pashupalan loan online apply शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदानावर 13,400 दुधाळ गाई म्हशींचे वाटप करण्यास राज्य सरकारने अखेर मान्यता दिली आहे. मराठवाडा विदर्भातील दुग्धविकास प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्या अंतर्गत 19 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुधाळ गाई म्हशीचं वाटप करण्यात येणार आहे. राज्य सरकारने याबाबतचा शासन निर्णय सोमवारी म्हणजे 16 सप्टेंबर रोजी प्रसिद्ध केलाय दुग्धविकास प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबवण्यासाठी मागच्याच महिन्यात मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली होती. त्यामध्ये 149 कोटी रुपयांच्या निधीला मान्यता देण्यात आली, मग गाई म्हशीच्या खरेदीसाठी मिळणाऱ्या 50% अनुदानासाठी कोणते शेतकरी पात्र आहे. कोणत्या जिल्ह्यांचा या योजनेत नव्याने समावेश करण्यात आला आहे. या लेखाद्वारे संपूर्ण माहिती जाणून घ्या.
विदर्भ व मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प
- NDDB आणि Mother Dairy च्या मदतीने हा प्रकल्प मराठवाडा आणि विदर्भात राबवला जाणार आहे. pashupalan loan online apply
- प्रकल्पाची एकूण किंमत किती आहे तर 328 कोटी 82 लाख रुपये यापूर्वी या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात मराठवाडा आणि विदर्भातील 11 जिल्ह्यांचा यामध्ये समावेश करण्यात आला होता.
- पण आता मात्र विदर्भ आणि मराठवाड्यातील नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, गडचिरोली, अमरावती, अकोला, छत्रपती संभाजीनगर, बीड, हिंगोली, जालना, नांदेड, लातूर, धाराशिव आणि परभणी अशा एकूण 19 जिल्ह्यांमध्ये 2026-27 पर्यंत दुग्धविकास प्रकल्प राबवण्यात येणार आहे.
- या प्रकल्पाअंतर्गत दुधाळ गाय आणि म्हशीच वाटप करण्यात येणार आहे का फक्त तर तसं नाहीये 13,400 दुधाळ गाई म्हशीचे 50 टक्के अनुदान वाटप करण्यात येणार आहे.
- त्यातील 50% हिस्सा शेतकऱ्यांना भरायचा आहे तर 50 टक्के हिस्सा राज्य सरकार भरणार आहे.
- पण त्यासोबतच उच्च दूध क्षमता असलेल्या भ्रणाचे प्रत्यारोपण केलेल्या 1 हजार कालवडीचं 75 टक्के अनुदानावर वाटप करण्यात येणार आहे.
- तसेच पशु प्रजनन पूरक खाद्य पुरवठा करण्यासाठी 25% अनुदान देण्यात येणार आहे.
- तर दुधातील फॅट आणि एस एन एफ वाढवण्यासाठी 33000 गाई मशीन साठी 25% अनुदान
- बहुवार्षिक चारा पीक घेण्यासाठी 22 हजार शेतकऱ्यांना १३ कोटी रुपये अनुदान
- विद्युत चलीत कडबा कुट्टी खरेदीसाठी 10 हजार शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदान
- 33000 शेतकऱ्यांना 30 टक्के अनुदानावर मुरघास अनुदान
- तर गाई मशीन मधील वंदत्व निवारण कार्यक्रम आणि आधुनिक पद्धतीने दुग्धविकास व्यवसायासाठी अनुक्रमे 3 कोटी 28 लाख रुपये आणि 1 कोटी 30 लाख रुपये अनुदान देण्यात येणार आहे.
- एकूण नऊ घटकांचा या प्रकल्पात समावेश करण्यात आलेला आहे.
- त्यासाठी कार्यपद्धती काय तर तेही शासन निर्णय स्पष्ट करण्यात आलेल्या आहे.
- गाई म्हशीच्या अनुदानासाठी अटी शर्ती आणि लाभार्थी निवडीचे निकष नेमके काय आहे.

अटी व शर्ती :- pashupalan loan online apply
- 8 ते 10 लिटर दूध देणाऱ्या दुधाळ गाई म्हशीच्या खरेदीसाठी एका लाभार्थ्याला 50% अनुदान देण्यात येणार आहे.
- दुधाळ जनावरांना डिजिटल ट्रॅक्टर लावून आणि जिओ ट्रेकिंग करणे सुद्धा बंधनकारक आहे.
