farmers loan शेतमाल तारण कर्ज योजना किंवा कृषी तारण कर्ज योजना ही योजना महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळ राबवत असते आणि याची अंमलबजावणी पूर्ण महाराष्ट्रात झालेली आहे. तर कशा पद्धतीने तुम्ही कृषी तारण कर्ज योजनेसाठी अर्ज करू शकतात. नेमकी कृषी तारण कर्ज योजना कशा पद्धतीने वर्किंग करते आणि यासाठी तुम्हाला अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे किंवा योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला संपर्क कुठे करावा लागेल, याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या लेखाद्वारे जाणून घ्या.
शेतकऱ्याला आलेल्या आर्थिक गरजे पोटी तसेच स्थानिक पातळीवर शेतमाल साठवणुकीच्या पुरेसा सुविधा नसल्यामुळे शेतीमालाची काढणी हंगामात मोठ्या प्रमाणात होते व विक्रीसाठी येते साहजिकच शेतमालाचे बाजारभाव खाली येतात सादर शेतमाल साठवून करून काही कालावधीनंतर बाजारपेठ विक्रीसाठी आणि शेतमालाला जास्त भाव मिळू शकतो तेव्हा शेतकऱ्यांना त्याच्या शेतमालासाठी योग्य भाव मिळावा या दृष्टिकोनातून कृषी पणन महामंडळ सन 1990 ते 91 पासून शेतमाल तारण कर्ज योजना राबवत आहे.
या योजनेत खालील पिकांचा समावेश आहे
- सोयाबीन, सूर्यफूल, चना, भात, करडे, ज्वारी, बाजरी, मका, गहू, घेवडा, काजू बी, बेदामा, सुपारी, अणत, या शेतमालाचा समावेश करण्यात आलेला आहे. farmers loan
- त्यानंतर या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना बाजार समितीच्या गोदामात तारणात ठेवलेल्या शेतमालाच्या एकूण किमतीच्या 75 टक्के पर्यंत रक्कम सहा महिने म्हणजे 180 दिवस कालावधीसाठी सहा टक्के व्याजदराने तारण कर्ज दिल जाते.
- या योजनेअंतर्गत राज्य अथवा केंद्रीय वखार महामंडळाचे गोदाम गोदाम पावतीवरही शेतकऱ्यांना तारण कर्ज उपलब्ध करून देण्यात येतं.
- सदर योजना बाजार समिती मार्फत राबवल्या जात असून सहा महिन्याच्या आत तारण कर्जाची परतफेड करणाऱ्या समित्यांना तीन टक्के व्याज सवलत सुद्धा देण्यात येते.
योजनेची रचना आणि अंमलबजावणी farmers loan
1990 पासून महाराष्ट्र राज्य कृषी उत्पन्न मंडळ ही तारण कर्ज योजना राबवत आहे. तर या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवणे आणि त्यांना बाजारातील दर वाढल्यावर चांगल्या किमतीमध्ये माल विकण्याची संधी उपलब्ध करून देणे.
योजनेअंतर्गत प्रक्रिया कशी आहे
- प्रथम शेतकरी आपला माल एम पी एम सी च्या गोदामात सुरक्षित ठेवतो.
- त्यानंतर मालाच्या बाजारातील मूल्याच्या 75 टक्के इतकी रक्कम शेतकऱ्याला कर्ज स्वरूपात दिली जाते.
- कर्जाचे व्याजदर या 6% आहे जो सहा महिन्याच्या कालावधीसाठी लागू होतो.
- त्यानंतर शेतकऱ्याला आपला माल विक्री करिता ठेवण्यासाठी कोणतेही साठवणूक शुल्क्य एक्स्ट्रा आकारले जात नाही. farmers loan
- जर शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड सहा महिन्याच्या आत केली तर त्याला तीन टक्के व्याज हे प्रोत्साहन म्हणून त्या व्याज मध्ये सवलती दिली जाते.
- महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाने 1990-91 ते 2021-22 दरम्यान या योजनेद्वारे शेतकऱ्यांना सुमारे 24,831.73 लाख रुपयाचे तारण कर्ज वितरित केले आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा ठरत आहे.
- या योजनेअंतर्गत जे विविध पीक असतील त्यांच्यासाठी विविध व्याजदर हे निश्चित करण्यात आलेले आहे.
पात्रता farmers loan
- शेतीमाल तारण कर्ज योजनेअंतर्गत फक्त उत्पादक शेतकऱ्यांचा शेतीमाल स्वीकारला जातो, व्यापाऱ्यांचा शेतीमाल या योजनेअंतर्गत स्वीकारला जात नाही.
