(How to increase the yield of wheat) गहू या पिकाच उत्पन्न कस वाढवायचं…..

        प्रत्येक वनस्पतीला आपला जीवनक्रम पूर्ण करण्यासाठी अन्नद्रव्यांची आवश्यकता असतेच. हे अन्नद्रव्य वनस्पतीला वाढीसाठी आणि वनस्पतींच्या विकासाच्या प्रत्येक अवस्थेत खूप महत्वपुर्ण भूमिका बजावते. वनस्पतीला जीवनक्रम पुर्ण करण्यासाठी १७ प्रमुख अन्नद्रव्यांची गरज असते. त्यात नायट्रोजन nitrogen, फॉस्फरस phosphorus, पोटॅशियम potatioum, कॅल्शियम calcium, सल्फर sulphur, मॅग्नेशियम magnetioum, कार्बन carbon, ऑक्सिजन oxygen, हायड्रोजन hydrogen अन्नद्रव्ये वनस्पतीला मोठ्या प्रमाणात लागतात. तर लोह, बोरान, क्लोरीन, मॅगनिज, जस्त, तांबे, मॉलिब्डेनम, निकेल हे वनस्पतीला खूप कमी प्रमाणात लागत असतात. बऱ्याच शेतकऱ्यांना अन्नद्रव्या बद्दल माहिती नसते. या लेखाच्या माध्यमातून गहू पिकातील अन्नद्रव्यांची कमतरता आणि त्यावर आपण कोणत्या उपाययोजना करू शकतो याबद्दल माहिती घेणार आहोत.



            गहू पिकात विविध अन्नद्रव्यांच्या कमतरता दिसून येवू शकते. जमिनीचा प्रकार,खत आणि जल व्यवस्थापन आणि गव्हाचे वाण अशा अनेक घटकांचा अन्नद्रव्य उपलब्धतेवर परिणाम होऊ शकतो. लक्षणे दिसल्यावर लवकरात लवकर नियोजनात योग्य तो बदल करून पिकाच्या वाढीची अवस्था पूर्ववत करता येवू शकते. लक्षणे ज्या पट्यात दिसून येत आहेत त्याच पट्यात हवा तो बदल केल्याने खर्च नियंत्रणात ठेवणे शक्य होईल. कमतरतेची पूर्तता करते वेळी मिश्रण खतांचा वापर करावा जेणे करून एका घटकाची कमतरता भरून निघाल्याने दुसऱ्या घटकाची कमतरता येणार नाही. 


       कधी कधी एका घटकाच्या कमतरते मुळे दुसऱ्या घटकाची देखील कमतरता निर्माण होते आणि मिश्र खते वापरल्याने हि अडचण देखील दूर होते. नत्राच्या कमतरते मुळे गव्हावर येणारा फिक्कट पिवळेपणा: गव्हात नत्राच्या कमतरतेची अनेक कारणे असू शकतात, जसे जेव्हा फिक्कट पिवळे पान दिसण्यास सुरवात जुन्या पानापासून होते तेव्हा प्रामुख्याने नत्राची कमतरता आहे हे लक्षात घ्यावे. यामुळे वाढीचा वेग कमी होतो. पाने लहान राहू लागतात. लक्ष न दिल्यास हि पाने टोकाकडून पिवळी होऊन ती गळून पडतात. फुटवे कमी रहातात, पिक वेळे अगोदरच पक्व होते आणि खुजे रहाते. ओंब्या छोट्या रहातात. जास्त सामू, हलकी मृदा, मृदेतील सेंद्रिय घटकांची कमतरता, जल-असंतुलन या घटकामुळे नत्राची कमतरता अधिक तीव्र होन्याची शक्यता असते. 

 नत्राची कमतरता : 

 1. नत्राची कमतरता दिसून आल्यास १९:१९:१९ या विद्राव्य खताची २०० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी लागते. 

 स्फुरदाची कमतरता : 


 1. स्फुरद कमतरते मुळे येणारे जांभळे चट्टे: स्फुरदाची कमतरता झाल्यावर पानावर, क्षिरांवर आणि खोडावर जांभळे चट्टे दिसुन येतात. जुन्या पानावर पहिले परिणाम होतो. 

 2. वाढीचा दर मंदावतो आणि ओंब्या लहान राहतात. 

 3. अति विम्ल जमीन, सेंद्रिय घटकाचा अभाव, जमिनीत चुनखडीचे जास्त प्रमाण, जमिनीतील स्फुरदाची कमतरता, गारठा-ओलावा, अविकसित मुळे असे आहे. 

 4. स्फुरदाची कमतरता होऊ शकते. 

 5. स्फुरदाची कमतरता दूर करण्यासाठी डिएपी किंवा एमएपी १२:६१:०० या खतांची फवारणी करावी. 

 लोहाची कमतरता :-

 1. लोहाच्या कमतरतेमुळे दिसून येणारी लक्षणे. 

 2. लोहाची कमतरता असेल तर नवीन पानाच्या शिरामधील भाग पिवळा पडून शिरा हिरव्या रहातात. 

 3. कमतरता दूर न केल्यास पूर्ण पानच पिवळे रहाते आणि जुनी पाने देखील पिवळी पडू लागतात. 

 4. विम्ल जमीन, पाणथळ जमीन, जास्त प्रमाणात चूनखडी तसेच जमिनीत गरजेपेक्षा जास्त झिंक असल्यास लोहाची कमतरता असते.

 5. लोहाची कमतरता दिसून आल्यास फेरस सल्फेट ferus sulfet ५० ग्रॅम किवा चिलेटेड फेरस २० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात मिसळून फवारणी करावी. 

 लोह शिफारस 

 1. लोहाची कमतरता असणाऱ्या जमिनीत अन्नद्रव्यांसोबतच (१२०:६०:४० नत्र:स्फुरद :पालाश किलो प्रति हेक्टर ) हिराकस २० किलो प्रति हेक्टरी (१०० किलो शेणखतात १५ दिवस मुरवून) जमिनीतून द्यावे. लोहाची कमतरता, जस्ताची कमतरता आणि लक्षणे 1. गहू पिकात उच्च प्रतीचे दाणे भरण्यासाठी झिंक हा अतिशय महत्वाचा घटक आहे.

 2. अल्कधर्मी व चुनखडीयुक्त जमिनीत जस्ताची उपलब्धता कमी असते स्फुरदाचे गरजेपेक्षा जास्त पुरवठा केल्यामुळे झिंक ची कमतरता भासू शकते.


3. गव्हातील झिंकची कमतरता नवीन पानावर दिसून येत असते. शिरामधील भाग पिवळा दिसून येतो आणि जर कमतरता जास्त प्रमाणात असेल तर पाने पांढरी होऊ शकतात आणि मरता.


 4. झिंकच्या कमतरतेवर गव्हाच्या झाडांची सर्वात वैशिष्ट्यपूर्ण लक्षणे म्हणजे झाडाची उंची व पानांचा आकार कमी होणे ही आहेत. गव्हाच्या अधिक उत्पादनासाठी अन्नद्रव्ये शिफारस पेरणीनंतर ५५ आणि ७० दिवसांनी १९:१९:१९ किंवा डीएपी DAP या विद्राव्य खताची २ टक्के दराने (४ किलो ग्रॅम २०० लिटर पाण्यात प्रति एकर) फवारणी करावी.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!