Soybean Rate update : शेतकऱ्यांना दिलासा ! सोयाबीन बाजारभावात वाढ, मिळाला ‘इतका’ दर ; आवक वाढण्याची शक्यता.

Soybean Rate update

Soybean Rate update : सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी 2023 च्या प्रारंभी थोडीसा दिलासा . खरं पाहता नववर्षाच्या सुरुवातीला सोयाबीन दरात वाढ झाली आहे. गेल्या तीन दिवसांपासून सातत्याने सोयाबीन दरात वाढ नमूद केली जात आहे. यामुळे कुठे ना कुठे राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळत आहे.

गेल्यावर्षीच्या शेवटी म्हणजे 2022 डिसेंबरमध्ये सोयाबीन साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटल पेक्षा कमी दरात विकला जात होता. मात्र आता सोयाबीनने साडे पाच हजार रुपयांचा टप्पा पार केला असून यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे.

👉जाणून घ्या आजचे तुरीचे भाव👈

विक्रमी दर मिळाला, यामुळे 2022 मध्ये म्हणजेच गेल्या वर्षी सोयाबीनची पेरणी वाढली. मात्र सोयाबीन बाजारात आल्यानंतर होत्याचं नव्हतं झालं, सोयाबीनला अतिशय कवडीमोल असा दर मिळू लागला.

सुरुवातीला सोयाबीनमध्ये आद्रता अधिक असल्याचे कारण पुढे करत अनेक ठिकाणी चार ते साडेचार हजार रुपये प्रति क्विंटल वर सोयाबीनची खरेदी झाली. यानंतर थोडीशी दरात सुधारणा झाली. नोव्हेंबर महिन्यात काही ठिकाणी सहा हजार रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी दर सोयाबीनला मिळू लागला होता.

Soybean Rate update दर कितीवर पोचली?

पण मागील काही दिवसांपासून जानेवारीत सोयाबीनचे दर वाढतील, असा अंदाज अभ्यासक व्यक्त करत होते. त्यानुसार आज सोयाबीनच्या दरात अनेक बाजांमध्ये १०० ते २०० रुपयांची वाढ झाली. मात्र काही बाजारांमधील दरपातळी आजही कायम होती. आज सोयाबीनला सरासरी ५ हजार ४०० ते ५ हजार ७०० रुपये दर मिळाला. जास्तीत जास्त सोयाबीन ज्या दराला विकलं जातं तो सर्वसाधारण किंवा सरासरी दर असतो. म्हणजेच किमान दर आणि कमाल अर्थात जास्ती जास्त दर यापेक्षा वेगळे असतात. पण सरासरी दर जास्त शेतकऱ्यांना मिळतो म्हणून त्याचा उल्लेख केला जातो.

👉तुम्ही तुमचा विमा👈

दरवाढीचा अंदाज

मागील आठवड्यात आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे दर तेजीत आले होते. सोयाबीनचे वाढलेले दर टिकून राहण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यातच सोयापेंडचेही दर तेजीत आहेत. खाद्यतेलाच्या दराचाही सोयाबीनला आधार मिळतोय. या सर्व घटकांमुळं आंतरराष्ट्रीय बाजारात तेजी राहू शकते, असा अंदाज आहे. त्यामुळं देशातील सोयाबीन दरातही सुधारणा होण्याची शक्यता निर्माण झाली होती.

जानेवारीत काय दर राहतील?

सोयाबीनचे दर या महिन्यात वाढण्याचा अंदाज आहे. पुढील महिनाभर सोयाबीन दरात २०० ते ३०० रुपयांची सुधारणा अपेक्षित आहे. सोयाबीनचा भाव ५ हजार ६०० ते ५ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान पोहचू शकतो. पण इथं एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. ती म्हणजे सोयाबीनची ही दरपातळी सध्याची बाजारातील स्थिती म्हणजेच मुलभूत घटक लक्षात घेऊन व्यक्त केली आहे. मुलभूत घटक बदलले की दर यापेक्षा जास्त वाढूही शकतात आणि स्थिरही राहू शकतात. त्यामुळं शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊनच सोयाबीनची विक्री केल्यास फायदेशीर ठरेल, असं आवाहन जाणकारांनी केलंय.

👉ही योजना पण तुम्हाला लाभदायी ठरेल👈

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!