- प्रत्यक्षात तारण ठेवलेल्या शेतीमालाची किंमत ही त्या दिवसाच्या बाजारभाव किंवा शासनाने जाहीर केलेल्या खरेदी किंमत यापैकी जी किंमत असेल त्यावर ठरवली जाते.
- तारण कर्जाची मुदत 6 महिने म्हणजेच 180 दिवस लागू असते त्यानंतर या कर्जात सहा टक्के व्याजदर आहे.
- मालाची किंमत ही शेतीमालाचा बाजारभाव किंवा सरकारद्वारे जाहीर हमीभाव जो कमी असेल त्यावरून कर्जाची रक्कम ठरते त्यामुळे बाजारातील अनियमित किमतीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होण्यास प्रमाण एक कमी होते.
कर्ज कालावधी
- 180 दिवसांचा कर्ज कालावधीत यावर तुम्हाला 6 टक्के व्याज आहे त्यानंतर 180 दिवसानंतर दर 8 टक्के वर होतो आणि 365 दिवसानंतर बारा टक्के होतो.
- बाजार समित्या शेतकऱ्यांच्या मालाची साठणूक देखरेख आणि सुरक्षा मोफत करतात.
- त्याबरोबर संबंधित बाजार समिती मालाचा विमा उतरवण्याची जबाबदारी घेत असतात.
- तुमच्या मालाचा काहीतरी नुकसान झालं तर त्यावर बाजार समित्या विमा ही प्रोव्हाइड करत असतात. farmers loan
- गोदाम पावत्यांवर कर्ज
- राज्य गोदाम महामंडळ किंवा केंद्रीय गोदाम महामंडळाच्या पावत्यांवरही शेतकऱ्यांना कर्ज दिले जातं.
- तारण ठेवलेल्या शेतीमालाची साठवणूक देखरेख व सुरक्षा बाजार समिती करते ती पण विनामूल्य असते.
- तारणातील शेतमालाचा विमा उतरवण्याची जबाबदारी संबंधित बाजार समितीकडे राहते.
- राज्य अथवा केंद्रीय वखार महामंडळाच्या गोदाम पावतीवरही बाजार समितीयांकडून तारण कर्ज उपलब्ध करून देण्यात येत.
योजनेचे फायदे काय ? farmers loan
- शेतकऱ्यांना बाजारातील अनियमित घरांपासून संरक्षण मिळते.
- आर्थिक स्थैर्य प्राप्त होतं आणि आपल्या मालावर चांगल्या किमती मिळवण्याची संधी त्यांना मिळते.
- माल सुरक्षित ठेवण्यासाठी कोणते शुल्क लागत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च देखील वाचतो.
- तारण कर्ज योजनेमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन सुधारते आणि नुकसानही कमी होते.
- एमएसएएमबीची कृषी तारण कर्ज योजना शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत प्रभावी उपाय आहे.
- या योजनेमुळे शेतकऱ्यांना बाजारातील दरांमधील चढउतारांची सामना करण्यासाठी आर्थिक पाठबळ मिळते.
- शेतकऱ्यांच्या करण्यासाठी आणि त्यांच्या उत्पन्न वाढीसाठी योजना खूप महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असते.
- एकंदरीत कृषी तारण कर्ज योजना काय आहे तुम्ही जो माल शेतीमध्ये पिकवता तो माल तुम्ही तुमच्या डिस्टिक लेव्हलचे बाजार समिती असेल तर त्या बाजार समितीच्या गोदामामध्ये ठेवू शकता, आणि त्या मालाच्या 75 टक्के रक्कम तुम्हाला ही कर्ज स्वरूपात मिळू शकते.
- त्या मालाच्या चालू भावाच्या 75 टक्के रक्कम असेल तर ती 75 टक्के कर्ज स्वरूपात तुम्हाला मिळते, 6 टक्के व्याजदरावर 180 दिवसांसाठी 180 दिवसानंतर तुम्ही जर कर्ज फेडलं नाही तर याचं व्याज वाढत जात, जसे की 8 टक्के जसे की 12 टक्के त्यानंतर तुम्ही जरी 180 दिवसाच्या आत एक कर्ज फेडलं त्यानंतर तुम्हाला प्रोत्साहन म्हणून तीन टक्के व्याज सवलती दिली जाते.
- तुमच्या मालाचा भाव वाढला तर तेव्हा तुम्ही तेव्हा म** तुमचा विकू शकतात कर्ज ऑन द स्पॉट क्लिअर करू शकता.
Leave a Reply