Shet tale anudan : शेततळे अनुदानात झाली आहे वाढ, ‘असा’ करावा अर्ज

           शेती म्हटलं की सर्वात आधी गरज भासते ती पाण्याची. पाणी नसेल तरी शेतीमध्ये काहीच करता येणार नाही. जमीन कसलीही असली तरी ती नीट करता येते परंतु त्यासाठी पाण्याची सोय असणे खूपच आवश्यक आहे. यामुळे शेतकऱ्यांनी पाण्याची सोय करणे शेतीसाठी खूपच गरजेचे झाले आहे. असे असताना आता शेततळ्यासाठी सरकारकडून अनुदानही देण्यात येत आहे. यामुळे उन्हाळ्यात पिकांना लागणारी पाण्याची गरज या शेत तळ्यामुळे भागणार आहे.

शेततळे अनुदानात झाली आहे वाढ, ‘असा’ करावा अर्ज



          शेततळे अनुदान योजना अंतर्गत  शेतकऱ्यांनी जर त्यांच्या शेतात शेततळे केले तर नक्कीच त्यांना या योजनेचा फायदा होऊ शकतो. अनेक शेतकरी बांधवानी त्यांच्या शेतामध्ये शेततळी खोदून ठेवलेली आहेत त्यापैकी अनेक शेतकऱ्यांना अजून कोणतेच अनुदान मिळालेले नाही. यामुळे अनेक शेकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. परंतु याबाबत आता एक महत्वाची बातमी समोर आलेली आहे.


           कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी पाठपुरवा केल्या कारणाने आता शेततळ्यांसाठी ५२ हजार कोटींचे अनुदान मिळणार आहे. विहिरीपेक्षा शेततळे असणे केंव्हाही फायद्याचेच आहे, कारण त्यामध्ये पाणी हे साठवून ठेवता येते आणि हवे तेंव्हा ते आपल्या शेतातील पिकांना देता येते. तसेच या दोन्हींचाही खर्च जवळपास सारखाच आहे. यामुळे शेतकऱ्यांनी आधी पाण्याचा अंदाज घेऊनच काम करणे आवश्यक आहे.


शेततळे अनुदान योजनेसाठी अर्ज कसा करावा..

1.शेततळ्यासाठी Online अर्ज करण्यासाठी Google वर mahadbt farmer या website वर login करावे लागेल. 

2.तुम्हाला Maha DBT Farmers Portal दिसेल त्या ठिकाणी User ID आणि Password टाकून Login करा. 

3.Login केल्यावर अर्ज करा या पर्यायावर Click करा. 

4.या ठिकाणी अनेक पर्याय दिसतील त्यापैकी सिंचन साधने आणि सुविधा या पर्यायावर Click करा.

5.शेततळ्याबाबत योग्य माहितीची निवड करा.

6.ही माहिती व्यवस्थित टाकल्यानंतर अर्ज सादर करा या बटनावर Click करा. 

7.ज्या योजना तुम्ही निवडलेल्या आहेत त्या योजनांना प्राधान्य द्या आणि अर्ज सादर करा या बटनावर Click करा. 

8.तुम्ही जर नवीन असाल तर make payment असा पर्याय येईल. त्या पर्यायावर Click करून पेमेंट करा. 

9.अर्जाची स्थिती आणि पोच पावती Download करण्यासाठी मी अर्ज केलेल्या बाबी या पर्यायावर Click करा. 

10.याठिकाणी तुमच्या अर्जाची पोच पावती तुम्ही Download करू शकता. 

11.अशाप्रकारे तुम्ही शेततळे अनुदान या योजनेचा लाभ घेऊ शकता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!