Numerology:- ‘या’ जन्मतारखा असलेल्या व्यक्ती असतात खूपच नशीबवान, कोणत्याही क्षेत्रात मिळवत असतात यश.

             अंकशास्त्रानुसार, कोणत्याही व्यक्तीचे भविष्य हे त्याच्या जन्म तारखेवरून कळू शकते. १ ते ९ पर्यंतचे हे एकूण नऊ मूलांक आहेत. आता आपण ज्या लोकांची जन्मतारीख ५, १४ आणि २३ आहे  त्या लोकांविषयी जाणून घेऊयात. त्यांचा मूलांक ५ हा आहे. ५ मुलांक असलेल्या लोकांचा स्वामी हा बुध ग्रह असतो. ज्योतिष शास्त्रात बुध हा स्वामी बुद्धिमत्ता आणि मेहनती असतो. या राशीचे लोक देखील बुद्धिमान आणि मेहनती असतात. हे लोक कधीही हार मानत नाहीत. ते आर्थिकदृष्ट्याही सक्षम असतात.

कोणत्याही व्यक्तीचे भविष्य त्याच्या जन्म तारखेवरून कळू शकते.                या मूलांकच्या लोकांना नोकरीपेक्षा व्‍यवसायातच अधिक रस असतो. आणि ते लोक व्यवसायातही भरपूर नफा कमावत असतात. त्यांना प्रत्येक गोष्ट हि स्वतंत्रपणे करायला आवडते. त्यांच्या कामात कोणाची ढवळाढवळ त्यांना अजिबात आवडत नाही. कारण त्यांना प्रत्येक गोष्ट त्यांच्या पद्धतीनेच करायला आवडते. त्यांचा स्वभाव हा अतिशय मनमिळाऊ असतो. ते कोणालाही आपल्या बाजूला त्वरित आकर्षित करू शकतात. त्यांना समाजात खूप मान-सन्मान मिळत असतो.


   

             या मूलांकाचे लोक हे प्रतिभावान असतात. ते धाडसी, निर्भयी आणि मेहनती देखील असतात. आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक आव्हानाला ते सामोरे जाण्यास तयारच असतात आणि त्यात ते विजय देखील मिळवतात. ते कधीही हार मानत नाहीत आणि सर्व प्रकारच्या समस्यांना तोंड देण्यासाठी ते नेहमी तयार असतात. ते संभाषण करण्यात खूपच पटाईत असतात. त्यांचे व्यक्तिमत्व हे अतिशय आकर्षक असते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!