pm kisan yojana

pm kisan yojana PM किसान नवीन नोंदणी & अपात्र लाभार्थी पात्र

pm kisan yojana पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यासाठी मोठी खुशखबर केंद्र सरकारच्या माध्यमातून देण्यात आली आहे. ज्या लाभार्थ्यांना नवीन नोंदणी पीएम किसान सन्मान निधी योजनेमध्ये करायचा आहे. किंवा जे लाभार्थी विनाकारण अपात्र यादीमध्ये गेलेले आहे. आशा लाभार्थ्यांना परत पात्र होण्यासाठी एक प्रसिद्धी पत्रक केंद्र सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. यामध्ये पूर्ण स्पष्टपणे उल्लेख करण्यात आलेला आहे. नोंदणी कोणत्या ठिकाणी करायची आहे यासाठी नवीन डॉक्युमेंट्स कोणकोणते लागतात पूर्ण व्यवस्थित माहिती जाणून घ्या.

असं करा रजिस्ट्रेशन

  • प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनांमध्ये जर नोंदणी करायची असेल तुम्हाला स्वतःहून तर पीएम किसान सन्मान निधी योजनांच्या अधिकार पोर्टल वरती या.
  • न्यू फार्मर रजिस्ट्रेशन यावरती क्लिक केल्यानंतर तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे.
  • त्यानंतर मोबाईल नंबर टाका त्यानंतर राज्य सिलेक्ट करा त्यानंतर खाली दिलेला कॅपच्या व्यवस्थित टाका आणि गेट ओटीपी या टॅब वर क्लिक करा त्यानंतर पुढील व्यवस्थित माहिती भरून घ्या. pm kisan yojana
  • जे लाभार्थी अपात्र यादीमध्ये गेलेले आहे अशा लाभार्थ्यांना परत पात्र यादीमध्ये येण्यासाठी कोणत्या ठिकाणी तुम्हाला अप्लाय करायचा आहे कोणते डॉक्युमेंट्स द्यायचे आहे.
  • स्वयं नोंदणी करत लाभार्थी अर्जाची कार्यपद्धती प्रधानमंत्री किसान सन्माननीय योजनेमध्ये जे लाभार्थी अर्ज करणार आहे अशा लाभार्थ्यासाठी ही माहिती महत्त्वपूर्ण आहे.
  • प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत म्हणजे पीएम किसान योजना नवीन स्वय नोंदणी करणाऱ्या लाभार्थ्यांना सुचित करण्यात येते की सदर योजनेच्या पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करताना खालील प्रमाणे कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे.
  • सर्व कागदपत्रे २०० केबी फाईल मर्यादेत अपलोड करावीत असा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे.
pm kisan yojana

डॉक्युमेंट्स कोणकोणते लागतात pm kisan yojana

1)
मागील तीन महिन्यातील डिजिटल तलाठी सहीचा सातबारा उतारा तुमच्याकडे असणे आवश्यक आहे.
यासाठी तहसीलदाराकडे किंवा तलाठ्याकडून तुम्हाला नवीन सातबारा घेण्याची गरज नाही डिजिटल सातबारा शक्यतो अपलोड करा डिजिटल सातबारा तुमचा नसेल तर तलाठीचा सहीचा सातबारा तुम्हाला या ठिकाणी अपलोड करावा लागेल.

2)
जमीन नोंदीचा फेरफार लाभार्थ्यांच्या नावे जमिनी धारणा 1 फेब्रुवारी 2019 पूर्वीची असणे आवश्यक्य आहे. pm kisan yojana
यापूर्वीचा जर तुमचा फेरफार नसेल तर या ठिकाणी समजून घ्या अपवाद वारसा हक्काने झालेले जमीन हस्तांतरण असणे आवश्यक आहे.
1 फेब्रुवारी 2019 नंतर जर वारसा हक्काने जमीन तुमच्या नावावर झाली असेल तर आशा लाभार्थ्यांना सुद्धा या योजनेअंतर्गत नवीन नोंदणी करता येतं आणि पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेता येतं.
परंतु कोणते लाभार्थी यामध्ये वारसा हक्का नुसार लाभ घेऊ शकतात.

