अंड शाकाहारी(Vegetarian) की मांसाहारी(Non-vegetarian)? मिळालं आहे शास्त्रशुद्ध उत्तर

           कोंबडी आधी अंड, या प्रश्नाचं नेमकं उत्तर अजूनही सापडलेलं नाहीच. अंड्याशीच संबंधित आणखी एक गोंधळात टाकणारा प्रश्न म्हणजे अंड हे शाकाहारी (Vegetarian) आहे की मांसाहारी (Non Vegetarian)? अंड खाणाऱ्या व्यक्ती याचा विचार करतच नाहीत. काय म्हणावं किंवा म्हणू नये याच्याशी त्यांना काहीही देणंघेणं नसतं. परंतु, अनेक जणांना ते जाणून घेण्याची इच्छा शांत बसूच देत नाही. त्यांचा शोध हा नेहमी सुरूच असतो. अंड शाकाहारी (Vegetarian) की मांसाहारी (Non Vegetarian) याविषयी शास्त्रीय माहिती देणारं वृत्त ‘टीव्ही 9 हिंदी’ ने प्रसिद्ध केलेल आहे. 


अंड शाकाहारी(Vegetarian) की मांसाहारी(Non-vegetarian)? 


              आपल्या आहारात भाज्या, कडधान्य, फळं यासोबतच अंड्याची देखील आवश्यकता असते. दररोज एक अंड खायला पाहिजे असं आहार तज्ज्ञ सांगतात. शरीराला आवश्यक असणारी ऊर्जा ही अंड्यातून सहज मिळत असते. अंड्यातून प्रथिने (Protein), लोह (Iron), आयोडिन (Iodine), झिंक (Zinc) अशी शरीराला आवश्यक पोषक तत्त्वं देखील मिळतात. त्यामुळे डॉक्टर नेहमी अंडी खाण्याचा सल्ला देत असतात.

         अंड शाकाहारी (Vegetarian) की मांसाहारी (Non Vegetarian), या प्रश्नावर अनेकांची वेगवेगळी उत्तरं तुम्ही ऐकली असतीलच; पण अंड शाकाहारीही (Vegetarian) आहे आणि मांसाहारीही (Non Vegetarian) आहे. भागलपूरमधल्या प्रादेशिक पोल्ट्री फार्म (Regional Poultry Farm) च्या संचालिका डॉ. अंजली यांनी याविषयी सविस्तर माहिती दिली आहे. नर कोंबड्याच्या संपर्कात न येता देखील कोंबड्या अंडी देऊ शकतात. कोंबडीने कोंबड्याच्या संपर्कात न येता जर अंड दिलं असेल, तर ते अंड टेबल पर्पज (Table purpose) किंवा शाकाहारी अंड (Vegetarian eggs) म्हणून ओळखलं जातं. 

             डॉ. अंजली सांगतात, की शाकाहारी (Vegetarian) आणि मांसाहारी (Non-vegetarian) अंड्यांतला फरक ओळखण्यासाठी एक खूपच सोपी पद्धत आहे. त्यासाठी अंड टेबलच्या एका खाचीत ठेवलं जात असतं. त्यानंतर बंद खोलीत त्या टेबलच्या खाली एक बल्ब (Bulb) लावला जातो. बल्बचा प्रकाश हा प्रत्येक अंड्याच्या खालून नेला जातो. ज्या अंड्यातून प्रकाश आरपार जाईल किंवा अंड पूर्णपणे लाल झालेलं दिसेल, तर ते अंड शाकाहारी (Vegetarian) आहे असं समजावं. मांसाहारी (Non-vegetarian) अंड्यामध्ये असं होत नाही.


           अंड्यातून पिल्लं बाहेर पडत असतात, म्हणून अंड हे मांसाहारी (Non-vegetarian) आहे, असं बरेच जण मानतात. परंतु, बाजारात येणारी अंडी ही अनफर्टिलाइज्ड (Unfertilized) असतात. त्यातून कधीच पिल्लं बाहेर येऊ शकत नाही. अशी अंडी टेबल पर्पजसाठीच वापरली जातात. कोंबडी सहा महिन्यांची झाल्यानंतर दररोज किंवा दीड दिवसाने एक अंड देत असते. परंतु, त्यासाठी नर कोंबड्याशी संपर्कात येणं हे आवश्यक नसतं.


          अंडी देणं ही कोंबडीची नैसर्गिक प्रक्रिया असते. कोंबड्यांच्या पिल्लांच्या उत्पादनासाठी इन्क्वेटर हॅचरीज (Incubator Hatcheries) चा वापर केला जातो. त्यासाठी प्रत्येकी दहा कोंबड्यांमध्ये एक कोंबडा सोडला जात असतो. त्या पिंजऱ्यात फर्टिलाइज अंडं असेल, तर त्यामधून कोंबडीचं पिल्लू जन्म घेऊ शकतं. अशा अंड्याला मांसाहारी (Non-vegetarian) अंड म्हटलं जातं. म्हणजेच एखादी कोंबडी नर कोंबड्याच्या संपर्कात आल्यानंतर जे अंड देते, ते फर्टिलायझेशन (Fertilization) द्वारे दिलेलं असतं.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!