Gopinath Mundhe Shetkari Apghat Vima Yojana: अपघाती मृत्यू झाल्यास दोन लाखांची मदत

शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाला किंवा अपंगत्व आले तर गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजने (Gopinath Mundhe Shetkari Apghat Vima Yojana) द्वारे दोन लाख रुपयांची मदत दिली जाते. पुणे जिल्ह्यात मागील वर्षी 61 जणांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत मिळाली आहे.

शेती करताना शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू झाला किंवा त्यात अंगावर वीज पडून मृत्यू येणे, नैसर्गिक आपत्ती, जसे पूर, सर्पदंश. विंचू दंश, वाहन अपघात रस्त्यावरील अपघात विजेचा शॉक लागून शेतकऱ्यांचा मृत्यू झाला किंवा अपंगत्व आले तर त्याच्या वारसांना दोन लाख रुपये दिले जातात.

👉या योजनेचा लाभ घेण्यासाठी येथे क्लिक करा.👈

एक अवयव गेल्यास एक लाख

जर अपघातामध्ये शेतकऱ्याचा शरीराचा कोणताही एक अवयव किंवा एक डोळा निकामी झाला असेल तर त्या शेतकऱ्याला एक लाख रुपये विमा दिला जातो.

दोन अवयव किंवा दोन डोळे गेले तर दोन लाख

अपघातात शेतकऱ्याला दोन डोळे किंवा दोन अवयव गमवावे लागले तर दोन लाख रुपये विमा देण्यात येतो. एक डोळा व एक अवयव निकामी झाला तर त्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला दोन लाख रुपये एवढी रक्कम विमा च्या स्वरूपात दिली जाते.

👉या योजनेचा लाभ घेण्यासाठी येथे क्लिक करा.👈

Gopinath Mundhe Shetkari Apghat Vima Yojana 277 प्रस्ताव 61 जणांचे दावे मंजूर

जिल्ह्यातील 7 एप्रिल 2021 ते 6 एप्रिल 2022 या कालावधीमध्ये एकूण 277 दावे दाखल करण्यात आले होते. त्यामध्ये 61 दावे मंजूर करण्यात आले असून 13 दावे फेटाळण्यात आले आहेत. तरी 163 दावे विमा कंपनीकडे कार्यवाहीसाठी प्रलंबित आहेत. तर 40 दाव्यांमध्ये कागदपत्रांची पूर्तता झालेली नाही.

मदतीसाठी अर्ज कोठे कराल

राज्यातील वय वर्षे 10 ते 75 या वयोगटातील महसूल नोंदणी नुसार विमा पॉलिसी लागू झालेल्या तारखेस खातेदार असलेला शेतकरी आणि त्याच्या कुटुंबातील विहित धारक खातेदार नसलेला कोणताही एक सदस्य ज्याचे वय दहा ते 75 वर्षे आहे. अशा एकूण दोन जणांना या योजनेचा लाभ घेता येईल. या योजनेसाठी तालुका कृषी अधिकाऱ्याकडे अर्ज करावा.

👉या योजनेचा लाभ घेण्यासाठी येथे क्लिक करा.👈

या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी दावा हा अपघात झाल्यानंतर 45 दिवसांच्या आत नोंदविण्यात यावा. तरच शेतकऱ्याला किंवा त्याच्या कुटुंबाला विमा रक्कम मिळते.


2 thoughts on “Gopinath Mundhe Shetkari Apghat Vima Yojana: अपघाती मृत्यू झाल्यास दोन लाखांची मदत”

  1. Pingback: Mukhyamantri Sahayata Nidhi उपचारासाठी पैसे नाहीत मुख्यमंत्री कक्षा कडून मिळते तीन लाख रुपयांपर्यंत मदत - Krushi Vasant

  2. Pingback: Mukhyamantri Sahayata Nidhi उपचारासाठी पैसे नाहीत मुख्यमंत्री कक्षा कडून मिळते 3 लाख रुपयांपर्यंत मदत - Atharvarohi

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!