bhausaheb fundkar falbag yojana नुकतीच राज्य सरकारने भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत 100 टक्के फळबाग लागवडीसाठी अनुदान मिळू शकतात. या योजनेसाठी तुम्हाला कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे. या योजनेची अंमलबजावणी कशा पद्धतीने होईल. कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणारे प्रोसेस कशी आहेत याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या लेखाद्वारे जाणून घ्या.
राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जातात त्यामध्ये एक महत्वकांशी योजना भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्याला फळबाग लागवडीसाठी प्रति एकर 1 लाख 40 हजार रुपये अनुदान हे राज्य सरकार मार्फत मिळत आहे. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेसाठी शासनातर्फे 18 जानेवारी 2024 ला जीआर सुद्धा निर्गमित करण्यात आलेला होता. या योजनेअंतर्गत फळबाग लागवड करण्यासाठी अनुदान देण्यात येणार आहे.
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आंबा, डाळिंब, काजू, पेरू, सिताफळ, आवळा, चिंच, विकसित जाती, जांभूळ, कोकम, फणस, कागदी लिंबू, चिकू, संत्रा, मोसंबी, अंजीर ई. झाडांसाठी अनुदान देण्यात येणार आहे.bhausaheb fundkar falbag yojana

योजनेअंतर्गत दिल्या जाणारे अनुदान
- भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी शंभर टक्के अनुदान दिले जाते.
- अनुदानाची रक्कम खड्डे खोदणे, कलमे लागवड करणे, पीक संरक्षण, नांग्या भरणे, ठिबक सिंचनाद्वारे पाणी देणे इत्यादी कामे करण्यासाठी दिलं जातं.
- भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत लागवडीसाठी पात्र असलेल्या फळ पिकांचं आणि अनुदानाच्या मर्यादेचा तपशील खालील प्रकारे आहे.
फळ पीक | प्रती हेक्टरी अनुदानाची मर्यादा (रू.) |
आंबा | 53,561 |
काजू | 55,578 |
पेरू | 202,090 |
डाळिंब | 109,487 |
संत्रा, मोसंबी, कागदी लिंबू | 62,578 |
नारळ | 59,622 |
या योजनेअंतर्गत कशा पद्धतीने लाभ मिळतो bhausaheb fundkar falbag yojana
- एखाद्या शेतकऱ्यांनी 1 हेक्टर आंबा लागवड केली तर त्याला 53,561 रुपये अनुदान मिळेल.
- या अनुदानामध्ये खड्डे खोदणे, कलमे लागवड करणे, पीक संरक्षण, नांग्या भरण्याची, ठिबक सिंचनाद्वारे पाणी घालने इत्यादी कामांसाठी हा खर्च तुम्हाला दिला जात असतो.
- अनुदानाची रक्कम डायरेक्ट बँक अकाउंट मध्ये डीबीटीच्या माध्यमातून जमा केली जाते.
- भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेअंतर्गत लागवड करायची असेल फळबाग तर ठिबक असणे अनिवार्य आहे.
- ठिबक सिंचनाने तुम्ही फळबाग करू शकतात यासाठी ही एक अट अनिवार्य राज्य सरकारने केली आहे.
- या प्रवर्गाअंतर्गत ज्या शेतकऱ्यांना कुटुंबाची उपजीविका केवळ शेतीवर अवलंबन आहे त्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल त्यानंतर अन्य शेतकऱ्यांचा विचार केला जाईल.
लागणारी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- मतदान कार्ड
- ओळखपत्र
- सातबारा उतारा
- उत्पन्न दाखला
- जातीचा दाखला
- बँक खाते पासबुक
- मोबाईल क्रमांक
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- दिव्यांग असल्यास (हंडीकॅप सर्टिफिकेट) लागेल bhausaheb fundkar falbag yojana

असा करा अर्ज ✅ 📄 bhausaheb fundkar falbag yojana
- भाऊसाहेब फुडकर फळबाग लागवड योजना साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- महाडीबीटीच्या अधिकृत पोर्टलवर जा त्या पोर्टल वर अकाउंट लॉगिन करा.
- लॉगिंग केल्यास फळबाग लागवड योजना असा पर्याय दिसेल
- या ऑप्शनवर क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढे एक फॉर्म उघडेल
- त्या फॉर्म मधील संपूर्ण माहिती अचूक पद्धतीने भरा.
- आणि सगळे डॉक्युमेंट अपलोड करा डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर एकदा माहिती क्रॉस चेक करून घ्या माहिती क्रॉस चेक केल्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करा.
- डॉक्युमेंट अपलोड करताना सातबारा उतारा आधार कार्ड मतदान ओळखपत्र पासपोर्ट आकाराचा फोटो बँक पासबुकचं झेरॉक्स असेल ते तुम्हाला अपलोड करावे लागेल.
- त्यानंतर अर्ज सबमिट करा सबमिट केल्यानंतर तुम्ही सक्सेसफुली भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेसाठी अर्ज करू शकता.
- जर महाडीबीटीवर रजिस्ट्रेशन करता येत नसेल तर csc सेंटरला जाणून सुद्धा तुम्ही फळबाग योजनेसाठी अर्ज करू शकता.
Leave a Reply