Solar energy fencing scheme:- सौर ऊर्जा कुंपण योजना शेतकऱ्यांना मिळणार ७५ टक्के अनुदान.

                शेतीला कुंपण असेल तर त्याचे अनेक फायदे हे शेतकऱ्याला होत असतात. शेतीला तार कुंपण असेल तर पिकांचे नुकसान करणाऱ्या वन्य प्राण्यांपासून पिकांचा बचाव होत असतो परिणामी उत्पन्न जास्त येते. शेतीसाठी तार कुंपण असेल तर त्याचे अनेक फायदे हे शेतकऱ्यांना होत असतात. 



सौर ऊर्जा कुंपण योजना शेतकऱ्यांना होणार लाभ.

              नुकतीच म्हणजे दिनांक २८ एप्रिल २०२२ रोजी मंत्रीमंडळत बैठक झाली. या बैठकीमध्ये सौर ऊर्जा कुंपण उभारण्यासाठी शेतकऱ्यांना अनुदान देण्यास या मंत्री मंडळ बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली आहे.

सौर कुंपण योजना


          डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनेची व्याप्ती वाढवून वन्यप्राण्यांमुळे शेतातील पिकांचे होणारे मोठे नुकसान टाळता यावे यासाठी महाराष्ट्र राज्यातील संवेदनशील गावांमध्ये हि सौर ऊर्जा कुंपण योजना राबविली जाणार आहे.




मंत्री मंडळ बैठकीमध्ये सौर ऊर्जा कुंपण योजनेस मान्यता.

              वन्य प्राण्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होते. जर शेतकरी बांधवाना या सौर कुंपण योजनेचा लाभ मिळाला तर नक्कीच त्यांचा खूप मोठा फायदा होईल. दिनांक २८ एप्रिल २०२२ रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीमध्ये डॉ. श्यामप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजना या अंतर्गत हि योजना राबविली जाणार आहे. सध्या मंत्रीमंडळ बैठकीमध्ये या योजनेला मान्यता देण्यात आलेली आहे. लवकरच या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शासन निर्णय काढण्यात येईल आणि त्यावेळी देखील आपणास सूचना करण्यात येईल. 



शेतकऱ्यांना कसा मिळणार या योजनेचा लाभ.

            सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे की शेतकऱ्यांना सौर कुंपण योजनेचा लाभ कसा मिळणार आहे आणि या योजनेसाठी किती अनुदान मिळणार आहे. या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेवूया जेणे करून आपणास हि योजना समजून घेणे सोपे जाईल.

योजनेचे नाव:- सौर उर्जा कुंपण योजना.

मिळणारे अनुदान:- एकूण किमतीच्या ७५ टक्के.

लाभार्थ्याने भरावयाचा स्वहिस्सा:- २५ टक्के.

माहितीचा अधिकृत स्त्रोत:- महासंवाद संकेतस्थळ.


लवकरच येवू शकतो शासनाचा निर्णय

        जो शेतकरी या योजनेसाठी पात्र असेल त्या शेतकऱ्याला सौर ऊर्जा कुंपणाच्या एकूण किंमतीच्या ७५ टक्के किंवा पंधरा हजार रुपये या दोन्ही पैकी जी रक्कम कमी असेल त्या रक्कमेचे अनुदान देण्यात येईल. २५ टक्के रक्कम हि लाभार्थ्यास स्वतः भरावी लागणार आहे.


             ग्राम परिस्थितीकीय विकास समिती किंवा संयुक्त वन व्यवस्थापन समितीस शासनाकडून अनुदान उपलब्ध झाल्यानंतर लाभार्थ्यांना याच समितीकडे २५ टक्के रक्कम भरल्यानंतर या योजनेचा लाभ घेता येईल.


              अशा प्रकारे सर्व शेतकरी त्यांच्या शेतासाठी सौर ऊर्जा कुंपण या योजनेचा लाभ घेवू शकतात. या संदर्भातील शासनाचा निर्णय आल्यावर या याविषयी सविस्तर माहिती देण्यात येईल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!