Talathi Bharti 2023 : कधीपासून सुरु होणार तलाठी अर्ज प्रक्रिया; महसूल मंत्र्यांनी सांगितली तारीख – ४४७९+५१८ पदांना मंजुरी!

Talathi Bharti 2023 : महाराष्ट्र तलाठी भरती 2023 साठी नवीनतम अपडेट. ताज्या बातम्यांनुसार, 3628 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया 15 मार्च 2023 पासून संपूर्ण महाराष्ट्रात सुरू होईल. लवकरच भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. हे अपडेट्स विखे पाटील यांनी लोणी, अहमदनगर येथे दिले आहेत. जिल्हा तलाठी संवर्गातील मंजूर 12636 पदांपैकी एकूण 8574 पदे कायमस्वरूपी असून उर्वरित पदे तात्पुरत्या स्वरूपाची आहेत. तलाठी भरती 2023 लवकरच होणार आहे.

तलाठी भरती ऑगस्ट 2023 पर्यंत पुर्ण होणार आहे. यासंदर्भातील अधिकृत जाहिरात मार्च महिन्यात प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे इच्छुकांनी आता तयारीला लागायला हवे. जाहिरातीपूर्वी आवश्यक माहिती जाणून घ्या.

👉५ तारखेला पावसाची दाट शक्यता पंजाबराव डख👈

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

 • या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार बारावी आणि ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण झालं असणं आवश्यक आहे.
 • तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
 • तसंच उमेदवारांना मराठी, हिंदी आणि इंग्रजी विषयांचं चांगलं ज्ञान असणं आवश्यक आहे.
 • तसंच राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या सर्व अटी आणि शर्थी उमेदवारांनी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

Talathi Bharti 2023 : अशा पद्धतीनं करा अर्ज

 • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
 • अर्जदाराचे स्वतःचे gmail account आवश्यक आहे.
 • अर्ज योग्यरीत्या भरून झाल्यावर submit हे बटन क्लिक करावे.
 • अर्जाची प्रत आपल्या gmail account वर प्राप्त होईल
 • सदर अर्ज प्रिंट करून मुलाखतीच्या दिवशी प्रिंट केलेल्या अर्जा सह उपस्थित असणं आवश्यक आहे.

Talathi Bharti 2023 : ही कागदपत्रं आवश्यक

 • Resume (बायोडेटा)
 • दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
 • शाळा सोडल्याचा दाखला
 • जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
 • ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
 • पासपोर्ट साईझ फोटो

राज्यात 3110 तलाठी आणि 518 महसूल मंडळे निर्माण करण्यास शासनाने यापूर्वीच मान्यता दिली आहे. सरकारने आता या महसूल मंडळांसाठी 3110 तलाठी आणि 510 मंडल अधिकाऱ्यांची एकूण 3628 पदे निर्माण करण्यास मान्यता दिली आहे. मराठवाड्यात केवळ महसूल प्रशासनाचीच तब्बल १६९३ पदे रिक्त असल्याची माहिती प्रशासकीय यंत्रणेकडून प्राप्त झाली आहे. यात लघुलेखक, तलाठी, अव्वल कारकून, मंडळ अधिकारी, लिपिक टंकलेखकसह शिपाई पदांचा समावेश आहे. रिक्तपदांमुळे कर्मचाऱ्यांवरही कामाचा ताण वाढल्याचे चित्र सर्वच शासकीय कार्यालयांमध्ये सध्या दिसत आहे.

👉घरबसल्या बनवा तुम्ही तुमच्या मुलांचे आधार कार्ड👈

सध्या महसूल कर्मचाऱ्यांवर कामाचे ताण वाढले आहे. आठही जिल्ह्यांसाठी वर्ग ३ आणि ४ (तलाठी संवर्गाच्या ३२१८ पदांसह) ७ हजार ४४४ पदे मंजूर आहेत. त्यापैकी सध्या ५ हजार ७५१ कर्मचारी जिल्हानिहाय रिक्तपदे कार्यरत आहेत. तर १ ६९३ पदे रिक्त आहेत. शिवाय प्रत्येक महिन्यात चार ते पाच कर्मचारी सेवानिवृत्त होतच आहेत. परंतु असे असतानाही शासनाकडून अद्याप रिक्त पदांच्या भरती प्रक्रियेला सुरुवात करण्यात आलेली नाही.

 • नाशिक – ८०३ जागा
 • कोकण – 641 जागा
 • नागपूर – 550 जागा
 • अमरावती – 124 जागा
 • पुणे – 702 जागा
 • छत्रपति संभाजीनगर – ७९९ जागा

जिल्हानिहाय रिक्त जागा

जिल्हातालाठीगट ब ते ड श्रेणी
छत्रपति संभाजीनगर१६३१६०
जालना११८३८
परभणी१०५५१
हिंगोली७६६५
नांदेड११९१२४
लातूर६३७५
बीड १६४१४४
धाराशिव ११७५६
एकूण९४४७४८

महाराष्ट्र राज्य सरकारकडून नुकतीच तलाठी पदासाठीच्या तब्बल 4122 जागांच्या आपदांसाठी मेगाभरती जाहीर करण्यात आली आहे. विविध शहरांमधील शेकडो जागांसाठी ही भरती घेण्यात येणार आहे. जिल्ह्यांप्रमाणे आणि झोनप्रमाणे भरती होणार असलेल्या जागांची माहिती नोटिफिकेशनमध्ये देण्यात आली आहे. आता या भरती संदर्भात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. या भरतीसाठी रजिस्ट्रेशन लवकरच सुरु होणार आहेत. तलाठी भरती 2022 रिक्त असलेली 4 हजार 122 पदांसाठी शासन निर्णय (GR) आला आहे. याच्यात सर्व राज्यातील जिल्ह्यातील रिक्त असलेली तलाठी एकुण पदे देण्यात आली आहे.

👉महसूल व वन विभाग क्या संकेतस्थळ जाण्यासाठी इथे क्लिक करा👈

3 thoughts on “Talathi Bharti 2023 : कधीपासून सुरु होणार तलाठी अर्ज प्रक्रिया; महसूल मंत्र्यांनी सांगितली तारीख – ४४७९+५१८ पदांना मंजुरी!”

 1. Pingback: HSC 2023 : पेपर तपासणीवरील बहिष्कार तूर्त मागे बारावीच्या विद्यार्थ्यांचे टेन्शन संपले. - Indien Farmer

 2. Pingback: Madhmashi Palan शेतकरी होणार मालामाल, वर्षाला कमवा 1 लाख - Krushi Vasant

 3. Pingback: Saral Seva Bharti ७५ हजार पदभरतीची प्रक्रीया सुरु, राज्य शासनाचा मोठा निर्णय - Krushi Vasant

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!