- वाटप केलेली गाय असेल किंवा म्हैस असेल तीन वर्षापर्यंत तुम्हाला ती विकता येणार नाही.
- वाटप केलेली गाई म्हशी असतील त्या प्रकल्पाच्या नावे तारण ठेवावे लागणार आहे, जनावरांचा तीन वर्षाचा विमा बंधनकारक आहे.
- विमा उतरवलेलं जनावर मृत्यू झालं तर नवीन दुधाळ जनावर खरेदी करणे सुद्धा बंधनकारक असणार आहे.
- तर अटी सोबतच काही लाभार्थी निवडीचे निकष सुद्धा यामध्ये टाकण्यात आलेले आहे.
लाभार्थी निवडीचे निकष
- पशुपालकाकडे किमान दोन दुधाळ जनावर असावीत हा पहिला निकष आहे.
- मागील वर्षभरात किमान तीन महिने खाजगी व सहकारी दूध संकलन केंद्रावर संबंधित पशुपालकांना दूध विक्री केलेली असणं सुद्धा आवश्यक आहे.
- प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात मागील तीन वर्षात कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेतलेला नसणं बंधनकारक करण्यात आलेल आहे.
- एका गावातील जास्तीत जास्त पाच लाभार्थी यासाठी निवडीस पात्र ठरणारे आहे.
- आणि एका कुटुंबात एकाच व्यक्तीला लाभ देण्यात येणार आहे.
- गाई म्हशीची खरेदी आणि अनुदानाचे वाटप कसं केलं जाणार.
गाय / म्हशीचे खरेदी व अनुदान वाटप pashupalan loan online apply
- दुधाळ जनावर खरेदी करताना शेतकरी एनडीबी (NDB) ची सेवा घेतील किंवा खुल्या बाजारातून उच्च दूध उत्पादन क्षमता असलेल्या गायी म्हशींची खरेदी सुद्धा करू शकतील.
- प्रत्येक गाई म्हशीसाठी एक लाख किंमत गृहीत धरण्यात आलेली आहे.
- त्यामध्ये ट्रेकिंग सिस्टम वाहतूक खर्च आणि तीन वर्षाचा विम्याचा समावेश करण्यात आलेला आहे.
- लाभार्थींना 50 टक्के किंवा 50 हजार यापैकी जी काही रक्कम कमी असेल ती अनुदान म्हणून राज्य सरकारच्या मार्फत देण्यात येणार आहे.
- गाई म्हशीच्या खरेदीचा पुरावा आणि विमा पावती सादर केल्यावरच भारत पशुधन प्रणालीवर खातर जमा करून जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कडून लाभार्थीच्या बँक खात्यात थेट लाभ हस्तांतर म्हणजेच डीबीटी स्वरूपात बँक खात्यात पैसे जमा करण्यात येणार आहे.
कलवडींचे शेतकऱ्यांना वाटप करण्याची कार्यपद्धती
यामध्ये तर १००० शेतकऱ्यांना आयव्हीएफ (IVF) तंत्राद्वारे सात महिन्यांच्या गाभण कालवडी व पारडीसाठी 75 टक्के अनुदान किंवा 1 लाख 8 हजार 750 रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल तेवढा अनुदान देण्यात येणार आहे. pashupalan loan online apply
लाभार्थ्यांचे निकष
- तर दूध उत्पादक शेतकऱ्यांकडे किमान 5 जनावर असावीत पशु आहाराचे शाश्वृक्त पद्धतीचे ज्ञान शेतकऱ्यांना असावं.
- पशुधनाच्या पुढील पिढ्याची पैदास केवळ कृत्रिम रेतनाद्वारे करण्याचे पशुपालक इच्छुका असावा.
- पशु प्रजनन पूरक खाद्याच्या पुरवठ्यावरील अनुदान कसे देण्यात येणार आहे.
- तर एका गाईसाठी म्हशीसाठी प्रति दिवस पाच किलोग्रॅम पशुपूरक खाद्य आवश्यक असतं त्यानुसार 60 दिवसांसाठी खाद्य देण्यात येणार आहे.
- त्याचा दर 32 रुपये किलोग्राम गृहीत धरण्यात आला आहे तर एका गाईसाठी 9600 किमती सह खाद्य देण्यात येणार आहे.
- 25% अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डीबीटीच्या माध्यमातून थेट जमा करण्यात येणार आहे. pashupalan loan online apply
- त्याचा लाभ 1 लाख गाई मशीन साठी देण्यात येईल असेही शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आला आहे.
