senior citizen ज्येष्ठ नागरिक कायदे अंतर्गत जर ज्येष्ठांना एक निर्वाह निधी मिळवायचा असेल तर त्यासाठी एक अर्ज जमा करावा लागतो. स्वखर्चाने स्वतःचा उदरनिर्वाह करून न शकणाऱ्या तसेच मुला-मुलींनी सांभाळ करण्यास नकार दिलेल्या वृद्धांना म्हणजे जेष्ठ नागरिकांना हा अर्ज भरून एक ठराविक रक्कम कायदेशीर रित्या दर महिन्यात मिळवता येते. तर हा महत्त्वपूर्ण अर्ज किंवा फॉर्म कुठे मिळणार, तो कसा भरायचा आणि तो कुठल्या कार्यालयामध्ये जमा करायचा, त्यासाठी कुठल्या कार्यालयाशी संपर्क साधायचा, या सर्व गोष्टी जाणून घ्या लेखाद्वारे.
ज्येष्ठ नागरिक निर्वाह निधी
- समेट करता किंवा पिठासेल अधिकारी अपीलेट ऑफिसर म्हणजे अपिलय अधिकारी आणि मेंटेनन्स ऑफिसर म्हणजे देखभाल किंवा निर्वाह अधिकारी तुमच्या जिल्ह्यामध्ये या सर्व अधिकाऱ्यांची तुम्हाला अर्ज करण्यासाठी संपर्क करायचा आहे.
- आता तुमच्या जिल्ह्यामध्ये हे अधिकारी कोण आहे त्यांच्या कार्यालयाचा फोन नंबर किंवा ईमेल आयडी काय आहे हे सर्व माहिती मिळणार तरी कुठे तर महाराष्ट्र शासनाच्या सोशल जस्टीस अँड स्पेशल असिस्टन्स डिपार्टमेंटच्या अधिकृत वेबसाईटवर हे सर्व माहिती उपलब्ध आहे. senior citizen
- प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला या ऑनलाइन सुविधाचा लाभ घेता येत नाही किंवा त्यांना ज्ञान नसल्यामुळे त्यांना ते हाताळता येत नाही परंतु तुम्ही तुमच्या ओळखीतील किंवा तुमच्या विश्वासातील एखाद्या व्यक्तीची यासाठी मदत घेऊ शकता.
- या वेबसाईटवर आल्यानंतर जर ती इंग्रजीमध्ये दिसत असेल तर उजव्या कोपऱ्यात भाषा तुम्ही बदलू शकता, भाषा मराठी करून घ्या.
- या आलेल्या बॉक्सवर ओके क्लिक करा म्हणजे वेबसाईट आता तुम्हाला मराठीमध्ये दिसेल.
- वर दिलेल्या या सर्व मेन्यू पैकी जेष्ठ नागरिक या मेन्यू वर क्लिक करा म्हणजे एक नवीन पेज समोर येईल.
- इथे दिलेल्या ऑप्शन पैकी न्यायाधीकरण या ऑप्शन वर क्लिक करा आता या पेजवर तुम्हाला जो अर्ज किंवा फॉर्म भरून द्यायचा आहे त्याचा नमुना डाऊनलोड करता येईल.
- निर्वाहासाठी अर्ज या लिंक वर क्लिक करा म्हणजे आवश्यक त्या फॉर्मची आवृत्ती किंवा कॉपी तुम्हाला इथून डाऊनलोड करता येईल तसेच ते प्रिंट देखील करता येते.
- तसेच या पेजवर वेगवेगळ्या अधिकाऱ्यांची लिस्ट तुम्हाला दिलेली आहे.
- समेट करता अधिकारी यावर क्लिक केले तर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्यामध्ये कोणत्या पदाणे तो अधिकारी असेल आणि त्याच्याशी संपर्क करण्यासाठी त्याच्या ऑफिसचा फोन नंबर सुद्धा तुम्हाला इथून मिळवता येतो.
- अपिलीय याधिकारी म्हणजे आपिलेट ऑफिसर यावर क्लिक करून जिल्ह्यानुसार अधिकाऱ्याचे नाव ऑफिसचा फोन नंबर आणि ईमेल आयडी सुद्धा तुम्हाला मिळवता येतो आणि निर्वाह अधिकारी कोण याचीही माहिती जिल्हा निहाय अधिकारी पद पत्ता फोन नंबर ई-मेल ही सर्व माहिती तुम्हाला इथून मिळू शकते. senior citizen
- अर्ज तुमच्या जिल्ह्यामध्ये नेमक्या कोणत्या ऑफिसमध्ये जमा करायचा त्याचा पाठपुरावा कुठे करायचा याची माहिती तुम्हाला या ठिकाणी दिलेल्या फोन नंबर वर अथवा ईमेल आयडी चा वापर करून मिळवता येऊ शकते.
