Government Schemes :- आता ‘बायकोला मिळणार महिन्याला 10 हजार रुपये’; जाणून घ्या या योजनेबद्दल सर्व माहिती…

                   सरकारकडून सर्वसामान्य जनतेसाठी अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जात आहेत. या योजनांद्वारे सरकार सामान्य जनतेला चांगले जीवन जगण्यासाठी सक्षम करण्याचा प्रयत्न करत असते. अटल पेन्शन योजना (Atal Pension Scheme) असे या योजनेचे नाव आहे. 


           अटल पेन्शन योजने (Atal Pension Yojana) बद्दल बोलायचे झाले तर अरुण जेटली यांनी २०१५ मध्ये ही योजना आणली होती. या योजनेचे उददिष्ट असंघटित कुटुंबांना भक्कम आर्थिक सहाय्य देऊन लाभ मिळवून देणे हे आहे. या योजनेत 10000 रुपयांपर्यंतच्या पेन्शन योजनेचा लाभ देखील मिळतो. अटल पेन्शन योजना म्हणजे काय? (What is Atal Pension Scheme?)

         अटल पेन्शन योजना (Atal Pension Scheme) ही पहिल्यांदा 2015 मध्ये सुरू झाली होती. ही योजना असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी सुरू करण्यात आली होती. पण आता भारतात राहणारा 18 ते 40 वर्षे वयोगटातील कोणताही व्यक्ती या योजनेत गुंतवणूक करू शकतो. ६० वर्षांनंतर तुम्हाला दर महिन्याला पेन्शन मिळणार आहे.


           दुसरीकडे, जर एखाद्याचा ६० वर्षापूर्वी मृत्यू झाला असेल तर त्याची पत्नी/पती ही योजना चालू ठेवू शकतात आणि पेन्शनचा लाभ देखील मिळवू शकतात. याशिवाय पतीच्या मृत्यूनंतर पत्नी एकरकमी रकमेवर दावा ही करू शकते. दुसरीकडे, पत्नीचाही मृत्यू झाल्यास, तिच्या नॉमिनीला एकरकमी रक्कम मिळू शकते.


           आम्ही तुम्हाला सांगतो की, या योजनेत तुम्हाला 1 हजार, 2 हजार, 3 हजार, 4 हजार, 5 हजार रुपये मासिक पेन्शन मिळू शकते. परंतु या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला नोंदणी करावी लागेल. नोंदणीसाठी, तुमच्याकडे बचत खाते (Savings Account), आधार क्रमांक (Aadhaar number) आणि मोबाइल क्रमांक (Mobile number) असणे आवश्यक आहे. 


अटल योजनेचे फायदे (Benefits of atal scheme):-

          जर एखाद्या व्यक्तीने वयाच्या 18 व्या वर्षी ही योजना सुरू केली असेल, तर वयाच्या 60 व्या वर्षी 5000 रुपये मासिक पेन्शन मिळवण्यासाठी प्रत्येक महिन्याला 210 रुपये जमा करावे लागतील.

          त्याच वेळी, या योजनेत कर सूट देखील उपलब्ध आहे. आयकर कायदा 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंतचा कर लाभ उपलब्ध आहे. तसेच, काही प्रकरणांमध्ये, 50,000 रुपयांपर्यंत अतिरिक्त कर लाभ उपलब्ध आहे. म्हणजेच तुम्हाला 2 लाख रुपयांपर्यंत सूट मिळेल.अटल पेन्शन योजना फॉर्म कसा डाउनलोड करावा? (How to download Atal Pension Yojana form?)

• तुम्ही कोणत्याही जवळच्या बँकेच्या शाखेतून फॉर्म मिळवू शकतात.

• अटल पेन्शन योजना फॉर्म हा मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, कन्नड, बांगला, ओडिया, तमिळ आणि तेलगू अशा अनेक भाषांमध्ये उपलब्ध आहे.

• सहभागी बँकांच्या अधिकृत वेबसाइटवरून तुम्ही फॉर्मची प्रिंट आउट डाउनलोड करू शकतात.

• पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी (Pension Fund Regulatory and Development Authority) च्या अधिकृत वेबसाइटवरून APY खाते उघडण्याचा फॉर्म डाउनलोड करणे तुमच्यासाठी सोपे मानले जाते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *