सध्याच्या या परिस्थितीत शेती करणाऱ्यांसाठी एक उत्तम पर्याय आम्ही सुचवत आहोत तो म्हणजे ही अशा एका पिकाची शेती आहे, ज्यामधून आपल्याला वर्षाला 4 लाख रुपयांपर्यंतचा नफा मिळू शकतो. ही शेती आहे लेमनग्रास म्हणजेच गवती चहाची (Lemongrass Farming Business). आजकाल अनेक औषधी वनस्पतींची शेती केली जात आहे. त्यापैकीच हे एक पीक म्हणजे गवती चहा (lemongrass). याची व्यावसायिक मागणी वाढत असल्यामुळे यातून चांगला नफा मिळण्याची संधी सध्या आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही आपल्या ‘मन की बात’ (Mann ki Baat) कार्यक्रमात गवती चहाच्या lemongrass शेतीचा आवर्जून उल्लेख केला होता. या शेतीतून शेतकरी स्वतःचं उत्पन्न वाढवू शकतातच पण तसेच देशाच्या प्रगतीतही हातभार लावू शकतात असं त्यांनी या कार्यक्रमात म्हटलं होतं. गवती चहा lemongrass ही एक औषधी वनस्पती आहे. सर्दी, खोकल्यावर काढा बनवण्यासाठी याचा आपण मोठ्या प्रमाणात वापर करतो. यातल्या औषधी गुणधर्मामुळे यापासून काढलेल्या तेलाची देखील बाजारात मोठी मागणी आहे.
हर्बल उत्पादनांमध्ये याचा वापर अतिशय वाढत आहे. व्यावसायिक पातळीवर अनेक प्रकारची औषधं, सौंदर्यप्रसाधनं, साबण आणि तेल निर्मितीसाठी याचा उपयोग केला जातो. यामुळेच कंपन्या चांगली किंमत देऊन याची खरेदी करत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या खर्चापेक्षा कितीतरी पट अधिक नफा मिळू शकेल. गवती चहाच्या lemongrass शेतीतील सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे पीक दुष्काळी भागातही चांगलं घेता येतं. ते वाढण्यासाठी जास्त पाणी देखील लागत नाही. एवढंच नाही, तर शेतात खत न घालताही हे पीक चांगलं घेता येतं. जनावरांना याच्या पानांची चव अजिबात आवडत नाही. त्यामुळे नुकसान होण्याची शक्यता देखील खूप कमी होते. फेब्रुवारी ते जुलै हा काळ गवतीचहाच्या lemongrass लागवडीसाठी अनुकूल असतो. 3 ते 5 महिन्यांत हे पीक चांगल येतं.
एकदा लागवड केल्यावर सहा ते सात वेळा कापणी करता येते म्हणजेच वर्षभरात 3 ते 4 वेळा सहज कापणी करता येते. जमिनीपासून साधारण 5 इंच उंचावरून कापणी करावी लागते. एक गुंठा जमिनीवरील पिकाद्वारे वर्षभरात 3 ते 5 लिटर तेल मिळू शकते. हे तेल बाजारात प्रतिलिटर 1500 रुपये दरापर्यंत विकलं जात असत. एकदा लागवड केलेल्या पिकातून तीन वर्षांपर्यंत तेल मिळतं. मार्च-एप्रिलमध्ये त्याची रोपवाटिकाही तयार करता येते. याच्या लागवडीसाठी साधारण 20 हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. त्यातून 4 लाख रुपयांपर्यंतचा फायदा सहज मिळू शकतो.
Post Views: 699