- दुधातील फॅट आणि एस एन एफ वर्धक खाद्य पूरक पुरवठ्यासाठी एक गाय व म्हशीसाठी प्रति दिवस 250 ग्रॅम खाद्यपूरक आवश्यक असून ते 90 दिवसांसाठी देण्यात येणार आहे.
- त्याचा दर दोनशे रुपये प्रति किलोग्राम गृहीत धरण्यात आला आहे.
- एका गाई साठी व मशीन साठी 4500 किमतीचे खाद्य पूरक देय राहील तर 25% अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर खरेदीचे पुरावे सादर केल्यानंतर जमा करण्यात येईल.
- त्यासाठी 33000 गाई म्हशी पशुपालक पात्र ठरतील असं सुद्धा शासन निर्णय सांगण्यात आलं आहे.
- बहुवार्षिक चारा पीक घेण्यासाठी 6 हजार रुपये बियाणे आणि झोंबी 100% अनुदान तत्त्वावर 22000 लाभार्थी शेतकऱ्यांना देण्यात येतील.
- त्यासाठी निकष म्हणजे शेतकऱ्यांकडे तीन ते चार दुधाळ जनावर असावीत.
- शेतकऱ्यांकडे किमान एक एकर जमीन असावी जमिनीवर चारा उत्पादनासाठी सिंचन सोय असावी.
- वैरण उत्पादनासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून मोफत बियाणे आणि ठोंबे लाभ घेतलेली शेतकरी अपात्र ठरणार आहे.
शेतकरी, पशुपालक यांना विद्युतचलित कडबाकुट्टी सयंत्रांचे वाटप pashupalan loan online apply
- कडबा कुट्टीच्या वाटपासाठी दहा हजार लाभार्थी राज्यातले पात्र ठरणार आहे.
- एका कडबा कुटीची किंमत 30000 रुपये राज्य सरकारने गृहीत धरलेली आहे.
- या किमतीच्या 50% किंवा 15000 यापैकी जी रक्कम कमी असेल ती अनुदान म्हणून संबंधित शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे.
- कडबा कुट्टी खरेदी केल्याची पावती सादर केल्यावर अनुदान लाभार्थींच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.
- निकष काय आहेत तर तीन ते चार दुधाळ जनावर असावी विद्युत जोडणीचा खर्च लाभ धारकांना करायचा आहे.
- मागच्या पाच वर्षात या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचा केंद्र राज्य जिल्हा योजनेतून लाभ घेतलेली शेतकरी या योजनेसाठी अपात्र असतील.
- लाभार्थीने दोन एचपी आयएसआय मार्क असलेली कडबा कुट्टी खरेदी करावी.
- मुरघास साठी प्रति दिवस पाच किलो मुरघास तीन रुपये प्रति किलो अनुदान 33 हजार लाभार्थींना देण्यात येणार आहे.
- जिल्हा योजनेतून लाभ घेतलेली लाभार्थी यासाठी अपात्र आहेत.
- तर मुरघास खरेदीचा पुरावा सादर केल्यावर अनुदान लाभार्थीच्या बँक खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून जमा करण्यात येईल.
- गाई म्हशी मधील वंदत्व निवारणासाठी दोन लाख गाई म्हशीवर संप्रेरकाच्या म्हणजेच हार्मोनल थेरेपी आणि पारंपारिक उपचार करण्यात येणार आहे.
- त्यासोबतच आधुनिक पद्धतीने दुग्ध व्यवसाय विकास करण्यासाठी 36000 शेतकऱ्यांना पशुवैद्यकीय विद्यापीठाची प्रशिक्षण केंद्रातून कृषी विज्ञान केंद्रातून प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
- तर अशा एकूण नऊ घटकांसाठी मराठवाडा विदर्भातील दुग्धविकास प्रकल्पातून अनुदान देण्यात येणार आहे. pashupalan loan online apply
- या प्रकल्पाचे मुख्यालय कुठे असणार आहे तर नागपूरला या प्रकल्पाचे दोन वर्षानंतर मूल्यमापन करून पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.
- अर्थात तीन वर्षासाठी हा प्रकल्प राबवला जाणार आहे पण दोन वर्षानंतर या प्रकल्पाचे मूल्यमापन करण्यात येईल असेही शासन निर्णय स्पष्ट करण्यात आले आहे.
Leave a Reply