हवेत पिकणाऱ्या, विनामातीच्या शेतीची होतेय सर्वत्र चर्चा; भविष्यात मंगळावरही केली जाणार का ही शेती…

           तुम्ही आजपर्यंत शेतीचे अनेक प्रकार पहिलेले असतीलच. मात्र तुम्ही नेहमी मातीत उगवणारी शेतीचं पहिलेली असेल. पण आता नवीन प्रकारची शेती आली आहे. सध्या पुण्यामध्ये बिना मातीच्या शेतीचा प्रयोग करणे सुरु आहे. तुम्ही अगदी तुमच्या घरात देखील ही शेती करू शकतात. भविष्यात तर नासा ही शेती मंगळ ग्रहावर करण्याच्या मार्गात दिसून येत आहे. व्हर्टिकल फार्मिंग (Vertical Farming) अर्थातच उभ्या पपईमधील अनोख्या शेतीने हे शक्य झाले आहे.

👉कोणी आणि कशी केलीय ही शेती👉 

               पुण्याच्या लोणावळ्यातील शेतीचा हा नविन प्रयोग ‘प्रवीण शर्मा’ यांनी प्रत्यक्षात उतरवलेला आहे. बारा गुंठ्याच्या क्षेत्रात हा १ एकर शेतीचा प्रयोग करत आहे. जमीनीवर एका रोपाच्या लागवडी साठी जेवढी जागा लागते तेवढ्याच जागेत या शेतात १०८ रोपांची लागवड करण्यात येत असते. त्यामुळे जमिनीवरून २ एकर शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या तुलनेत अवघ्या १२ गुंठ्याच्याच शेतीतून चौपट उत्पन्न मिळते आहे. विना मातीची हवेत पिकणारी ही शेती नासाला फारच आवडलेली आहे. त्यामुळेच संशोधनासाठी मंगळ ग्रहावर जाणाऱ्या संशोधकांची भूक भागविण्यासाठी, नासा आता मंगळ ग्रहावर, असे पीक घेण्याचा प्रयत्न करणार आहे. असे प्रवीण शर्मा यांनी सांगितले. 
 

👉कोणकोणती पिके या शेतीद्वारे घेतली जाऊ शकतात👉
            चेरी, टोमॅटो, बटाविया लेटस, लोलोरोसो लेटस, कर्लीकेल, इंग्लिश बेबी काकडी, भूत जोलकिया अशी विविध पिकं ‘प्रवीण शर्मा’ यांनी घेतली आहेत. आता लवकरच या प्रकारची पिकं घराघरात घेणं शक्य होणार आहे, त्यांचं ही संशोधन अगदी अंतिम टप्प्यात आले असल्याचे प्रवीण शर्मा यांनी सांगितले. भारतातील वाढत्या लोकसंख्येमुळे शेत जमीनीवर झपाट्याने इमारती उभ्या राहताना दिसत आहेत. त्यामुळे पिकांच्या उत्पादनात दिवसेंदिवस घट होऊ लागलेली आहे. भविष्यात तर परिस्थिती आणखीनच बिकट होताना दिसत आहे. त्यामुळे जर शेत जमीन अत्यल्प असेल तर हीच एरोपॉनिक शेती (Aroponik Farming) सर्वांची भूक भागवेल. त्यामुळं या अनोख्या शेतीला शेतकऱ्यांनी स्वीकारायला हवं असे देखील म्हंटले जात आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!