अर्ज कसा भरायचा senior citizen
- सर्वप्रथम अर्जावर अर्जदार जेष्ठ नागरिकाचे संपूर्ण नाव लिहा त्याखाली वय जेंडर आणि नॅशनॅलिटी म्हणजेच राष्ट्रीयत्व लिहा.
- नंतर संपूर्ण पत्ता आणि मोबाईल नंबर भरा अर्जदार जेष्ठ नागरिक यांचा शेवटचा व्यवसाय कोणता किंवा कोणत्या ठिकाणी ते नोकरी करत होते तसेच त्यांना किती उत्पन्न मिळत होते अथवा नोकरी असेल तर किती पगार मिळत होता याची माहिती भरा.
- आता अर्ज ज्यांच्या विरोधात करत आहात त्या विरोधी पक्षकाची माहिती लिहा.
- अशा केसेसमध्ये विरोधी पक्षकार म्हणजे स्वतःची मुलं नातवंड किंवा कुटुंबातील इतर व्यक्ती ज्यांच्यावर अर्जदार जेष्ठ नागरिक अवलंबून आहे त्यांची माहिती किंवा त्यांचा तपशील त्या ठिकाणी भरायचा आहे.
- देखभाल खर्च ज्येष्ठ नागरिकांना ज्यांच्याकडून हवा आहे त्यांची माहिती जसे विरोधी पक्षकाराचे संपूर्ण नाव पत्ता अर्जदार जेष्ठ नागरिकाशी त्यांचं नातं काय ते काय व्यवसाय करतात किंवा कुठे नोकरी करतात त्यांचे त्यातून अंदाजित उत्पन्न किती आहे किंवा त्यांना पगार किती मिळतो ही सर्व माहिती भरावी.
- विरोधी पक्ष कराच्या मिळणाऱ्या उत्पन्नावर किंवा पगारावर घरातले किती लोक अवलंबून आहे ती सर्व माहिती.
- त्याखाली अर्जदार जेष्ठ नागरिक अथवा आई-वडील यांना किती मुलं आहेत त्याचा तपशील भरावा.
- तसेच अर्जदारासोबत राहत असलेल्या किंवा विभक्त झालेल्या अथवा मयत असलेला जोडीदाराची माहिती लिहा, अर्जदारास काही व्याधी असेल तर त्याची माहिती द्या.
- अर्जदाराच्या मालकीत जी सर्व मालमत्ता संपत्ती असेल त्याची माहिती जर त्या मालमत्तेतून संपत्तीतून काही उत्पन्न मिळत असेल तर त्याचाही तपशील या ठिकाणी लिहायचा आहे. senior citizen
- मालमत्ता सध्या आहे की सोडून दिली त्याचीही माहिती लिहा तसेच कोणतीही मालमत्ता कोणाला ट्रान्सफर केली असेल तरी ते होय अथवा नाही योग्य तो पर्याय निवडा.
- हो असेल तर ट्रान्सफर केलेल्या मालमत्तेचा देखील तपशील या ठिकाणी भरावा लागेल हे सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला हे डिक्लेरेशन किंवा प्रतिज्ञा व्यवस्थित वाचायचे आहे, ती वाचून समजून नंतर त्याखाली अर्ज कधी केला कोणत्या वर्षी केला आणि कुठे दाखल करणार आहात ती माहिती भरा, त्याखाली अर्जदाराची सही करा आणि अर्ज तुमच्या जिल्ह्यातील प्रेसिंग ऑफिसर म्हणजे पिठासीन अधिकारी किंवा समेटकरता अधिकाऱ्याकडे जमा करा.
- अर्ज जमा केल्यानंतर त्याखाली असलेली पोचपावती भरून ज्येष्ठ नागरिक निर्वाह न्यायधीकरणांकडून तुम्हाला दिली जाईल ज्यावर त्या कार्यालयाचा स्टॅम्प आणि अधिकाऱ्याची सही असेल.
Leave a Reply