fertilizer subsidy खतांच्या अनुदानामध्ये झाली वाढ (dap खत), पहा खतांचे नवीन दर…

 

           केंद्र सरकार (Central Government) ने पोषक तत्वावर आधारित अनुदानात वाढ केली आहे. परिणामी, केंद्र सरकार डीएपी (dap खत) सह पोटॅश आणि फॉस्फेट (Potash and phosphate) खतांच्या किमती गेल्या वर्षीच्या तुलनेत कायम राहतील, असे माहिती आणि प्रसारण (Information and broadcast) मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले. डीएपी खताच्या पिशवीचे अनुदान ५१२ रुपयांवरून २,५०१ रुपये करण्यात आलेले आहे. ठाकूर यांच्या म्हणण्यानुसार, आता शेतकरी डीएपी खताची एक पिशवी 1,350 रुपयांना खरेदी करू शकतील. 

fertilizer subsidy



               खतांच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे आर्थिक संकटात (financial crisis) सापडलेल्या शेतकऱ्यांना मोदी सरकारने खूपच मोठा दिलासा दिला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने (Union Cabinet) बुधवारी पोषण मूल्यावर आधारित खत अनुदाना (Fertilizer subsidy based on nutritional value) त वाढ केली. केंद्र सरकार (Central Government) ने एप्रिल 2022 ते सप्टेंबर 2022 या कालावधीत चालणाऱ्या खरीप हंगामा (Kharif season) साठी 60,939 कोटी रुपयांच्या अनुदानास मान्यता दिली आहे. 


       DAP सह पोटॅश (Potash) आणि फॉस्फेट (Phosphate) युक्त खते या अनुदानासाठी पात्र असतील. विशेषतः, मागील वर्षी पोषण-आधारित खत अनुदानासाठी केवळ 57,150 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली होती.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!