आता शेतकऱ्यांचे टेन्शनच मिटले!!! सरकारची आता एक शेतकरी, एक डीपी ही योजना, वाचा सविस्तर माहिती…

                    मागील काही दिवसांपासून राज्यात महावितरण आणि शेतकरी यांच्यात मोठा संघर्ष सुरु आहे. यामुळे शेतकरी खूपच अडचणीत आले आहेत. अनेक ठिकाणी सध्या शेतकऱ्यांची वीज देखील तोडली जात आहे. आता सरकारकडून “एक शेतकरी एक डीपी 2022”  ही योजना आणन्यात आली आहे. यामुळे याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. यामध्ये शेतकऱ्यांचा चांगलाच फायदा होणार आहे.

एक शेतकरी एक डीपी योजना


                    आता राज्यातील शेतकऱ्यांना अनियमित वीज, लाईट जाणे, तारांवर प्रकाश टाकणे, लाईट, वीज कट, जीव धोक्यात येऊ नये या सर्व बाबींचा विचार करूनच  HVDS ल उच्च दाबाची वीज देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या अनेक अडचणी कमी होणार आहेत. आतापर्यंत या योजनेचा ९० हजार शेतकर्‍यांना लाभ झालेला आहे. तसेच अनेक शेतकरी अजूनही लाभ घेत आहेत.


           यासाठी ११३४७ कोटींच्या या योजनेसाठी सरकारने निधी मंजूर केला आहे. महावितरण कंपनीला आशियाई विकास बँकेकडून कर्ज घेऊन २२४८ कोटी रुपयांचा आर्थिक निधी देखील वितरित करण्यात येणार आहे. यामध्येच ही सर्व कामे करण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांना अनेक गंभीर समस्यांना सामोरे जावे लागते. यामध्ये विद्युत पुरवठया मध्ये वारंवार बिघाड होऊन ग्राहकांना वीज पुरवठा खंडित होणे, तांत्रिक वीज हानी वाढणे, रोहित्र बिघाड होण्याच्या प्रमाणामध्ये वाढ, विद्युत अपघात अशा घटनांचा देखील समावेश आहे.


             त्यामुळेच उच्च दाब वितरण प्रणाली मुळे अखंडित आणि शाश्वत वीजपुरवठा होण्यासह विद्युत हानी अपघात व रोहित्र बिघाड या तिन्ही बाबींमध्ये आता घट होणार आहे. ज्या शेतकऱ्यांच्या २ हेक्टरपेक्षा कमी जमीनी आहेत, त्यांना प्रति HP ७,००० रुपये द्यावे लागतील. अनुसूचित जाती जमाती (Sc/St) प्रवर्गातील शेतकऱ्यांना  ५,००० रुपये द्यावे लागतील. यासाठी आधार कार्ड, मोबाइल नंबर, शेताचे ७/१२ प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, बँक खाते क्रमांक या गोष्टी लागणार आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!