pradhan mantri shramyogi mandhan yojana पीएम श्रमयोगी मानधन योजनेची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. पीएम श्रमयोगी मानधन योजना ही केंद्र सरकार मार्फत सुरू करण्यात आलेली योजना आहे. या योजने अंतर्गत असंघटित क्षेत्रातील कामगारांना आर्थिक मदत मिळणार आहे. या योजनेअंतर्गत असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना त्यांच्या उतार वयात या योजनेच्या माध्यमातून 3000 रुपये प्रति महा पेन्शन रक्कम दिली जाणार आहे.
पीएम श्रमयोगी मानधन योजना ही असंघटित क्षेत्रातील नागरिकांसाठी आहे. असंघटित क्षेत्र म्हणजे काही असे क्षेत्र जे सरकारसोबत रजिस्टर नसतात त्यामध्ये जसे कामगार रस्त्यावरील धंदे करणारे वेंडर्स, रिक्षावाले, घरगुती काम करणाऱ्या स्त्रिया यांचा समावेश होतो.
प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेची सुरुवात फेब्रुवारी 2019 रोजी असंघटित क्षेत्रातील नागरिकांसाठी केली होती. या योजनेमध्ये होणाऱ्या संपूर्ण कामाची देखरेख ही मिनिस्ट्री ऑफ लेबर अँड एम्प्लॉयमेंट विभाग करते. या योजनेमधून लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी LIC व CSC सेंटर अमलबजावणी करते.
या योजनेअंतर्गत असंघटित क्षेत्रातील नागरिकांना महिन्याला काही छोटीशी रक्कम भरून वयाचे 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर निवृत्ती रक्कम पेन्शन स्वरूपात कमीत कमी 3 हजार रुपये प्रतिमहा केंद्र सरकार मार्फत दिले जाते. PIB च्या माहितीनुसार 22 जुलै 2024 पर्यंत असंघटित क्षेत्रातील 29.82 कोटी नागरिकांनी विश्राम पोर्टलवर नोंदणी केली आहे. तरी सर्वांनी आपणही लवकरात लवकर या योजनेचा अर्ज करून सदर योजनेचा लाभ घेऊ शकता.
प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेचे फायदे
PMSYM प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेचा फायदा असंघटित क्षेत्रातील कामगारांना यांनी होतो
PMSYM या योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना सेवानिवृत्तीनंतर आर्थिक सहाय्य मिळावे यासाठी पेन्शन सुविधा उपलब्ध केली आहे.
लाभार्थ्यांना या योजनेमध्ये महिन्याला फक्त 55 रुपये गुंतवण वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर 3 हजार रुपये प्रतिमा पेन्शन स्वरूपात रक्कम मिळते.
PMSYM ही योजना केंद्र सरकारमार्फत सुरू करण्यात आलेली योजना आहे.
PMSYM या योजनेअंतर्गत मिळणारी पेन्शनची रक्कम ही लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये डीबीटी मार्फत जमा केली जाते
लाभार्थ्यांकडून जेवढी रक्कम गुंतवणूक केली जाते तेवढेच रक्कम केंद्र सरकार मार्फत आर्थिक स्वरूपात देण्यात येते.
प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन ही योजना सेंट्रल सेक्टर स्कीम आहे यामध्ये केंद्र सरकार संपूर्ण आर्थिक मदत करते pradhan mantri shramyogi mandhan yojana
PMSYM या योजनेमध्ये सहभागी असणाऱ्या व्यक्तींचे 60 वर्षा अगोदर निधन झाल्यास त्यांचे जोडीदार गुंतवणूक चालू ठेवू शकतात किंवा अकाउंट बंद करून जेवढी रक्कम भरली आहे त्यानुसार सेविंग बँक व्याजदर लागू होऊन रक्कम दिली जाते.
