Rate update : कापूस, मका, हरभरा, हळद, हरबरा, मूग, सोयाबीन आवक स्थिर जाणून घ्या काय आहे कारण

Rate update डिसेंबर महिन्यात अंडी व इतर प्राणिजन्य पदार्थांची स्थानिक मागणी व निर्यात वाढत होती. याही महिन्यात हा वाढीचा कल कायम राहण्याची शक्यता आहे. किंबहुना, या वस्तूंच्या मागणीचा दीर्घकालीन कल वाढता आहे. त्यामुळे पशुखाद्यासाठी लागणाऱ्या सर्व शेतीमालाच्या मागणीचा कल वाढत आहे. याचा परिणाम त्यांच्या किमती वाढण्यावर झाला आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ या महिन्यात, मुख्यत्वे आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे सोयाबीनमध्ये वाढता तर कापसामध्ये उतरता कल राहिला.डिसेंबर महिन्यात कापसाची आवक वाढत्या पातळीवर स्थिर राहिली. मक्याची आवक मोठ्या प्रमाणात घसरली. मूग व सोयाबीन यांचीही आवक घसरत होती. तुरीची आवक आता वाढू लागली आहे. या महिन्यात ती वाढती असेल. हरभरा, कांदा व टोमॅटो यांची आवक स्थिर राहिली.

👉3628 पदांच्या तलाठी भरतीला मान्यता👈

Rate update कापूस

कापसाचे व कपाशीचे राजकोटमधील स्पॉट भाव (रु. प्रति 170 किलोची गाठी) डिसेंबर महिन्यात घसरत होते. गेल्या सप्ताहात कापसाचे स्पॉट भाव 4.9 टक्क्यांनी वाढून रु. 30460 वर आले होते;या सप्ताहात मात्र ते 2.6 टक्क्यांनी घसरून रु. 29680 वर आले आहेत. कपाशीचे स्पॉट भावसुद्धा (प्रति 20 किलो) 3.3 टक्क्यांनी घसरून रु 1617 वर आले आहेत.कापसाचे हमीभाव लांब धाग्यासाठी (प्रति क्विंटल) रु. 6380 व मध्यम धाग्यासाठी रु. 6080 आहेत.

Rate update मका

मक्याच्या स्पॉट किमती (छिंदवाडा) नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात वाढत होत्या. गेल्या सप्ताहात स्पॉट किमती रु. 2200 वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या याच पातळीवर आहेत.फ्यूचर्स (फेब्रुवारी डिलिव्हरी) किमती रु. 2216 वर आल्या आहेत. एप्रिल फ्यूचर्स किमती रु. 2240 वर आहेत. मक्याचा हमीभाव रु. 1962 आहे. सध्याच्या किमती हमीभावापेक्षा अधिक आहेत.

👉रू 100 नावावर करून घ्या शेती 👈

हळद

हळदीच्या स्पॉट (निजामाबाद) किमती डिसेंबर महिन्यात वाढत होत्या. गेल्या सप्ताहात मात्र त्या 0.9 टक्क्याने घसरून रु. 7335 वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या 0.3 टक्क्याने वाढून रु. 7357 वर आल्या आहेत.एप्रिल फ्यूचर्स किमती रु. 7738 वर आल्या आहेत. मे फ्यूचर्स किमती रु. 7916 वर आल्या आहेत. हळदीमध्ये वाढीचा कल आहे.

हरभरा

हरभऱ्याच्या स्पॉट (बिकानेर) किमती गेल्या सप्ताहात 2 टक्क्यांनी वाढून रु. 5048 वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या 1.3 टक्क्याने घसरून रु. 4984 वर आल्या आहेत. हरभऱ्याचा हमीभाव रु. 5335 आहे.

मूग

मुगाच्या किमती डिसेंबर महिन्यात वाढत होत्या. या महिन्यातसुद्धा हा कल कायम आहे. मुगाची स्पॉट किंमत (मेरटा) या सप्ताहात 4 टक्क्यांनी वाढून रु. 7800 वर आली आहे. मुगाचा हमीभाव रु. 7755 आहे. आवक कमी होत आहे.

सोयाबीन

गेल्या सप्ताहात सोयाबीनची स्पॉट किंमत (इंदूर) रु. 5781 वर आली होती; या सप्ताहात ती 0.4 टक्क्याने घसरून रु. 5756 वर आली आहे. सोयाबीनचा हमीभाव रु. 4300 आहे.

👉रोजचे बाजारभाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा👈

1 thought on “Rate update : कापूस, मका, हरभरा, हळद, हरबरा, मूग, सोयाबीन आवक स्थिर जाणून घ्या काय आहे कारण”

  1. Pingback: Cotton Market update : कापूस बाजाराला सरकी दराचा मजबूत आधार पाहा काय आहे अहवाल - Indien Farmer

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!