3)
वारसा नोंद फेरफार मयत दिनांक 1 फेब्रुवारी 2019 नंतरची असल्यास ज्यांच्या नावावरून वारसाने जमीन आली त्यांच्या नावे जमीन असलेला फेरफार सोबत जोडावे लागेल.
जर वारसा नोंद फेरफार मयत एक फेब्रुवारी 2019 नंतर झाले असल्यास त्यांच्या नावावर जी जमीन झालेली आहे वारसा हक्काने आलेली जमीन तर त्यासाठी तुम्हाला त्यांचं मृत्यू प्रमाणपत्र सुद्धा जोडावा लागेल आणि वारसा हक्काचा जो जमीन नाव करण्यात आलेला जो नोंदणी आहे फेरफार तो सुद्धा तुम्हाला या ठिकाणी जोडावं लागणार आहे.

4)
पती-पत्नी व अठरा वर्षाखालील अपत्यांचे आधार कार्ड सर्व एकाच पानावर स्कॅन करावे.
पती पत्नी व अठरा वर्षाखालील त्यांचे अपत्यांचे आधार कार्ड सर्व एकाच पानावर स्कॅन करावे.
वरील सर्व ऑनलाईन अपलोड केलेली कागदपत्रे पडताळणी अंती सदर लाभार्थ्यांना मान्यता मिळेल.
हे सर्व डॉक्युमेंट तुमच्याकडे ओके असणे गरजेचे आहे हे डॉक्युमेंट कशा पद्धतीने अपलोड करावेत याबद्दलची सुद्धा माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे.

लाभार्थी अपात्रता मागे घेण्याची कार्यपद्धती

  • अपात्रता मागे घेण्याचे विहित नमुन्यातील अर्ज आता विहित नमुनातील अर्ज तुमच्या गावातील कृषी सहाय्याकडे मिळेल. pm kisan yojana
  • लाभार्थ्यांची पोर्टल वरील स्टेटस प्रिंट तुम्हाला काढायचे आहे.
  • आधार कार्ड पती-पत्नी व अठरा वर्षाच्या आतील अपत्यांचे तुम्हाला सर्व आधार कार्ड चे झेरॉक्स या अर्जासोबत जोडायचे आहे.
  • परिशिष्ट ब (कृषी सहाय्यक यांनी प्रमाणित केलेले प्रमाणपत्र) तुम्हाला यासोबत जोडायचे आहे. आता तो प्रमाणपत्र कृषी सहाय्याकडे तुम्हाला मिळेल.
  • नवीन सातबारा व आठ अ उतारा डिजिटल किंवा तलाठी सहीचा यासोबत जोडावं लागेल.
  • डिजिटल सातबारा जर तुमचा असेल तर तलाठ्याचा सहीचा सातबारा या ठिकाणी देणे गरजेचे नाही.
  • जर डिजिटल सातबारा तुमचा नसेल तर तलाठीचा तुम्हाला सातबारा यासोबत जोडावा लागेल.
  • वरील प्रमाणे जमिनी नोंदीचा फेरफार वारसा नोंदीचा फेरफार हे तुमच्याकडे असणं आवश्यक आहे.
  • जर जमीन नोंदीचा फेरफार जर असेल तर जोडा किंवा भरपूर असे लाभार्थी वारसा हक्काने आलेले आहे त्यांचासुद्धा वारसा हक्काचा नोंदीचा फेरफार यासोबत जोडावा लागतो.
  • वरील सर्व अपात्रता मागे घेण्याची कागदपत्रे दोन प्रतीत तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सादर करावे.
  • हे सर्व डॉक्युमेंट जेल अपात्र झालेले लाभार्थी आहे अशा सर्व अपात्र लाभार्थ्यांना जे काही देण्यात आलेले आहे हे सर्व सहा डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन जायचे आहे कृषी अधिकारी कार्यालय मध्ये हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला सादर करायचे आहे.
  • अधिक माहिती जर तुम्हाला याबद्दलची पाहिजे असेल तर तुमच्या गावाच्या कृषी सहायकांना तुम्हाला संपर्क साधायचा आहे. pm kisan yojana
  • या योजनेबद्दल अजून व्यवस्थित माहिती त्यांच्याकडून उपलब्ध होईल.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *