Soybean update : सोयाबीन बाजार भाव गेल्या काही दिवसांपासून स्थिर पाहायला मिळत होते. मात्र आज सोयाबीन दरात थोडीशी घसरण झाली आहे. पैठण एपीएमसी मध्ये सोयाबीन बाजार भाव 5000 रुपये प्रति क्विंटल पेक्षा खाली गेले आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मन दुखावले आहे. गेल्यावर्षी सोयाबीनला चांगला बाजार भाव मिळाला असल्याने यावर्षी देखील तशीच काहीशी परिस्थिती राहील आणि शेतकऱ्यांना चागला भाव मिळेल अशी सोयाबीन उत्पादकांना आशा होती. मात्र, यावर्षी हंगाम सुरू झाल्यापासून ते आतापर्यंत सोयाबीन दर फारसे असे वाढलेले नाहीत. मध्यंतरी सोयाबीन 6,000 रुपये प्रति क्विंटल एवढ्या सरासरी दरात विकला जात होता.
मात्र तदनंतर दरात घसरण झाली आणि बाजारभाव साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटलवर आला. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून साडेपाच हजार रुपये प्रतिक्विंटलच्या आसपास सोयाबीन दर होता. मात्र आज पैठण मध्ये झालेल्या लिलावात सोयाबीन दरात घसरण झाली असून इतर एपीएमसी मध्ये देखील आज सोयाबीन बाजार भाव पाच हजार 200 रुपये प्रति क्विंटलच्या आतच राहिलेत.यामुळे पुन्हा एकदा सोयाबीन उत्पादकांची दरवाढीची आशा मावळली आहे. अशा परिस्थितीत आज आपण राज्यात सोयाबीनला काय दर मिळाला आहे याविषयी जाणून घेणार आहोत.
Soybean update जळकोट कृषी उत्पन्न बाजार समिती
जळकोट मार्केटमध्ये 144 क्विंटल पांढरा सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये सोयाबीनला 5025 किमान दर मिळाला असून 5475 क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 5175 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
Soybean update पैठण कृषी उत्पन्न बाजार समिती
पैठण मार्केटमध्ये 1 क्विंटल सोयाबीन पिवळा आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये सोयाबीनला 4990 किमान दर मिळाला असून 4990 क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर देखील 4990 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
आष्टी- कारंजा कृषी उत्पन्न बाजार समिती
आष्टी कारंजा मार्केटमध्ये 131 क्विंटल पिवळा सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये सोयाबीनला 4820 किमान दर मिळाला असून 5400 क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 5165 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
Pingback: Guar market 2023 : गवार लवकरच 7000 च्या पातळीवर पोहोचेल, जाणून घ्या आणखी किती वाढ होण्याची शक्यता आहे. - Indien Farmer