Neptune Gochar 2022: पाच दिवसानंतर रहस्यमयी ग्रह बदलणार आहेत राशी, चक्क 14 वर्षानंतर करणार गोचर…

Neptune Grah Gochar 2022:

               नेपच्यून हा ग्रह पृथ्वीपासून खूप दूर आहे. 14 वर्षांनंतर म्हणजे 11 सप्टेंबर 2022 या दिवशी वरून ग्रह आपली राशी बदलणार आहे. या दिवशी दुपारी 03 वाजून 11 मिनिटांनी वरुण ग्रह हा कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार वरुण ग्रहाला एका राशीतून दुस-या राशीत जाण्यासाठी 14 वर्षे लागत असतात आणि त्यामुळे त्याचे राशीचक्र पूर्ण करण्यासाठी 164 वर्षे लागत असतात. नेपच्यून ग्रह हा स्वप्नांचा आणि मायावी प्रभाव असलेला ग्रह आहे असेेम्हणतात . नेपच्यून ग्रहाला वरूण ग्रह म्हणून देेेेखील संबोधलं जातं. राशींमध्ये बृहस्पति सोबतच मीन राशीचे प्रभुत्व सामायिक करते. हा ग्रह भौतिक आणि आध्यात्मिक या दोन्ही जगाचा दुवा मानला जातो. हा ग्रह मनोवैज्ञानिक दृष्टिकोनातून, व्यक्तीच्या अवचेतन संबंधांबद्दल माहिती देेत असतो.

Neptune Gochar 2022



               ज्योतिषशास्त्रानुसार ज्या स्थानात वरुण ग्रह असतो, त्या स्थानामध्ये त्या व्यक्तीला संबंधित चमत्काराची अनुभूती मिळत असते. कुंभ राशीतील वरुण ग्रहाचा राशी बदल हा अनेक राशीच्या लोकांसाठी लाभदायी ठरणार आहे. काही राशीच्या लोकांना हा काळ खूप भरभराटीचा ठरेल. चला तर मग जाणून घेऊया वरुण ग्रहाचा गोचर कोणत्या राशीच्या लोकांसाठी विशेष फायदेशीर ठरणार आहे.


वृषभ-
               ज्योतिष शास्त्रानुसार या राशीच्या लोकांसाठी हा काळ सुवर्णकाळ असणार आहे. कुंभ राशीतील वरुण ग्रहाच्या संक्रमणामुळे वृषभ राशीच्या लोकांनाा या काळात सकारात्मक परिणाम मिळू शकतात. या दरम्यान, काही नवीन लोक देखील भेेेटूू शकतात , त्यांचा भविष्यात चांगला फायदा मिळेल. त्याचबरोबर कला क्षेत्राशी निगडित लोकांसाठीी देखील हा काळ अतिशय अनुकूल आहे. या लोकांना या काळात भरपूर असे यश मिळेल.


कुंभ-
                या राशीच्या लोकांसाठीी गोचर फलदायी आहेे. या काळात त्यांना नशिबाची पूर्ण साथ मिळणार आहे. आर्थिक स्थिती देखील सुधारेल. रखडलेली कामेही पूर्ण होतील. जर तुम्ही या काळात व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही तेे नक्कीच करू शकतात. इतकंच नाही तर तुम्ही नोकरीसोबत व्यवसाय देखील सुरू करू शकता.


कन्या- 
                 या काळात कन्या राशीच्या लोकांच्या उत्पन्नात विशेष वाढ होणार आहे. या काळात तुम्हाला तुमची प्रतिभा दाखवण्यासाठी भरपूर संधी मिळेल. कला क्षेत्राशी संबंधित लोकांना विशेष लाभ होणार आहे. या काळात तुमच्या लोकप्रियतेत वाढ होऊ शकते. समाजात तुमची वेगळी ओळख निर्माण होऊ शकते. 


कर्क-          
                     ज्योतिष शास्त्रानुसार या राशीच्या लोकांना या काळात भौतिक सुख प्राप्त होईल. नोकरीतही स्थिती मजबूत राहील. व्यवसायात तुम्हाला चांगला फायदा मिळेल. दुसरीकडे, जर तुम्ही नवीन घर घेण्याच्या विचारात असाल, तर हे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल.

मकर-
                  वरुण ग्रहाचा गोचर या राशीच्या लोकांसाठी विशेषतः फलदायीी ठरणार आहे. कल्पनाशक्ती आणि सर्जनशीलता देखील वाढेल. एवढेच नाही तर या गोचरामुळे लोकप्रियताही मिळेल. आर्थिक स्थिती ही पूर्वीपेक्षा चांगली राहील. या गोचरामुळे प्रवासाचे योग तयार होत आहेे. प्रत्येक ठिकाणी आदर आणि सन्मान देखील मिळेल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!