बिलात नक्कीच होणार ५० % पर्यंत बचत…Solar energy:”

  1. Pingback: Electricity Bill उन्हाळ्यात वाढत्या बिलाने झोप उडविलीय? मग करा हे ३ काम, बिलात नक्कीच होणार ५०% बचत... - Krushivasant

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!