Soybean rate update : मका, सोयाबीनच्या आवकेत घट पाहा किती घट झाली

Soybean rate update १ जानेवारीपासून मक्याचे मे २०२३ डिलिव्हरीसाठी व्यवहार सुरू झाले. त्यामुळे आता NCDEX मध्ये मक्याचे फेब्रुवारी, मार्च, एप्रिल व मे डिलिव्हरीसाठी आणि हळदीचे एप्रिल, मे व जून डिलिव्हरीसाठी व्यवहार चालू आहेत. MCX मध्ये कपाशीचे फेब्रुवारी, एप्रिल व नोव्हेंबर डिलिव्हरीसाठी व्यवहार चालू आहेत. हरभरा, मूग, सोयाबीन व तूर यांचे फ्यूचर्स व्यवहार २०२३ या वर्षामध्ये बंद असतील.पाम तेल, उडीद व तूर यांच्या मुक्त आयातीचे धोरण ३१ डिसेंबरनंतर सुद्धा चालू राहील. त्याचा परिणाम काही अंशी सोयाबीनसह इतर खाद्यतेलाच्या किमतींवर होईल.

डिसेंबर महिन्यात कापसाची आवक वाढत्या पातळीवर स्थिर राहिली. मक्याची आवक मोठ्या प्रमाणात घसरली. मूग व सोयाबीन यांचीही आवक घसरत होती. तुरीची आवक आता वाढू लागली आहे. या महिन्यात ती वाढती असेल. हरभरा, कांदा व टोमॅटो यांची आवक स्थिर राहिली.डिसेंबर महिन्यात कापसाचे भाव कमी होत होते. मक्यात वाढीचा कल टिकून राहिला. मुगाचा हंगाम संपला आहे. त्यामुळे मुगाची किंमत वाढत आहे. हळदीच्या किमतीसुद्धा डिसेंबर मध्यापासून वाढत आहेत. सोयाबीन, तूर, कांदा व टोमॅटो यांच्या किमती स्थिर होत्या.

👉गवार चा भाव 7000👈

Soybean rate update सप्ताहामधील किमतीतील सविस्तर चढ-उतार

कापूस

MCX मधील कापसाचे व कपाशीचे राजकोटमधील स्पॉट भाव (रु. प्रति १७० किलोची गाठी) डिसेंबर महिन्यात घसरत होते. गेल्या सप्ताहात कापसाचे स्पॉट भाव २.४ टक्क्यांनी घसरून रु. २९,०४० वर आले होते; या सप्ताहात मात्र ते ४.९ टक्क्यांनी वाढून रु. ३०,४६० वर आले आहेत. कपाशीचे स्पॉट भावसुद्धा (प्रति २० किलो) ४.६ टक्क्यांनी वाढून रु १,६७३ वर आले आहेत. कापसाचे हमीभाव लांब धाग्यासाठी (प्रति क्विंटल) रु. ६,३८० व मध्यम धाग्यासाठी रु. ६,०८० आहेत.

Soybean update मका

मक्याच्या स्पॉट किमती (छिंदवाडा) नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात वाढत होत्या. गेल्या सप्ताहात स्पॉट किमती ०.६ टक्क्याने वाढून रु. २,२०५ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या किंचित (०.२ टक्क्याने) घसरून रु. २,२०० वर आल्या आहेत. फ्यूचर्स (फेब्रुवारी डिलिव्हरी) किमती रु. २,२१९ वर आल्या आहेत. मार्च फ्यूचर्स किमती रु. २,२३१ वर आहेत. मक्याचा हमीभाव रु. १,९६२ आहे. सध्याच्या किमती हमीभावापेक्षा अधिक आहेत.

👉कापसाच्या भावात घसरण👈

हळद

हळदीच्या स्पॉट (निजामाबाद) किमती डिसेंबर महिन्यात वाढत होत्या. गेल्या सप्ताहात मात्र त्या ०.८ टक्क्याने घसरून रु. ७,४०१ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ०.९ टक्क्याने घसरून रु. ७,३३५ वर आल्या आहेत. एप्रिल फ्यूचर्स किमती रु. ७,८२८ वर आल्या आहेत. मे फ्यूचर्स किमती रु. ७,८४८ वर आल्या आहेत.

हरभरा

हरभऱ्याच्या स्पॉट (बिकानेर) किमती गेल्या सप्ताहात ०.४ टक्क्याने घसरून रु. ४,९४७ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या २ टक्क्यांनी वाढून रु. ५,०४८ वर आल्या आहेत. हरभऱ्याचा हमीभाव रु. ५,३३५ आहे.

मू

मुगाच्या किमती डिसेंबर महिन्यात वाढत होत्या. मुगाची स्पॉट किमत (मेरटा) या सप्ताहात रु. ७,५०० वर आली आहे. मुगाचा हमीभाव रु. ७,७५५ आहे.

👉सोयाबीन चे भाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा 👈

1 thought on “Soybean rate update : मका, सोयाबीनच्या आवकेत घट पाहा किती घट झाली”

  1. Pingback: Soybean Market update : सोयाबीनच्या दरातील तेजी कायम जाणून घ्या बाजार भाव - Indien Farmer

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!