मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन स्मार्ट प्रकल्पा अंतर्गत अर्ज करयचा आहे मग वाचा सविस्तर माहिती…..

कुक्कुट पालन, शेळी पालन, शेतमाल प्रकल्प, इत्यादी साठी 60% अनुदान; अर्जाची संपूर्ण माहिती घेऊया.

                  मा. श्री बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन स्मार्ट प्रकल्पा द्वारे महाराष्ट्रातील संस्थांकडून मूल्य साखळी विकासाचे उपप्रकल्प राबविण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहे. हे अर्ज शेतमाल शेळ्या मांस आणि दूध आणि परसबागेतील कुक्कुटपालन अंडी यांच्या मूल्य साखळी विकासाच्या प्रकल्पांसाठी आहे.

               अर्ज सादर करण्यासाठी पात्र असलेल्या आधारित संस्थांमधील शेतकरी उत्पादक कंपनी आणि त्यांचे फेडरेशन federation तसेच महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांद्वारे स्थापित प्रभाग संघ आणि महिला आर्थिक विकास महामंडळाद्वारे स्थापित लोकसंचलित साधन केंद्र यांचा समावेश आहे. 


               या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज डाऊनलोड करून घ्यावा आणि त्याची प्रिंट काढून घ्यावी नंतर त्याला दिलेली आवश्यक कागदपत्रे जोडून शेतकरी उत्पादक कंपन्यांनी जिल्ह्याच्या प्रकल्प संचालक आणि आत्मा कार्यालयात तसेच लोकसंचालित साधन केंद्रांनी जिल्हा समन्वयक अधिकारी यांच्या कडे जमा करावा.
               
                 प्रभागतील संघांनी जिल्हा अभियान व्यवस्थापक MSRLM यांच्या कार्यालयात ऑफलाइन पद्धतीने दिनांक 31 मार्च 2022 पर्यंत सादर करावे. या आधी ऑनलाईन अर्ज केलेल्या इच्छुक संस्थांनी पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही याची कृपया नोंद घ्यावी. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!