अर्ज करणाऱ्या नागरिकाचे वय कमी असेल तर कमी प्रीमियम भरावा लागतो जास्त वय असेल तर जास्त प्रीमियम भरावा लागतो
वय 18 वर्ष वय असलेल्या नागरिकांना प्रत्येक महिन्याला 55 रुपये भरावे लागतात जर नागरिकांचे वय 40 असेल तर 200 रुपये पर्यंतची रक्कम प्रति महा भरावी लागते
लाभार्थीचे 60 वर्षानंतर निधन झाल्यावर पेन्शनची रक्कम जोडीदाराला 50 टक्के प्रमाणे देण्यात येते
PMSYM या योजनेअंतर्गत भरला जाणारा प्रीमियम हा लाभार्थ्याच्या बँक खात्यातून डेबिट करून घेतला जातो त्यामुळे कोणताही प्रीमियम चुकत नाही.
प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेची पात्रता pradhan mantri shramyogi mandhan yojana
- अर्जदार महाराष्ट्राचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे
- अर्जदार हा असंघटित क्षेत्रातील नागरिक असावा
- अर्जदार आयकर दाता नसावा
- अर्जदाराचे स्वतःचे बँक खाते असावे
- अर्जदाराचे वय 18 वर्षे ते 40 वर्ष दरम्यान असावे
- अर्जदाराच्या महिन्याचा पगार हा 15000 रुपयांपेक्षा कमी असावा
- अर्जदाराकडे ही श्रम कार्ड असणे आवश्यक आहे
पीएम श्रम योगी मानधन योजनेचे लाभार्थी
- सफाई कामगार
- लहान व मध्यम शेतकरी
- पशुपालन
- मासेमारी करणारे नागरिक
- जमीन नसलेले शेतकरी
- भाजी व फळे विकणारा वेंडर
- रिक्षावाले
- पॅकिंगचे काम करणारे नागरिक
- एका राज्यातून दुसरा राज्यात कामासाठी आलेले नागरिक
- घरगुती काम करणारे
- बांधकाम कामगार
- वीट, भट्टी व दगड खाणीमध्ये लेबलिंग व पॅकिंग करणारे कर्मचारी
लागणारी आवश्यक कागदपत्रे pradhan mantri shramyogi mandhan yojana
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- उत्पन्नाचे प्रमाणपत्र
- वयाचे प्रमाणपत्र
- रहिवासी प्रमाणपत्र
- श्रम कार्ड
PM Shram Yogi Mandhan Yojana Apply
प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेचा ऑफलाईन अर्ज प्रक्रिया
प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेचा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी तुम्हाला एलआयसी ऑफिस, कॉमन सर्विस सेंटर, सीएससी, जिल्ह्यामधील कामगार विभाग यामध्ये जावे लागेल
त्याचप्रमाणे अर्ज करण्यासाठी एलआयसी एजन्टची सुद्धा निवड करून शकता
त्यानंतर सीएससी सेंटर मध्ये जाऊन तिथून तुम्हाला या योजनेचा अर्ज घ्यावा लागेल
अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती अचूकपणे भरावी लागेल.
PM Shram Yogi Mandhan Yojana Online Apply
प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेचा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी अर्जदाराला सर्वप्रथम सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल
तेथे तुम्हाला वेबसाईटचे डॅशबोर्ड दिसेल उघडेल त्या होम पेज मध्ये तुम्हाला क्लिक हेअर टू अप्लाय नाऊ या पर्यावर जावे लागेल
तेथे गेल्यावर तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला सेल्फ इनरोलमेंट असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा
त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकून प्रोसीड या बटनवर क्लिक करा
त्यानंतर तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती जसे की तुमचे नाव, ईमेल आयडी इत्यादी माहिती भरावी लागेल.
त्यानंतर कॅपच्या कोड टाकून ओटीपी वर क्लिक करा
त्यानंतर ओटीपी व्हेरिफाय झाल्या नंतर तुमच्यासमोर प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेचा अर्ज उघडेल
अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती अचूकपणे भरा
त्यानंतर आवश्यक ते कागदपत्रे अपलोड करा
त्यानंतर सबमिट या बटनवर क्लिक करा
अशा अत्यंत सोप्या पद्धतीने तुम्ही प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेचा ऑनलाईन अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊ शकता. pradhan mantri shramyogi mandhan yojana
Leave a Reply